विधानसभा निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी पाहता, सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी (मविआ) यांच्या निवडणूक निकाल आणि परिणामांवर बंडखोरांची भूमिका काय असेल याबद्दल बरीच चर्चा होती. अखेरीस राज्यभरातील रिंगणात असलेल्या ५० बंडखोरांपैकी फक्त दोन जणच विजयी होऊ शकले. मात्र, असे असले तरी त्यांनी इतर ११ जागांवरील निकालांवर प्रभाव टाकला. महायुतीने (भाजपा, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस व एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांचा समावेश असलेल्या) बंडखोर उपस्थित असलेल्या सात जागा गमावल्या आणि महाविकास आघाडी (काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना व शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी यांचा समावेश असलेल्या) अशा चार जागा गमावल्या.
आकडेवारी काय सांगते?
किमान १२ जागांवर महायुतीच्या बंडखोरांना विजयाच्या फरकापेक्षा जास्त मते मिळाली. विजयी झालेले दोन बंडखोरही मूळचे महायुतीचेच आहेत. शरद सोनवणे (शिवसेना- शिंदे गट) जुन्नरमधून आणि चंदगडमधून शिवाजी पाटील (भाजपा) विजयी झाले. सोनवणे यांना ७३,३५५ मते मिळाली आणि त्यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे सत्यशील शेरकर यांचा ६,६६४ मतांनी पराभव केला; तर राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे अतुल बेनके ४८,००० मतांसह तिसऱ्या स्थानावर होते.
हेही वाचा : महायुतीची ‘सत्ता’वापसी; लोकसभेत पराभूत झालेल्या १०५ जागांवर विजयी
चंदगडमध्ये शिवाजी पाटील यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे राजेश पाटील यांचा २४,००० पेक्षा जास्त मतांनी पराभव केला. तर, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या नंदाताई कुपेकर-बाभूळकर यांना ४८,००० मते मिळाली. बंडखोरांच्या उपस्थितीचा सर्वाधिक फटका बसला. त्यामध्ये महायुतीतील भागीदार अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला आपले पाच मतदारसंघ गमवावे लागले. तर बंडखोरांच्या उपस्थितीमुळे परतूर, जिंतूर, श्रीगोंदा व इंदापूर या चार जागा महाविकास आघाडीने गमावल्या. बडनेरा, पाटण व रामटेक यांसारख्या अनेक ठिकाणी त्यांना युतीच्या अधिकृत उमेदवारांपेक्षा जास्त मते मिळाली.
युतीच्या अधिकृत उमेदवारांपेक्षा बंडखोरांना जास्त मते
- परतूरमध्ये काँग्रेसचे बंडखोर सुरेशकुमार जेथलिया यांना ५३,९२१ मते मिळाली; तर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आसाराम बोर्डे आणि भाजपाचे भाजपाचे विजयी उमेदवार बबनराव यादव यांच्यात केवळ ४,७४० मतांचा फरक होता.
- जिंतूरमध्ये भाजपाच्या मेघना बोर्डीकर यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे विजय भांबळे यांचा ४,५१६ मतांनी पराभव केला. तर, काँग्रेसचे बंडखोर सुरेश नागरे (वंचित बहुजन आघाडीकडून तिकीट मिळालेले) यांना ५६,४७४ मते मिळाली.
- श्रीगोंद्यात भाजपाचे बबन पाचपुते यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या अनुराधा नागवडा यांचा पराभव केला. तर ,राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे बंडखोर राहुल जगताप यांना ६२,००० हून अधिक मते मिळाली आणि ते दुसऱ्या स्थानावर होते.
- इंदापूरमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे बंडखोर प्रवीण माने यांनी ३७,९१७ मते मिळवून पक्षाचे अधिकृत उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या विजयाची शक्यता कमी केली. त्यांना राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे दत्तात्रय भरणे यांच्याकडून १९,००० मतांनी पराभव पत्करावा लागला.
महायुतीची आकडेवारी बघितल्यास त्यांच्या बंडखोरांनी जुन्नर आणि चंदगडमध्ये विजय मिळविण्याव्यतिरिक्त बीड, करमाळा, माढा, रिसोड व अकोला पश्चिम मतदारसंघात चांगली खेळी केली. बीडमध्ये शिवसेनेचे बंडखोर अनिल जगताप यांना १५,६१३ मते मिळाली. तर, राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीचे योगेश क्षीरसागर यांचा ५,३२४ मतांनी पराभव केला. अकोला पश्चिममध्ये भाजपाचे बंडखोर हरीश अलीमचंदानी यांना २१,४८१ मते मिळाली. कारण- त्यांचे अधिकृत उमेदवार विजय अग्रवाल यांचा काँग्रेसच्या साजिद पठाण यांच्याकडून १,२८३ मतांनी पराभव झाला.
हेही वाचा : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला धक्का; महाराष्ट्रात निराशा अन् झारखंडमध्येही पक्ष कमकुवत, कारण काय?
माढा येथे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या मीनल साठे या तिसऱ्या स्थानावर होत्या. तर, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे अभिजित पाटील यांनी ३०,६२१ मतांच्या फरकाने राष्ट्रवादीचे बंडखोर रणजित शिंदे यांचा पराभव केला. रिसोडमध्ये भाजपाचे बंडखोर अनंतराव देशमुख यांनी काँग्रेसचे उमेदवार अमित झनक यांनी ६,१३६ मतांनी विजय मिळवला. शिवसेना (शिंदे) पक्षाच्या भावना गवळी या तिसऱ्या क्रमांकावर होत्या.