95 Year Old Voter : गोंदिया येथे एका ९५ वर्षीय ( 95 Year Old Voter ) आजोबांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी तरुणाईलाही लाजवेल असा उत्साह त्या आजोबांमधे बघायला मिळाला. तरुणांनी मतदान करून लोकशाहीला बळकट करावे असे आवाहन लक्ष्मण बेडेकर या ९५ वर्षीय आजोबांनी केले आहे. महाराष्ट्रात लोकशाहीचा उत्सव पार पडतो आहे. खरंतर सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहमतदानाची सोय केली होती. मात्र आपण बूथवर जाऊन मतदान करणार असं लक्ष्मण बेडेकर ( 95 Year Old Voter ) यांनी त्यांच्या मुलाला सांगितलं. तसंच ते त्यांचा मुलगा प्रसाद बेडेकर यांच्यासह मतदान करायला केंद्रावर आले होते.

महायुती विरुद्ध मविआचा सामना

महाराष्ट्रात मतदान पार पडतं आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगतो आहे. यामध्ये कुणाची सरशी होणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी दोहोंनीही विजयाचा दावा केला आहे. राज ठाकरेंच्या मनसेचे उमेदवारही मैदानात आहेत. राज ठाकरेंनीही गेल्या काही दिवसांपासून प्रचार करुन आम्हाला निवडून द्या म्हणून आवाहन केलं आहे. तिसरी आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांनीही उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. महाराष्ट्रात एका टप्प्यात मतदान पार पडणार असून २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. या निकालाकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे. दरम्यान सकाळपासून मतदानाची टक्केवारी कमी आहे. मात्र ९५ वर्षांच्या आजोबांनी ( 95 Year Old Voter ) मतदान केंद्रावर मुलासह येत मतदानाचा हक्क बजावला आहे.

Khadakwasla gets highest voter turnout after Kasba
कसब्या पाठोपाठ खडकवासल्यात सर्वाधिक मतदान, दुपार पर्यंत २९ टक्के मतदानाची नोंद
45 thousand Gowari community voters in bhandara district boycotted voting
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : जिल्ह्यातील ४५ हजारांवर…
Govinda
‘गोविंदा ते हेमा मालिनी’, बॉलीवूडच्या ‘या’ कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
Maval votes, Maval Pattern, Maval voting,
मावळमध्ये दुपारपर्यंत किती मतदान? मावळ ‘पॅटर्न’चे काय होणार?
no alt text set
Devendra Fadnavis: “आवाज सुप्रिया सुळेंसारखा, पण…”; फडणवीसांची बिटकॉइन घोटाळा ऑडिओ क्लिपवर प्रतिक्रिया
Slow voting for assembly elections
Maharashtra assembly elections 2024 : मतदान संथगतीने
If Nagpurians morning enthusiasm continues achieving 75 percent voting target will be easy
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळच्या सत्रात नागपूरकरांचे उत्साहपूर्ण मतदान, ७५ टक्के मतदानाकडे वाटचाल?
sharad pawar Ajit Pawar injustice statement maharashtra vidhan sabha election 2024
चार वेळा उपमुख्यमंत्रीपद दिल्यानंतरही अजित पवारांवर अन्याय कसा झाला?…शरद पवार यांचा सवाल
Sameer Bhujbal vs Suhas Kande (1)
“आज तुझा मर्डर फिक्स”, सुहास कांदेंची समीर भुजबळांना धमकी; म्हणाले, “त्यांचे गुंड आले मला…”

हे पण वाचा- Devendra Fadnavis: “आवाज सुप्रिया सुळेंसारखा, पण…”; फडणवीसांची बिटकॉइन घोटाळा ऑडिओ क्लिपवर प्रतिक्रिया

काय म्हणाले प्रसाद बेडेकर?

“माझे वडील लक्ष्मण बेडेकर ९५ वर्षांचे ( 95 Year Old Voter ) आहेत. सरकारने त्यांच्यासाठी गृह मतदानाची सोय केली होती. मात्र मला पाहून बाकी लोकही केंद्रावर येतील आणि मतदान करतील अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली. माझी आई देखील ८२ वर्षांची आहे. माझे वडील आणि आई या दोघांनीही केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्राच्या भविष्यासाठी मतदान केलं पाहिजे हे तरुणाईला कळावं म्हणून ते बुथवर आले.” असं लक्ष्मण बेडेकर यांचा मुलगा प्रसाद बेडेकर यांनी सांगितलं.

लक्ष्मण बेडेकर काय म्हणाले?

“मी आज माझ्या पत्नीसह मतदान केंद्रावर आलो आहे. लोकशाही बळकट झाली पाहिजे म्हणून मी आज बुथवर येऊन मतदान करतो आहे.” असं लक्ष्मण बेडेकर यांनी म्हटलं आहे. लक्ष्मण बेडेकर ( 95 Year Old Voter ) यांनी त्यांच्या पत्नीसह येऊन मतदान केलं.