लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची पाचवी यादी जाहीर झाली आहे. या यादीत अभिनेत्री कंगनाला लोकसभेचं तिकिट देण्यात आलं आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी या मतदारसंघातून कंगना रणौत भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढणार आहे. तसंच अरुण गोविल यांनाही तिकिट देण्यात आलं आहे. मेरठमधून अरुण गोविल निवडणूक लढणार आहेत. रामायण मालिकेत रामाची भूमिका करुन घराघरांत पोहचलेले अरुण गोविल हे मेरठमधून निवडणूक लढवणार आहेत.

कंगना रणौत ही बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे

कंगना रणौत ही हिंदी सिनेसृष्टीतली सुप्रिसद्ध अभिनेत्री आहे. तिने आपल्या कामाच्या बळावर स्वतःचं एक स्थान निर्माण केलं आहे. बॉलिवूडची ‘क्वीन’ असं तिला संबोधलं जातं. कंगनाने आत्तापर्यंत अशी काही वक्तव्यंही केली आहेत ज्यामुळे वाद निर्माण झाला आहे. महाविकास आघाडी सरकार असताना तिने मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यानंतर तिचं ऑफिस तोडण्यात आलं होतं. तसंच तिने त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंवरही जोरदार टीका केली होती. आता कंगनाला लोकसभा निवडणुकीचं तिकिट जाहीर झालं आहे. भाजपाने लोकसभेसाठी त्यांची पाचवी यादी जाहीर केली आहे. त्या यादीत कंगना रणौतचं नाव आहे. भाजपाने कंगनाला तिकिट दिल्यानंतर कंगनाची प्रतिक्रियाही समोर आली आहे.

Jitendra awhad daughter Natasha Awhad
Natasha Awhad: “भाजपाला ही निवडणूक जिंकायचीच होती, कारण…”, जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचा खळबळजनक दावा
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
najma heptulla on indira gandhi emergency
Indira Gandhi: “इंदिरा गांधींना आणीबाणीचा पश्चात्ताप होत होता”, नजमा हेपतुल्ला यांचा आत्मचरित्रात दावा; विश्वासू व्यक्तींबाबतही होती तक्रार!
MIM In Delhi Election 2025.
Delhi Election : दिल्लीतील २०२० च्या दंगलीतील आरोपी लढवणार विधानसभा, ओवैसींच्या पक्षाने दिली उमेदवारी
markadwadi women angry
Markadwadi : “मारकडवाडीत पडलेल्या ठिणगीचा देशभर वणवा पेटला पाहिजे”, शरद पवारांसमोरच महिलांनी एल्गार पुकारला!
Supriya Sule At Press Conference.
Supriya Sule : दादांचा भाऊ म्हणून अभिमान वाटतो का? अजित पवारांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या….
MNS candidate sandesh desai in Versova gets same number of votes both times 2019 and 2024
वर्सोव्यात मनसे उमेदवाराला दोन्ही वेळेस सारखीच मते
neelam shirke marathi actress wife of mla uday samant
‘वादळवाट’ फेम अभिनेत्री आहे आमदार उदय सामंत यांची पत्नी; राजकारणाबद्दल म्हणाली, “बायको म्हणून जो खंबीर आधार…”

हे पण वाचा- १६ व्या वर्षी घर सोडणारी ‘धाकड’ कंगना रणौत बॉलीवूडची ‘क्वीन’ झाली, पण…

कंगनाची पहिली प्रतिक्रिया

भारत आणि भारतीय जनता पक्ष या दोहोंवर माझं प्रेम आहे. मला भाजपाकडून कायमच पाठिंबा मिळाला आहेत. आज भाजपाने माझं नाव लोकसभेची उमेदवार म्हणून जाहीर केलं. माझं जन्मस्थळ असलेल्या हिमाचलच्या मंडी या ठिकाणाहून मला उमेदवारी देण्यात आली आहे. माझ्यासाठी हा खूप मोठा बहुमान. मी एक चांगली कार्यकर्ता होईन आणि लोकसेवेसाठी काम करेन या आशयाची पोस्ट कंगनाने केली आहे.

कंगनाने फेब्रुवारी महिन्यात दिले होते संकेत

फेब्रुवारी महिन्यात एका कार्यक्रमात कंगनाला विचारणा करण्यात आली की तू राजकारणात येणार का? त्यावर कंगना म्हणाली मी चित्रपटाच्या सेटसाठी अनेक राजकीय पक्षांशी लढले आहे. मात्र आता मला देशासाठी काहीतरी करायचं आहे. त्यासाठी मला योग्य मंच हवा आहे. मला राजकारणात यायचं असेल तर आत्ताची वेळ ही योग्य वेळ आहे असं मला वाटतं आहे. मी राष्ट्रप्रेमी आहे. देशाने मला खूप काही दिलं आहे आता देशासाठी काहीतरी करण्याची वेळ आली आहे. देशाने जे ऋण माझ्यावर केलं आहे ते कुठेतरी फेडण्याची ही वेळ आहे असं कंगनाने फेब्रुवारी महिन्यात म्हटलं होतं आणि राजकारणात येण्याचे संकेत दिले होते.

Story img Loader