Lok Sabha Election Result Updates: बारामती लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातला हाय व्होल्टेज मतदारसंघ आहे. कारण या ठिकाणी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगला होता. लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवारांच्या घरातलाच उमेदवार सुप्रिया सुळेंच्या विरोधात उभा करत भाजपाने नवी खेळी खेळली. आता या जागेवरचा निकाल काय लागतो? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जुलै २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट

जुलै २०२३ मध्ये अजित पवार हे महायुतीत सहभागी झाले. त्यानंतर शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष फुटला. दोन शकलं झालेल्या पक्षातले सर्वाधिक आमदार अजित पवारांच्या साथीला आहेत. त्या निकषावर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हे चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव अजित पवारांना दिलं. तर अजित पवारांनी शरद पवारांच्या वयाचा मुद्दा बाहेर काढत त्यांनी आता निवृत्त झालं पाहिजे असं म्हणत दंड थोपटले. मात्र शरद पवारांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत उरलासुरला पक्ष बांधण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. लोकसभा निवडणुकीत नणंद भावजय असा सामना झाला आहे. ही लढाई सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात झालेली असली तरीही हा खरा सामना शरद पवार विरुद्ध अजित पवार असाच आहे. बारामतीत आज सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर लागले आहेत. आता या हाय व्होल्टेज मतदारसंघात नेमकं काय होणार? याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे.

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Live Updates : महाराष्ट्रातील जनतेचा कौल कुणाला? पहिला कल हाती; लोकसभा निकालाचे प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर…

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर जेव्हा प्रचारसभा सुरु झाल्या तेव्हा विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा सामना रंगलेला पाहण्यास मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा पुण्यात सभा घेतली तेव्हा त्यांनी शरद पवारांचा उल्लेख अतृप्त आत्मा असा केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य चांगलंच चर्चेत राहिलं. उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि शरद पवार यांनी अतृप्त आत्म्याच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तरंही दिली. दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवार यांनीही सभा घेतल्या.

अजित पवार आणि शरद पवारांच्या सभा

बारामतीची निवडणूक अजित पवारांनी आणि शरद पवारांनी प्रतिष्ठेची केली हे प्रचारात दिसून आलं. अजित पवार यांनी शरद पवार कसे कुटुंबाच्या विरोधात गेले होते? सगळं कुटुंब शेकापसह असता शरद पवारांनी ६० च्या दशकात कशी वेगळी वाट धरली होती? इथपासून त्यांनी स्थापन केलेलं पुलोदचं सरकार स्थापन करणं, काँग्रेसविरोधात १९९९ मध्ये घेतलेली भूमिका, २०१४, २०१७ या वर्षांमध्ये तसंच २०१९ मध्ये भाजपासह झालेल्या चर्चा या सगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं. तर सुप्रिया सुळेंनी बारामती मतदारसंघात कशा प्रकारे धाक दाखवला जातो आहे, धमक्या दिल्या जात आहेत? पैसे वाटप होतं आहे? याबाबत भाष्य केलं. बारामतीचं लोकसभेचं मतदान पार पडत असताना रोहित पवार यांनीही कशाप्रकारे पैसे वाटप झालं याचे व्हिडीओ समोर आणले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर झालेलं मतदान चर्चेत राहिलं. आता निकालाचा दिवस उजाडला आहे.

NDA vs INDIA Lok Sabha Election Result 2024 Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी आघाडीवर तर राहुल गांधीही आघाडीवर

बारामतीचा कौल कुणाला?

आज बारामतीकरांचा कौल कुणाला? ताईंना की वहिनींना ते उघड होणार आहे. जर सुप्रिया सुळे जिंकल्या तर शरद पवार आजही राजकारणात कुणालाही धोबीपछाड देऊ शकतात, त्यात ते पुतण्यालाही सोडत नाहीत हे स्पष्ट होईल. जर सुनेत्रा पवार जिंकल्या तर अजित पवारांनी केलेली खेळी यशस्वी होईल, त्यामागे भाजपाने खेळलेली खेळी हे सगळं यशस्वी होईल.