महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे. राज्यात महाविकास आघाडी व महायुती या दोन प्रमुख आघाड्यांमध्ये राजकीय सामना असला, तरी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांचं अस्तित्व सत्ताधारी व विरोधी पक्ष अशा दोन्ही बाजूला दिसून येत आहे. या विचित्र राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारी एक कविता अतुल कुलकर्णी यांनी लोकसत्तासाठी लिहिली आहे. त्यामध्ये राजकीय नेत्यांना समज देतानाच मतदार म्हणून आपल्या चुकांवरही अतुल कुलकर्णी यांनी बोट ठेवलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नेहमीच राजकीय मुद्द्यांवर ठाम व परखड भाष्य करणारे अभिनेते अतुल कुलकर्णी तटस्थपणे राजकीय पक्ष व जनतेचं मूल्यांकन या कवितेच्या माध्यमातून करताना दिसत आहेत. तसेच, स्वत: एक मतदार म्हणून आपण कुठे चुकत आहोत, हेही ते या कवितेत मांडत आहेत.

“आजच्याइतकी हतबुद्धता कधीच आली नव्हती”

“२० तारखेला मतदानाला जाण्यासाठी धीर गोळा करतो आहे…”, असं म्हणत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाची आठवण त्यांनी करून दिली आहे. पण त्याचवेळी मतदार म्हणून सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे आलेली आजच्याइतकी हतबुद्धता कधीच आली नव्हती, असंही त्यांनी कवितेतून म्हटलं आहे. राजकारणातल्या पक्षफुटी, बंडखोऱ्यांमुळे राजकारणाचीच शकलं झाल्याचं त्यांनी कवितेत म्हटलं आहे.

आपणही तेवढेच जबाबदार…

दरम्यान, सध्याच्या राजकीय स्थितीसाठी फक्त राजकीय पक्षच नसून आपण मतदारही तेवढेच जबाबदार असल्याचं निरीक्षण अतुल कुलकर्णींनी या कवितेतून मांडलं आहे. “राजकारणाचं जे झालंय, केलं गेलंय, त्याला त्यांच्याइतकेच जनता म्हणून आपणही जबाबदार आहोत याची खूप खंत आहे”, असं म्हणत त्यांनी यावर खेद व्यक्त केला आहे.

त्याचप्रमाणे नेतेमंडळींकडून केल्या जाणाऱ्या आक्षेपार्ह विधानांचाही समाचार अतुल कुलकर्णी यांनी या कवितेतून घेतला आहे. “नेत्यांच्या वक्तव्यांची नीचतम पातळी बघून वाटणारं आश्चर्य आहे. आणि ती वक्तव्यं आधी जिभल्या चाटत पचवणाऱ्या आणि मग उलटी काढून ती पसरवणाऱ्या आपल्या सगळ्यांची वाटणारी कीव आहे”, असं त्यांनी या कवितेत नमूद केलं आहे. त्याचबरोबर कधीकाळी मतदान केंद्राकडे आपसूक वळणारी पावलं आता फरफटत न्यावी लागत असल्याचीही खंत त्यांनी नमूद केली.

महाराष्ट्र वाहून जाणार की आपली वेगळी वाट आखणार?

अतुल कुलकर्णींनी लिहिलेली संपूर्ण कविता…

२० तारखेला मतदानाला जाण्यासाठी धीर गोळा करतो आहे!

गेली ४ दशकं राजकारण जवळून पाहणाऱ्या

पण आजच्या इतकी हतबुद्धता कधीही न आलेल्या

मनाला समजावतो आहे!

शकलं करून टाकलेल्या

राजकारणानं भांबावलो आहे.

आणि त्यात रयतेची खांडोळी

होण्याच्या शक्यतांनी हादरलो आहे!

राजकारणाचं जे झालंय, केलं गेलंय;

त्याला त्यांच्याइतकेच

जनता म्हणून आपणही जबाबदार आहोत

याची खूप खंत आहे.

आणि सार्वजनिक अधमतेची जी पातळी

आपण सगळ्यांनी मिळून गाठली आहे,

गाठू दिली आहे;

त्याचं अतीव दु:ख आहे!

आपली सामूहिक असाहाय्यता पाहून

होणारी तडफड आहे!

नेत्यांच्या वक्तव्यांची नीचतम पातळी बघून

वाटणारं आश्चर्य आहे.

आणि ती वक्तव्यं

आधी जिभल्या चाटत पचवणाऱ्या

आणि मग उलटी काढून ती पसरवणाऱ्या

आपल्या सगळ्यांची वाटणारी कीव आहे!

माझा डेटा चोरून, माझी परवानगी न घेता,

‘एआय’ चा वापर करून, चक्क माझं नाव घेत

मला रेकॅार्डेड कॉल करून

माझं मत मागणाऱ्या व्यवस्थेबद्दल संताप आहे.

आणि मतदार म्हणून असलेलं स्वातंत्र्य गहाण टाकून

एखाद्या व्यवस्थेच्या दावणीला बांधल्या गेलेल्या

आमची चीड पण आहे!

निकाल कसे लागतील

याचं कुतूहल आहे.

पण दिलेला ‘कौल’

किती दिवस ‘दिला होता तिथेच’ राहील

याचा संभ्रम आहे!

चाळिसातली बहुतेक वर्षं

मतदान केंद्राकडे पावलं आपसूक वळत होती याचा आनंद आहे.

पण आता त्यांना फरफटत न्यावं लागतानाचा आक्रोश

काळजाला रक्तबंबाळ करतो आहे !

पण चला,

मलमपट्टी करायला हवी.

बोटाला शाई दाखवायला हवी.

वेडी आशा शहाणी करायला हवी!

वेडी आशा

अभिनयातून जनमानसात आपलं अढळ स्थान निर्माण करणारे अभिनेते अतुल कुलकर्णी सामाजिक वा राजकीय विषयांवर नेहमीच स्पष्टपणे त्यांच्या भूमिका मांडत असतात. त्यांचा हाच स्पष्टपणा या कवितेच्या माध्यमातूनही दिसून येत आहे.