Jammu and Kashmir Assembly Election 2024 Vote Counting Updates : जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या मतदारसंघात सर्वांत आधी प्रचारसभा घेतली होती, त्याच जागेवरून भाजपाचा पराभव झाला आहे. डोडा विधानसभा मतदारसंघात भाजपाचे गजय सिंग राणा यांची पिछेहाट झाली असून आम आदमी पक्षाने येथे खातं उघडलं आहे. आपचे मेहराज मलिक येथे विजयी झाले आहेत. आपचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक्स वरून मेहराज मलिक यांचंं अभिनंदन केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जम्मू काश्मीरच्या निवडणुकीसाठीचे (J & K Elections) भाजपाचे स्टार प्रचारक होते. १४ सप्टेंबर रोजी दोडा या ठिकाणी असलेल्या मैदानावर मोदींनी सभा घेतली. जम्मू काश्मीरची निवडणूक (J & K Elections) जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही पहिली सभा होती. परंतु, त्याच जागेवर भाजपाचा पराभव झाला आहे. एवढंच नव्हे तर गेल्या ४० वर्षांत या ठिकाणी भेट देणारे ते एकमेव पंतप्रधान ठरले होते. तरीही त्यांचा या मतदारसंघावर करिष्मा चालला नाही.

Congress List for delhi assembly Election
Delhi Election : आता दिल्ली विधानसभेची धूम! काँग्रेसने जाहीर केली २१ उमेदवारांची यादी, अरविंद केजरीवालांसमोर तगडा उमेदवार!
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Rahul Gandhi And Arvind Kejriwal.
Delhi Election 2025 : काँग्रेसला हवी ‘आप’ची साथ, ‘हात’ मिळवण्यास केजरीवालांचा नकार
देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं? बावनकुळे म्हणाले... (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं?
one nation one election
मोठी बातमी! केंद्रीय मंत्रिमंडळाची ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी
Ravindra Waikar And Amol Kirtikar
Ravindra Waikar : रवींद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार? मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला निर्णय
महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का?
Sudhir Mungantiwar On Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? महत्त्वाची माहिती समोर

हेही वाचा >> Jammu and Kashmir Assembly Election Result 2024 Live : इंडिया आघाडी बहुमताच्या जवळ; फारुख अब्दुल्ला यांनी जाहीर केलं मुख्यमंत्र्याचं नाव

निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळानुसार दुपारी २ वाजता मेहराज मलिक चार हजार ७७० मतांनी पुढे होते. जम्मू काश्मीरमध्ये आपला संधी मिळणं ही आश्चर्याची गोष्ट मानली जातेय. कारण हरियाणासारख्या राज्यात आपची पिछेहाट झालेली आहे.

डोडामधून आम आदमी पक्षाचे उमेदवार मेहराज मलिक यांनी भाजपाच्या उमेदवाराला हरवून शानदार यश मिळवलं आहे. त्यासाठी त्यांचे खूप खूप अभिनंदन. तुम्ही खूच चांगल्या प्रकारे निवडणूक लढलात. आपने पाचव्या राज्यात आमदार जिंकवल्याने पक्षाचेही आभार, असं आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय.

मेहराज मलिक होते सतत चर्चेत

आपने २०२२ मध्ये डोडामध्ये भव्य रॅली काढली होती. तेव्हापासून आप तिथे सक्रिय आहे. तर, मलिक हे डोडा जिल्हा विभाग परिषदेचे सदस्य असून स्थानिक प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेण्यावरून ते सतत चर्चेत होते. रस्ता रोको करणे, अधिकाऱ्यांना कार्यालयात डांबून ठेवणे आदी प्रकरणांमुळे त्यांच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

Story img Loader