कर्नाटक राज्यातील हसन या विधानसभा मतदारसंघात भाजपाचे माजी आमदार प्रीथम गौडा यांचा जेडीएसच्या स्वरूप प्रकाश यांनी ७,८५४ मतांनी पराभव केला. हसनमध्ये पराभव झाल्यामुळे आता हसन जिल्ह्यात भाजपाचे शून्य आमदार राहिले आहेत. भाजपामधील सूत्रांनी सांगितले की, बुथ केंद्रावरील मतदानाचा अंदाज घेतला असता सर्वच्या सर्व मुस्लीम मते जेडीएसच्या पारड्यात पडली असल्याचे दिसत आहे. यानंतर चिडलेल्या माजी आमदार प्रीथम गौडा यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते मुस्लीम समुदायाचे नाव न घेता, त्यांना धमकी देताना दिसत आहेत. यापूर्वी डिसेंबर २०२२ मध्येही त्यांचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ते मुस्लिमांनी मला मतदान नाही केले तर त्यांचे एकही काम करणार नाही, अशी धमकी दिली होती.

आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत ते म्हणाले, “मी प्रामाणिकपणे सर्व समाजाला प्रेम आणि विश्वासाच्या नात्याने एकत्र आणण्याचा प्रयत्न केला होता. पण तरीही त्यांनी माझा द्वेष केला. पुढील काही दिवसांमध्ये त्यांचा देवच त्यांना वाचवू शकतो. मी त्यांना माझी ताकद दाखवून देणार आहे.” हसन विधानसभा मतदारसंघ हा जेडीएसचा बालेकिल्ला समजला जात होता. १९९९ साली जेडीएसचे के. एच. हनुमेगौडा या ठिकाणी विजयी झाले होते. त्यानंतर जेडीएसच्या एच. एस. प्रकाश यांनी सलग तीन वेळा या मतदारसंघात विजय मिळविला. २०१८ साली प्रीथम गौडा यांनी जेडीएसकडून हा मतदारसंघ हिसकावून घेतला. प्रकाश यांनी १३ हजारांच्या मताधिक्याने या ठिकाणी विजय मिळविला होता.

Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
maharashtra assembly election 2024 issue of bullying is effective in campaigning in three constituencies of Marathwada
मराठावाड्यातील तीन मतदारसंघांत गुंडगिरीचा मुद्दा प्रचारात प्रभावी
Navri Mile Hitlarla
एजेवर येणार मोठे संकट, श्वेताच्या ‘त्या’ कृतीमुळे होणार अटक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका नव्या वळणावर
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
BJP Manifesto For Election
BJP Manifesto : भाजपाच्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचं आश्वासन , शेतकऱ्यांना कर्जमाफीसह ‘या’ घोषणा
loksatta readers feedback
लोकमानस: धोरणांचा प्रचार झालाच नाही
Amit shah on Sharad pawar and Devendra Fadnavis
Amit Shah: “आपल्याला देवेंद्र फडणवीसांना पुन्हा…”, अमित शाहांचे शिराळ्याच्या सभेत मोठे विधान; राजकीय चर्चांना उधाण

यंदाच्या निवडणुकीत हसन विधानसभेतील उमेदवारीवरून बरेच नाट्य घडले. जेडीएस नेते एच. डी. रेवन्ना यांची पत्नी भवानी रेवन्ना यांना या ठिकाणाहून उमेदवारी हवी होती. मात्र त्याआधीच जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी पक्षातील कार्यकर्त्याला तिकीट देऊन टाकले. जेडीएसवर घराणेशाहीचा सुरुवातीपासून आरोप होत आहे, या आरोपामुळे त्यांनी परिवारातील व्यक्तीला तिकीट देणे टाळले. हसन विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार एच. एस. प्रकाश यांचा मुलगा स्वरूप प्रकाश यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.

हे वाचा >> “मुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय हायकमांडवर सोडला”; डीके शिवकुमार यांचा दिल्ली दौरा रद्द, चर्चांना उधाण

हसन मतदारसंघावर पुन्हा झेंडा फडकविण्यासाठी जेडीएसकडून हरेक प्रकारे प्रयत्न करण्यात आले. जेडीएसचे सर्वेसर्वा, भारताचे माजी पंतप्रधान एच. डी. देवे गौडा यांनीदेखील ८९ वर्ष वय असूनही स्वरूप प्रकाश यांच्यासाठी प्रचाराचे मैदान गाठले आणि जाहीर सभा घेतली.

मतदान केंद्रावरील आजवर झालेल्या निवडणुकीच्या आकडेवारीनुसार मुस्लीम मते ही काँग्रेसकडे वळत होती. मात्र या वेळी जेडीएसच्या उमेदवाराच्या पारड्यात ही मते पडली. २०१८ सालच्या निवडणुकीत काँग्रेसचे एच. के. महेश यांना ३८,१०१ (२४.६७ टक्के) मतदान झाले होते. या वेळी काँग्रेसचे उमेदवार बी. रंगास्वामी यांना केवळ ४,३०५ मते (२.५२ टक्के) मिळाली आहेत.

प्रीथम गौडा यांच्या डिसेंबर महिन्यात व्हायरल झालेल्या व्हिडीओ क्लिपचा परिणाम या वेळच्या मतदानात दिसला. त्या व्हिडीओमध्ये मुस्लीमबहुल असलेल्या वस्त्यांमध्ये प्रीथम गौडा मत देण्याचे आवाहन करीत होते. जर मतदान केले नाही, तर वस्त्यांमध्ये रस्ते आणि इतर विकासकामे करणार नाही, अशी धमकी देतानाही ते दिसत होते. व्हिडीओवर गदारोळ माजल्यानंतर भाजपा संघटनेने त्यावर सारवासारव करताना म्हटले की, मतदारसंघातील मुस्लीम नागरिक आणि प्रीथम गौडा यांचे अतिशय घट्ट नाते आहे. त्यातूनच त्यांनी खेळीमेळीच्या स्वरूपात सदर आवाहन केले आहे. मात्र आता पुन्हा एकदा त्यांचे वादग्रस्त वक्तव्य असलेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे.