पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. राष्ट्रीय, स्थानिक पातळीवरचे पक्ष एकमेकांसमोर ठाकले आहेत. तर, अनेक अपक्ष उमेदवारही आपलं नशीब आजमावून पाहत आहेत. अशातच ७८ वर्षीय तीतर सिंग हे राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीत उतरले आहेत. निवडणूक लढवण्याची ही त्यांची ३२ वी वेळ असून ते प्रत्येकवेळी त्यांच्या पदरी अपयश येत असलं तरीही त्यांनी निवडणूक लढण्यातील सातत्या कायम ठेवलं आहे. हिंदुस्तान टाईम्सने यांदर्भातील वृत्त दिलं आहे.

राजस्थानच्या गंगानगर येथे राहणारे तीतर सिंग हे ७८ वर्षीय वृद्ध महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा योजनेतील कामगार आहेत. १९७० पासून ते निवडणूक लढवत असून ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंतच्या सर्व निवडणुका त्यांनी लढवल्या आहेत. पण, प्रत्येकवेळी त्यांचा पराजय झाला. त्यामुळे यंदाही त्यांनी श्री कानगपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे.

Ajit Pawar on Udyanraje Bhosale
Ajit Pawar: ‘साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर…’, अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीनं भाजपाचीच कोंडी
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Kishore Jorgewar expressed his displeasure with Sudhir Mungantiwar front of Devendra Fadnavis
थेट फडणवीसांसमोरच जोरगेवारांनी व्यक्त केली मुनगंटीवारांवर जाहीर नाराजी… म्हणाले, “मला उमेदवारी मिळू नये म्हणून…”
devendra fadnavis criticize sanjay raut in nagpur
“संजय राऊतांसारख्या लोकांना मी…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले, “ते माझ्या उंचीचे…”
smriti irani in Vasai Assembly constituency for Maharashtra Assembly Election 2024
वसईची परिस्थिती जैसे थे; स्मृती इराणी, महायुतीच्या प्रचारासाठी वसईत सभा
Mankhurd  Shivajinagar Muslim community in confusion print politics news
मानखुर्द- शिवाजीनगरात मुस्लीम समाज संभ्रमात
Chhagan Bhujbal statement that he is involved in power for development
ईडीमुळे नव्हे, तर विकासासाठी सत्तेत सहभागी; छगन भुजबळ यांची सारवासारव
Sachin Pilgaonkar
नवरा माझा नवसाचा २’ने थिएटरमध्ये ५० दिवस पूर्ण केल्यानंतर श्रियाची सचिन पिळगांवकरांसाठी खास पोस्ट; म्हणाली, “रॉकस्टार मला…”

याबाबत हिंदुस्तान टाईम्सला त्यांनी माहिती दिली की, निवडणूक लढवण्याची ही माझी ३२ वी वेळ आहे. माझ्या चार पिढ्या येऊन गेल्या, परंतु भाजपा आणि काँग्रेस सरकारने गरिबांसाठी आणि गावच्या प्रगतीसाठी काहीच केलं नाही. सरकारने गरिबांना जमिन आणि इतर सुविधा पुरवल्या पाहिजेत. मी आमदार म्हणून निवडून आल्यास गावातील रस्त्यांचा विकास करेन, विकासात्मक कामे करेन. तसंच, गावातील भूमिहीन गरिबांना जमिनी देण्याची विनंती करेन.

एका हिंदी वृत्तस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, तीतर सिंग फक्त पाचवी शिकले आहेत. परंतु वयोमानामुळे त्यांना आता लिहिता किंवा वाचता येत नाही. परंतु, ते सही करू शकतात. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत ६५३ मते त्यांना मिळाली होती. तर, २०१३ मध्ये ४२७, २००८ मध्ये ९३८ मते त्यांना मिळाली होती. एवढंच नव्हे तर प्रत्येक निवडणुकीत त्यांचं डिपॉजिटही जप्त झालेलं आहे.

राजस्थानमध्ये १९७० साली काँग्रेसचं राज्य होतं. १९९० पर्यंत काँग्रेसची राजस्थानमध्ये सत्ता होती. १९९० च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने बाजी मारली आणि भैरान सिंग शेखावत यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपाने सत्ता स्थापन केली. परंतु, त्यांची सत्ता अल्पावधीचीच राहिली. १९९२ मध्ये बाबरी मस्जिद पाडल्यानंतर भाजपाला सत्ता गमवावी लागली. १९९३ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाने पुन्हा विजय मिळवला, तर १९९८ निवडणुकीत काँग्रेस सत्तेवर आली. तर, २००३ साली पुन्हा भाजपाला सत्तेची खुर्ची मिळाली.

दरम्यान, आता राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुका लागल्या आहेत. २५ नोव्हेंबर रोजी राजस्थानमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.