Lok Sabha Nivadnuk 2024 Schedule : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (१६ मार्च) लोकसभेच्या ५४३ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार, १९ एप्रिलपासून मतदानप्रक्रिया सुरू होणार असून ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान, लोकसभेच्या ५४३ जागा असताना निवडणूक आयोगाने ५४४ जागांसाठी कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे एक मतदारसंघ वाढला की काय असा प्रश्न मतदारांना पडला आहे. याबाबत निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी या वाढलेल्या एका जागेचं गणित स्पष्ट केलं आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, मणिपूरमधील दोन मतदारसंघांपैकी एका मतदारसंघात दोन टप्प्यांत मतदान होणार आहे, ज्यामुळे लोकसभेच्या एकूण जागांची संख्या ५४४ वर पोहोचली. मणिपूरमधील लोकसभेच्या दोन जागांसाठी १९ आणि २६ एप्रिल रोजी दोन टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. अंतर्गत मणिपूर आणि बाह्य मणिपूरच्या काही भागात १९ एप्रिलला पहिल्या टप्प्यात आणि २६ एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात मतदान होईल. बाहेरील मणिपूरमध्ये पुन्हा मतदान होईल. गेल्या वर्षी ३ मे रोजी दोन समुदायांमधील वांशिक संघर्ष सुरू झाल्यापासून वारंवार होणाऱ्या हिंसाचाराने ग्रासलेल्या राज्यातील विस्थापनामुळे एका जागेवर दोनदा मतदान होणार आहे.

Congress List for delhi assembly Election
Delhi Election : आता दिल्ली विधानसभेची धूम! काँग्रेसने जाहीर केली २१ उमेदवारांची यादी, अरविंद केजरीवालांसमोर तगडा उमेदवार!
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Rahul Gandhi And Arvind Kejriwal.
Delhi Election 2025 : काँग्रेसला हवी ‘आप’ची साथ, ‘हात’ मिळवण्यास केजरीवालांचा नकार
देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं? बावनकुळे म्हणाले... (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं?
one nation one election
मोठी बातमी! केंद्रीय मंत्रिमंडळाची ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी
Ravindra Waikar And Amol Kirtikar
Ravindra Waikar : रवींद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार? मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला निर्णय
Mahavikas Aghadi News
विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच?
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक

हेही वाचा >> Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, EC कडून सात टप्प्यांतील कार्यक्रम जाहीर; महाराष्ट्रात केव्हा होणार मतदान?

“या हिंसाचारामुळे अनेक लोक विस्थापित झाले आहेत. आमचे कर्मचारी, आमची मानव संसाधनेही विस्थापित झाली आहेत. त्यामुळे, असे काही जिल्हे आहेत जिथे मनुष्यबळाची कमतरता आहे. आम्हाला निवडणुका घेण्यासाठी ठराविक लोकांची गरज आहे”, असे मणिपूरचे मुख्य निवडणूक अधिकारी पीके झा म्हणाले. तसेच सुरक्षेच्या पैलूकडे लक्ष देताना, आम्ही पुरेशा सुरक्षा कर्मचाऱ्यांसह विचार केला, जास्तीत जास्त क्षेत्र शक्य तितक्या लवकर कव्हर केले जाईल. ईशान्येमध्ये पाऊस खूप लवकर सुरू होतो, त्यामुळे लवकरात लवकर निवडणुका पार पाडणे चांगले आहे”, असंही ते पुढे म्हणाले.

छावण्यांमधून मतदान करण्याची परवानगी

मणिपूरच्या अंतर्गत आणि बाह्य जागा अनुक्रमे भाजपा आणि नागा पीपल्स फ्रंट (NPF) कडे आहेत. बाह्य मणिपूर जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव आहे. निवडणूक आयोगाने असेही जाहीर केले की मणिपूरमधील छावण्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना आगामी निवडणुकीत त्यांच्या छावण्यांमधून मतदान करण्याची परवानगी दिली जाईल.

“आम्ही सर्व व्यवस्था करू. आम्ही एक योजना आखली आहे, जी आम्ही छावण्यातील मतदारांना छावण्यांतून मतदान करू देण्यासाठी अधिसूचित केली आहे. जशी जम्मू-काश्मीर स्थलांतरितांसाठी एक योजना आहे, तशीच योजना मणिपूरमध्ये लागू केली जाईल. मतदारांना संबंधित कॅम्पमधून मतदान करण्याची परवानगी दिली जाईल”, असं कुमार म्हणाले.

हेही वाचा >> ‘ईव्हीएम’वर प्रश्न येताच मुख्य निवडणूक आयुक्तांनी शायरीतून दिले उत्तर; म्हणाले, “वफा तुमसे..”

५० हजारांहून अधिक लोक छावण्यांमध्येच

“मतदारांना माझे आवाहन आहे की, शांततेने निवडणुकीत सहभागी होऊन मतपत्रिकेद्वारे मतदान करा, आम्ही सर्व व्यवस्था करू”, असेही ते पुढे म्हणाले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, २५ हजारांहून अधिक लोकांची सुरक्षा दलांनी सुटका केली आहे तर सुमारे ५० हजार लोक अशांततेनंतर छावण्यांमध्ये राहत आहेत.

भाजपाचा ४०० पारचा नारा

लोकसभा निवडणुकीत ९६ कोटींहून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यास पात्र आहेत, त्यापैकी ४९.७२ कोटी पुरुष आणि ४७.१ कोटी महिला मतदार आहेत. प्रथमच मतदान करणारे १.८२ कोटी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपला ३७० जागा आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ४०० हून अधिक जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त केला असून चार दशकांतील उच्चांक गाठण्याचे लक्ष्य त्यांनी ठेवले आहे.

Story img Loader