AAP Vote Counting Highlights, Delhi Election Results 2025 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर अटीतटीच्या ठरलेल्या राजधानी दिल्ली विधानसभेचा निकाल जाहीर होणार आहे. ५ फेब्रुवारी रोजी झालेल्या मतदानोत्तर चाचणीत दिल्लीत सत्तांतर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे ‘आप’साठी ही धोक्याची घंटा समजली जातेय. गेल्या काही वर्षात आम आदमी पक्षाच्या अनेक नेत्यांवर अनेकविध आरोप करून सत्ता उलथवून टाकण्याचा प्रयत्न विरोधकांकडून करण्यात आला. याच काळात तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुरुंगवास भोगावा लागला. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. यातच त्यांना त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे २०२५ ची विधानसभा निवडणूक ‘आप’साठी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. दरम्यान, आज सकाळी आठ वाजल्यापासून दिल्लीत मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

दरम्यान, लोकसभेसाठी एकत्र आलेल्या इंडिया आघाडीतील आप आणि काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. परिणामी दिल्लीत तिहेरी लढत पाहायला मिळाली. यामुळे मतविभाजनाचा फटका बसण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. २०१५ आणि २०२० च्या निवडणुकीत आम आदमी पार्टीने बहुमतासह दिल्लीचे तख्त राखले. मात्र, यंदाच्या निवडणुकीत भाजपासह काँग्रेसने सत्ताधाऱ्यांपुढे मोठं आव्हान उभं केलं. राजधानीतील गेल्या दोन निवडणुकांमध्ये ‘आप’ने काही जागांवर कमी मताधिक्याच्या फरकाने विजय मिळवला होता. यंदाच्या निवडणुकीतही याच जागा सत्ताधाऱ्यांसाठी यशाची गुरुकिल्ली ठरू शकतात.

दरम्यान, नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून अरविंद केजरीवाल आणि पर्वेश सिंग यांच्यात कडवी झुंज सुरू आहे. दोघेही २०० च्या फरकाने मागे-पुढे आहेत.

एक्झिट पोलचे अंदाज काय सांगतात?

तीन मतदानोत्तर चाचण्यांनी भाजपला दोनतृतीयांशपेक्षाही जास्त जागा म्हणजे ५०-६० जागा मिळू शकतील असे भाकीत केले आहे. दोन चाचण्यांचा अपवाद वगळता इतर अंदाजांनी भाजप बहुमताचा ३६ चा आकडा सहज पार करेल असे सुचित केले आहे. ८ चाचण्यांनी भाजपला ३५ ते ४९ जागा मिळू शकतील असे मानले आहे. ‘पीपल्स पल्स’ संस्थेच्या अंदाजामध्ये भाजपला प्रचंड झुकते माप मिळाले असून केंद्रातील सत्ताधारी पक्षाला ७० जागांपैकी तब्बल ५१ ते ६० जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.

Live Updates

Aam Aadmi Party Delhi Election 2025 Results LIVE, 08 Feb 2025 : दिल्लीत आप राखणार का गड?

20:47 (IST) 8 Feb 2025

Rahul Gandhi Post on Delhi vidhan sabha elections Result: दिल्ली निकालांवर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया...

राहुल गांघींची दिल्ली निकालांवर पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “आम्ही दिल्लीचा जनादेश स्वीकार करतो. दिल्लीतील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना त्यांच्या योगदानासाठी आणि सर्व मतदारांना त्यांच्या समर्थनासाठी धन्यवाद. प्रदूषण, महागाई, भ्रष्टाचाराच्या विरोधात, दिल्लीची प्रगती व दिल्लीकरांच्या अधिकारांसाठीची ही लढाई अशीच चालू राहील”!

17:53 (IST) 8 Feb 2025

केजरीवाल, सिसोदियांपाठोपाठ सत्येंद्र जैनही पराभूत

केजरीवाल, सिसोदियांपाठोपाठ सत्येंद्र जैनही शकूर बस्ती विधानसभा मतदारसंघातून पराभूत

17:27 (IST) 8 Feb 2025

BJP Delhi Election Results History : दिल्लीत २७ वर्षांनी भाजपाचा वनवास संपला, १९९८ पासून पक्षाची स्थिती कशी राहिली?

देशाची राजधानी दिल्लीत जनेतेने सत्तांतर निवडलं आहे. भाजपाने बहुमत मिळवलं असून गेल्या १२ वर्षांपासून सत्तेत असलेल्या आपला त्यांनी नाकारलं आहे. भाजपाने ४८ जागांवर विजय मिळवला असून आपने २२ जागा आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. दरम्यान, २०१५ च्या निवडणुकीत अवघ्या ३ जागा मिळवणाऱ्या भाजपाने दहा वर्षांत मुसंडी मारून सर्वाधिक जागा राजधानीत कमावल्या आहेत. त्यामुळे २००८ पासून भाजपाची दिल्लीत काय स्थिती राहिली यावर एक नजर मारुया.

सविस्तर वृत्त वाचा

14:49 (IST) 8 Feb 2025

AAP Winner Candidate List Delhi Election : दिल्लीत आपचा पराभव, संपूर्ण विजयी उमेदवारांची यादी पाहा!

आपचे मुख्य नेते असलेले अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, मुख्यमंत्री आतिशी आणि सत्येंद्र जैन यांचाही पराभव झाला आहे. त्यामुळे दिल्लीत आपचं अस्तित्वच आता धोक्यात आलं आहे. दरम्यान, आपच्या संपूर्ण विजयी उमेदवारांची यादी पाहुयात.

सविस्तर वृत्त वाचा

14:42 (IST) 8 Feb 2025

LIVE : निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

https://twitter.com/ArvindKejriwal/status/1888148931043102966

13:44 (IST) 8 Feb 2025

LIVE : "दिल्लीत अहंकार आणि अराजकतेचा पराभव होऊन...", निवडणूक निकालांवर अमित शाहांचं सूचक ट्वीट

दिल्लीत खोट्या शासनाचा अंत झाला. येथे अहंकार आणि अराजकतेचा पराभव झाला. येथे मोदी की गॅरंटी आणि मोदींच्या विकासाच्या व्हिजनवर दिल्लीकर विजयी झाले आहेत. या प्रचंड जनादेशासाठी दिल्लीच्या जनतेचे मनापासून आभार. मोदींच्या नेतृत्त्वातील भाजपाने आपले सर्व आश्वासने पूर्ण करून दिल्लीला देशातील एक नंबर राजधानी बनवण्याचा संकल्प ठेवला आहे - अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री

https://twitter.com/AmitShah/status/1888135988775674335

13:31 (IST) 8 Feb 2025

Delhi assembly election 2025 Live: आप उमेदवाराला पराभूत केल्यानंतर भाजपाचे पर्वेश सिंग यांच्या समर्थकांकडून जल्लोष

https://twitter.com/ANI/status/1888133463922106446

12:01 (IST) 8 Feb 2025
'आप'चा पाय खोलात; आजी-माजी मुख्यमंत्र्यांचं भवितव्य धोक्यात!

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत हाती येत असलेल्या कलांनुसार आपच्या जागा आणखी कमी झाल्या आहेत. सकाळी ११ वाजेपर्यंत आप २८ ते ३० जागांवर आघाडीवर होता. परंतु, आता आम आदमी पक्ष २४ जागांवर आघाडीवर असून भाजपा ४६ जागांवर आघाडीवर आहे. तर, भाजपाच्या पुढे गेलेल्या अरविंद केजरीवाल आता पिछाडीवर असून दोन्ही उमेदवारांमध्ये जवळपास ११७० मतांचा फरक आहे.

11:03 (IST) 8 Feb 2025

Delhi Live election : अरविंद केजरीवाल २०० मतांनी पिछाडीवर

अरविंद केजरीवाल २०० मतांनी पिछाडीवर

10:38 (IST) 8 Feb 2025

Delhi Assembly Election 2025 Results Live: भाजपाची ४२ जागांवर तर आपची २८ जागांवर आघाडी

निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळानुसार भाजपा ४२ जागांवर तर आम आदमी पक्ष २८ जागांवर आघाडीवर आहे.

09:53 (IST) 8 Feb 2025
ही साधारण निवडणूक नाही, चांगल्या-वाईटातील लढाई- आतिशी

ही साधारण निवडणूक नव्हती. ही एक चांगल्या आणि वाईटातील लढाई होती. ही गुंडागर्दीची लढाई होती. मला पूर्ण विश्वास आहे की पूर्ण दिल्लीचे नागरिक चांगल्या गोष्टींसाठी आणि आप पक्षासाठी उभे राहतील. मी पूर्वीच सांगितलं आहे की अरविंद केजरीवाल चौथ्यांदा मुख्यमंत्री बनणार. आज सायंकाळपर्यंत संपूर्ण निकाल समोर येईल - आतिशी, मुख्यमंत्री, दिल्ली

https://twitter.com/AamAadmiParty/status/1888065427223290267

09:50 (IST) 8 Feb 2025

BJP Delhi Election Results 2025 Live: भाजपाने ४६ जागांवर घेतली आघाडी, बहुमताचा आकडा केला पार; तर ‘आप’?

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी दि. ५ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडले. ९४.६ लाख मतदारांनी राजधानी दिल्लीचा निर्णय मतपेटीत बंद केला. आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल हे चौथ्यांदा मुख्यमंत्री बनणार की भाजपा २७ वर्षांनी दिल्लीत सत्ता स्थापन करणार? याचा निकाल आज (शनिवार, ८ फेब्रुवारी) रोजी लागणार आहे. दिल्लीकरांसह संबंध देशाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. दिल्लीचा निकाल हा देशातील राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.

लाईव्ह ब्लॉगवर क्लिक करा आणि अपडेट राहा

09:49 (IST) 8 Feb 2025

Delhi Assembly Election 2025 Results LIVE Updates: “और लडो आपस में”, दिल्लीत आप-काँग्रेस पिछाडीवर ओमर अब्दुल्लांची खोचक पोस्ट!

Delhi Election Results 2025 Vote Counting LIVE Updates: दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडलं. दिल्लीतल्या ७० जागांसाठी आम आदमी पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांनी कंबर कसली होती. एकीकडे अरविंद केजरीवाल यांची अटक, सुटका आणि त्यानंतरच्या घडामोडींनंतर आम आदमी पक्षानं सत्ता कायम राखण्यासाठी जोरदार प्रयत्न केले असताना दुसरीकडे काँग्रेसकडून प्रचारासाठी दिल्ली पुन्हा काबीज करण्यासाठी दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवलं होतं. या दोन्ही पक्षांसमोर यंदा कडवं आव्हान होतं ते भारतीय जनता पक्षाचं. त्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं होतं.

लाईव्ह ब्लॉगवर अपडेट्स वाचा

09:15 (IST) 8 Feb 2025

AAP Delhi Election Results 2025 LIVE :

भाजपाची ४३ जागांवर आघाडी तर आप २६ जागांवर आघाडी

09:05 (IST) 8 Feb 2025

LIVE : प्राथमिक फेरीत आपचे आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर; अरविंद केजरीवालांचं मुख्यंमत्री पद धोक्यात?

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्यांचे विरोधक उमेदवार पर्वेश वर्मा पिछाडीवर आहेत. अरविंद केजरीवाल नवी दिल्ली मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

कलकाजी मतदारसंघातून मुख्यमंत्री अतिशी याही पिछाडीवर असून येथे भाजपाच्या रमेश बिधुरी आघाडीवर आहेत.

माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया हेही जंगपुरा मतदारसंघातून पिछाडीवर आहेत.

08:50 (IST) 8 Feb 2025

AAP Delhi Election Results 2025 LIVE : प्राथमिक मतमोजणीत अरविंद केजरीवाल भाजपा उमेदवाराच्या मागे

माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल प्राथमिक फेरीतील निकालातून भाजपा उमेदवाराच्या मागे आहेत. सध्या पोस्टल मतमोजणी सुरू आहे.

08:44 (IST) 8 Feb 2025

AAP Delhi Election Results 2025 LIVE : पोस्टल मतमोजणीत भाजपा आघाडीवर, आप दुसऱ्या क्रमांकावर; कोण किती जागांवर आघाडीवर?

पोस्टल मतमोजणीत ८.४० वाजेपर्यंत भाजपा ३२ जागांवर, आप २५ जागांवर तर, काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे.

08:21 (IST) 8 Feb 2025

AAP Delhi Election Results 2025 LIVE : "आम्ही बहुमताने सरकार स्थापन करू", आप नेत्यांचा विश्वास

https://twitter.com/ANI/status/1888057580259524770

08:10 (IST) 8 Feb 2025

AAP Delhi Election Results 2025 LIVE : अरविंद केजरीवाल पुन्हा मुख्यमंत्री होणार, मुख्यमंत्री अतिशी यांनी व्यक्त केला विश्वास

https://twitter.com/ANI/status/1888052314956775803

08:09 (IST) 8 Feb 2025

AAP Delhi Election Results 2025 LIVE : दिल्लीत मतमोजणीला सुरुवात, कोणाच्या बाजूने लागणार कौल?

https://twitter.com/ANI/status/1888052763684389151

07:22 (IST) 8 Feb 2025

AAP Delhi Election Results 2025 LIVE : थोड्याच वेळात सुरुवात होणार मतमोजणीला, उमेदवार देवाच्या चरणी लीन

ग्रेटर कैलाश मतदारसंघाचे आपचे उमेदवार सौरभ भारद्वाज यांनी काकलजी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. सकाळी आठ वाजल्यापासून दिल्लीत मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

https://twitter.com/ANI/status/1888042259930828911

03:50 (IST) 8 Feb 2025

अखेरच्या टप्प्यात ‘आप’च्या मदतीला काँग्रेस?

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा हा अखेरचा आठवडा असून भाजपविरोधात आम आदमी पक्षाच्या मदतीला काँग्रेस धावून आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. काँग्रेस सर्वच्या सर्व ७० जागांवर लढत असला तरी पक्षाने फक्त ७-८ मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. ‘आप’विरोधात राहुल गांधी अचानक आक्रमक झाले असले तरी, त्यामागे काँग्रेसचा स्वतःची ४ टक्के मते कायम राखण्याचा प्रयत्न आहे. त्याचा ‘आप’ला अधिक फायदा होऊ शकेल असे मानले जात आहे.

02:27 (IST) 8 Feb 2025

Political News : आम आदमी पार्टीच्या ८ विद्यमान आमदारांनी भाजपात प्रवेश का केला?

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना भाजपाला मोठा बूस्टर डोस मिळाला. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीतील आठ विद्यमान आमदारांनी भाजपात प्रवेश केला. महत्त्वाची बाब म्हणजे ‘आप’ला राम राम ठोकणाऱ्या आठपैकी सात आमदारांचं तिकीट पक्षानं कापलं होतं. मात्र, या आमदारांनी पक्ष सोडताना राज्यातील वाढता भ्रष्टाचार आणि पक्षांतर्गत लोकशाहीच्या अभावाची कारणं दिली. इतकंच नाही, तर त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि तत्त्वांपासून दूर गेल्याचा आरोपही केला. सविस्तर वृ्त्त वाचा

01:37 (IST) 8 Feb 2025
Delhi assembly elections 2025: केजरीवाल, सिसोदिया, आतिशींवर पराभवाची टांगती तलवार?

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होण्यास काही तासांचा अवधी राहिला असून दिल्लीचे आजी-माजी मुख्यमंत्री आतिशी व अरविंद केजरीवाल तसेच, मनीष सिसोदिया या दिग्गज नेत्यांसमोर पराभवाची टांगती तलवार असल्याची चर्चा दिल्लीत रंगली आहे. सविस्तर वृत्त वाचा

01:06 (IST) 8 Feb 2025

राहुल गांधींच्या रडारवर केजरीवालच का? काँग्रेसचं राजधानीत पुनरागमनासाठीचं धोरण काय?

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. या प्रचारादरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या जोरदार हल्लाबोल केला. निवडणूक काळात दोन्ही बाजूने एकमेकांवर जोरदार टीका झाली. आगामी काळात हे दोन्ही पक्ष व त्यांचे नेते इंडिया आघाडीच्या एखाद्या बैठकीला उपस्थित राहतील तेव्हा हीच टीका गुंतागुंतीची ठरू शकते. सविस्तर वृत्त वाचा

00:39 (IST) 8 Feb 2025

Political News : राजधानी दिल्लीत कुणाची सत्ता येणार? आकडेवारीने वाढवलं केजरीवालांचं टेन्शन

दिल्ली विधानसभा निवडणूक नेहमीच संपूर्ण देशात चर्चेचा आणि उत्सुकतेचा विषय ठरते. २०१५ आणि २०२० च्या निवडणुकीत आम आदमी पार्टीने बहुमतासह दिल्लीचे तख्त राखले. मात्र, यंदाच्या निवडणुकीत भाजपासह काँग्रेसने सत्ताधाऱ्यांपुढे मोठं आव्हान उभं केलं आहे. राजधानीतील गेल्या दोन निवडणुकांमध्ये ‘आप’ने काही जागांवर कमी मताधिक्याच्या फरकाने विजय मिळवला होता. सविस्तर वृत्त वाचा

00:15 (IST) 8 Feb 2025

‘आप’ चौथ्यांदा, की… भाजपला ३१ वर्षांनी संधी?

दिल्ली विधानसभेची निवडणूक नेहमीच संपूर्ण देशभरात चर्चेचा आणि उत्सुकतेचा विषय ठरते. २०२५ मध्ये दिल्लीतील विद्यमान आम आदमी पक्षाचे (आप) सरकार १३ वर्षे पूर्ण करत आहे. आता पुन्हा एकदा चौथ्या टर्मसाठी केजरीवाल आणि त्यांचा पक्ष निवडणुकीच्या आखाड्यात उतरला आहे. यापूर्वी २०१३, २०१५ आणि २०२० या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये ‘आप’ने सहज विजय मिळवला आणि अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे लोकप्रिय मुख्यमंत्री झाले. सविस्तर वृत्त वाचा

22:52 (IST) 7 Feb 2025

दिल्लीत भाजपा सत्तेत येण्याचा Exit Poll चा अंदाज; गेल्या तीन निवडणुकांमध्ये किती अचूक होते एक्झिट पोल

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी ४८ तासांपेक्षा कमी वेळ शिल्लक आहे. यादरम्यान आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी गुरूवारी भारतीय जनता पक्षावर उमेदवार फोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. सविस्तर वृत्त वाचा

22:14 (IST) 7 Feb 2025

Delhi Assembly Election : दिल्ली विधानसभा निवडणुकीत रंगणार आप विरुद्ध भाजपा सामना, ‘या’ ९ मतदारसंघात होणार चुरशीची लढत

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. यापूर्वी भाजपा विरूद्ध आम आदमी पक्ष असा जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. यामध्ये दिल्लीतील नऊ मतदारसंघात तर हा संघर्ष किंचित जास्त दिसून येत आहे. कारण येथे २०२० साली झालेल्या निवडणुकीत विजयाचा फरक हा ४००० मतांपेक्षा कमी होता. सविस्तर वृत्त वाचा

Arvind Kejriwal

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (संग्रहित छायाचित्र)

Aam Aadmi Party Delhi Election 2025 Results LIVE, 08 Feb 2025 : दिल्लीत आप राखणार का गड?

Story img Loader