कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी १० मे रोजी मतदान पार पडणार आहे. तर, १३ मे रोजी निकाल हाती येतील. त्यापार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजपात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. काँग्रेसकडून कर्नाटकातील भाजपा सरकारवर ४० टक्के कमिशन घेतल्याचा सातत्याने आरोप करण्यात येत आहे. याला आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेसच्या राजवटीत ८५ टक्के कमिशन घेतलं जात होतं, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.

कोलार येथे प्रचार सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी म्हटलं, “८५ टक्के कमिशन हीच काँग्रेसची ओळख आहे. काँग्रेसच्या राजवटीत त्यांचे नेते आणि तत्कालीन पंतप्रधान सांगायचे की, केंद्र सरकारने १ रुपया पाठवला तर, लोकांपर्यंत केवळ १५ पैसे पोहचत होते.”

Maharashtra Deputy CM Ajit Pawar Dissolves NCP Beed Unit
राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; मंत्री धनंजय मुंडे यांना धक्का
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Pankaja Munde
Pankaja Munde : बीड जिल्ह्यातील तणावाच्या परिस्थितीवर पंकजा मुंडेंचं मोठं विधान; म्हणाल्या, “मी गृहमंत्र्यांशी…”
Devendra Fadnavis and PM Narendra Modi
Devendra Fadnavis : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “देवाभाऊ” म्हणताच दिलखुलास हसले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नेमकं काय घडलं?
Hemlata Patil
Hemlata Patil : काँग्रेसला मोठा धक्का? ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रवक्त्या डॉ.हेमलता पाटील पक्ष सोडणार?
PM Modi
PM Narendra Modi : “विस्तारवाद नाही, विकासवादाच्या भावनेने काम सुरू”, मुंबईत युद्धनौका आणि पाणबुडीचे उद्घाटन केल्यानंतर मोदींची प्रतिक्रिया
What Ajit Pawar Said?
Ajit Pawar : धनंजय मुंडे नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देणार का? विचारताच अजित पवारांचं उत्तर, “मी इतकं स्पष्ट सांगतो….”
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : सत्ताधाऱ्यांच्या लांगूलचालनाचे उदाहरण

हेही वाचा : Karnataka Election: “…तर मला विषारी साप बनणं मंजूर”, पंतप्रधान मोदी यांचं विधान!

“यासारखा पक्ष कधीही राज्याचा विकास करू शकत नाही. भाजपाच्या राजवटीत १०० टक्के पैसा गरिबांपर्यंत पोहचतो,” असेही पंतप्रधानांनी सांगितलं.

गांधी कुटुंबावर अप्रत्यक्षपणे टीका करत पंतप्रधान मोदी म्हणाले, “हजारो कोटी रुपयांची अफरातफर केल्याप्रकरणी काँग्रेसचं ‘शाही’ कुटुंब आणि त्यांचे सहकारी जामिनावर आहेत. पक्षाचे मुख्य नेतेच भ्रष्टाचारात गुंतलेले आहेत. त्यामुळे काँग्रेस भ्रष्टाचारविरोधी असू शकत नाही. फक्त भाजपाच भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करू शकते.”

हेही वाचा : “मन की बातदरम्यान अनेकदा भावूक झालो, त्यामुळे रेकॉर्डिंग…”, १०० व्या एपिसोडमध्ये नरेंद्र मोदींनी सांगितले किस्से

“भ्रष्टाचाराविरुद्ध सुरू असलेल्या लढाईमुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता परसली आहे. त्यामुळे माझा द्वेष करत व्यक्तीगत हल्ले करण्यात येत आहेत,” असे पंतप्रधान मोदींनी सांगितलं.

Story img Loader