: Lok Sabha Election Result Updates: लोकसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. भाजपाने एनडीएसह ४०० पारचा नारा दिला आहे. तर दुसरीकडे एकाही एक्झिट पोलच्या चर्चेत सहभागी न होणाऱ्या काँग्रेसने २९५ + जागा मिळतील असा दावा केला आहे. इंडिया आघाडीसह इतक्या जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. एक्झिट पोल्सच्या विरोधात निकाल लागतील असं काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींनी म्हटलं आहे. आता नेमकं काय होणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.

निकालाचा दिवस, अवघ्या काही तासांत चित्र होणार स्पष्ट

आज निकालाचा दिवस असून आजच सगळं चित्र स्पष्ट होणार आहे. अशात हैदराबाद या मतदारसंघाकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. कारण असदुद्दीन ओवैसी यांचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ जिंकण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. माधवी लता यांना उमेदवारी देण्यात आली आहे. माधवी लता यांची निकालाच्या दिवशी प्रतिक्रियाही समोर आली आहे.

Maharashtra assembly election 2024
लालकिल्ला: शेवटच्या आठवड्यातील प्रचाराने लाभ कोणाला?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Dr Sachin Pavde become X factor against MLA Dr Pankaj Bhoir and Shekhar Shende
डॉ. सचिन पावडे ठरताहेत ‘ एक्स ‘ फॅक्टर, आघाडी व युतीस धास्ती.
yogi Adityanath batenge to katenge
‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक हैं तो सेफ हैं’, योगी आदित्यनाथ यांची घोषणा
Justice Chandiwal Said This Thing About Devendra Fadnavis
Justice Chandiwal : “सचिन वाझे आणि अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांना गुंतवण्याचा प्रयत्न केला, मी..”, जस्टिस चांदिवाल यांचा खुलासा
congress leader ashok gehlot slams pm modi over batenge toh katenge remarks
पंतप्रधानांकडून ‘एक है, तो सेफ है’च्या घोषणा हे देशाचे दुर्दैव; काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांचा आरोप
Asaduddin Owaisi Statement over Modi
Asaduddin Owaisi : “आंबेडकर जिंदा है तो गोडसे…”, असदुद्दीन ओवैसींची पंतप्रधान मोदींच्या विधानावर जोरदार टीका
Dhule City Polarization of votes beneficial to any candidate print politics news
लक्षवेधी लढत: धुळे शहर : मतांचे ध्रुवीकरण कोणाला फायदेशीर?

NDA vs INDIA Lok Sabha Election Result 2024 Live : एनडीएला १९१ जागांवर आघाडी तर इंडिया आघाडी १३२ जागांवर आघाडीवर

माधवी लता काय म्हणाल्या?

“आज सगळा देश निकालाची वाट पाहतो आहे, मोदींचं कमॅबक होणार आहे. फक्त देशच नाही तर सगळ्या जगाला निकालाची प्रतीक्षा आहे. मला खात्री आहे की निकाल आमच्या बाजूनेच लागेल आणि मोदी हे ४०० पार जात पुन्हा एकदा देशाचं नेतृत्व करतील. हैदराबादमधला निकालही माझ्याच बाजूने लागेल अशी मला खात्री वाटते, लोकांनी न्यायाच्या बाजूने मतदान केलं आहे त्यामुळे निकालही तसाच लागेल याची मला खात्री आहे” असं माधवी लता म्हणाल्या आहेत आणि आपल्या विजयाचाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Lok Sabha Election 2024 : हैदराबादमध्ये यंदा माधवी लता असदुद्दीन ओवेसींचा गड भेदणार का?

एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरणार?

एक्झिट पोलचे जे अंदाज शनिवारी म्हणजेच १ जून रोजी समोर आले त्यानुसार हैदराबादमध्ये भाजपाच्या उमेदवार असलेल्या माधवी लता निवडून येतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. एआयएमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांच्या विरोधात त्या उभ्या आहेत. त्या या निवडणुकीत निवडून येतील असा अंदाज चाणक्यने वर्तवला आहे. हैदराबादची जागा चार दशकांपासून ओवैसी कुटुंबाकडे आहे. जर ही जागा माधवी लतांनी जिंकली तर ओवैसींच्या या गडाला सुरुंग लागणार आहे.

हैदराबादच्या जागेच्या इतिहास

हैदराबाद हा लोकसभा मतदारसंघ चार दशकांपासून ओवैसी कुटुंबाकडे आहे. असदुद्दीन ओवैसींचे वडील सुल्तान सलाहुद्दीन ओवैसी १९८४ ते २००४ या कालावधीत याच मतदारसंघातून खासदार होते. तर सध्याच्या घडीला एआयएमआयएमचे प्रमुख चौथ्यांदा या जागेवरुन निवडून गेले आहेत. यावेळी त्यांच्या विरोधात भाजपाने माधवी लता यांना उमेदवारी दिल्याने त्या चर्चेत आल्या.

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Live Updates : महाराष्ट्रातील जनतेचा कौल कुणाला? पहिला कल हाती; लोकसभा निकालाचे प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर…

माधवी लता कोण आहेत?

माधवी लता या हैदराबादच्याच रहिवासी आहेत. त्यांचे वडील मिलट्री इंजिनिअरींग सर्व्हिसमध्ये होते. एक उत्तम वक्त्या अशी त्यांची ओळख आहे. माधवी लता यांनी हैदराबादच्या निजाम कॉलेजातून पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. त्यांनी एम. ए. ची डिग्री या महाविद्यालयातून घेतली आहे. माधवी लता या भरतनाट्यम नृत्यही करतात. तसंच त्यांना चित्रकलेचीही आवड आहे. समाजसेवा करणं हीदेखील त्यांची आवड आहे. अनेक व्हिडीओंतून त्या भजन गातानाही दिसतात. एकही मूल रडत शाळेत जाऊ नये यासाठी त्या कार्यरत आहेत. आता माधवी लता जिंकून येतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. असं घडलं तर ओवैसींविरोधात माधवी लतांना उभं करण्याची भाजपाची खेळी यशस्वी ठरेल यात शंका नाही.