Ajit Pawar Cried in Public Meeting Talking About Yugendra Pawar : बारामती विधानसभा मतदारसंघात जोरदार शक्तिप्रदर्शन करत राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार यांनी आज (२८ ऑक्टोबर) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर, त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे. युगेंद्र पवार यांनी पक्षाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर अजित पवार यांनी बारामती येथे एक प्रचारसभा घेतली. या प्रचारसभेत युगेंद्र पवारांच्या उमेदवारीबद्दल बोलताना अजित पवार भावूक झाले होते. तसेच त्यांनी दोन वेळा आवंढा गिळला, भाषण थांबवून पाणी प्यायले. त्यानंतर त्यांनी आपलं भाषण चालू ठेवलं.

अजित पवार म्हणाले, “आईने (अजित पवार यांची आई व युगेंद्र पवार यांची आजी) सांगितलेलं, माझ्या दादाविरोधात (अजित पवार) अर्ज भरू नका, परंतु, वडीलधाऱ्यांनी (शरद पवार) त्यांना थांबवायला हवं होतं. मात्र, त्यांनी तसं केलं नाही”.

Nagpur West constituency, Sudhakar Kohle,
पश्चिममध्ये ठाकरे विरुद्ध आता दक्षिणचे पुन्हा ‘सुधाकर’
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
sujay vikhe patil controversial Statement
Sujay Vikhe Patil : “आजपासून आचारसंहिता मोडतोय, जर कोणी…”, भाजपाच्या माजी खासदाराचं भरसभेत वादग्रस्त वक्तव्य!
Sharad Pawar and Yugendra Pawar
Sharad Pawar : ५७ वर्षांचा राजकीय प्रवास, बारामती मतदारसंघ अन् पवार घराणं; युगेंद्र पवारांनी अर्ज भरल्यानंतर शरद पवारांची भावूक प्रतिक्रिया!
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Former CM Devendra Fadnavis of the BJP and Sena leader Sanjay Raut Meet
Meeting of Devendra Fadnavis and Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या ‘फोटो ऑफ द डे’ ची इनसाईड स्टोरी काय?
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…

हे ही वाचा >> Sharad Pawar NCP 4th Candidate List : मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची चौथी यादी जाहीर; सात उमेदवारांची घोषणा, कोणाला कुठून मिळाली संधी?

अन् अजित पवार भावूक झाले

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “आमच्या पक्षाचं आधीच ठरलं होतं की मी बारामतीतून विधानसभेचा अर्ज भरणार आहे. तात्यासाहेब पवारांचं कुटुंब म्हणजे आमचं कुटुंब अत्यंत बिकट परिस्थितीतून इथवर आलेलं आहे. आई आज सांगत होती, माझ्या दादाविरोधात अर्ज भरू नका”. हे बोलत असताना अजित पवार भावूक झाले होते, त्यांचा कंठ दाटून आला होता, त्यांनी भाषण थांबवलं आणि ते पाणी प्यायले. त्यानंतर ते म्हणाले, “मतदारसंघात जे काही चाललंय ते बरोबर नाही. वडीलधाऱ्या व्यक्तींनी (शरद पवार) सांगितलं पाहिजे होतं…”

हे ही वाचा >> Hasan Mushrif : “सत्ता आल्यास मी उपमुख्यमंत्री होणार”, मुश्रीफांचा दावा; अजित पवारांचा पत्ता कट? मुख्यमंत्रिपदाबद्दल मोठं वक्तव्य

अजित पवार म्हणाले, “त्यांना फॉर्म भरायला कोणी सांगितला तर म्हणे साहेबांनी (शरद पवार) सांगितला… मग साहेब (शरद पवार) तात्यासाहेब पवारांचं घर फोडत आहेत का? आम्ही जीवाला जीव देणारी माणसं आहोत. या संदर्भात मला एवढंच सांगायचं आहे की इतक्या खालच्या पातळीवर जाऊन कुणी राजकारण करू नये. घरात एकोपा टिकवायला पिढ्यान् पिढ्या जातात. परंतु, घर तुटायला वेळ लागत नाही. मला तुम्हा सर्वांना एकच सांगायचं आहे की आपल्याला आपला विकास करून घ्यायचा आहे. घरातली भांडणं चार भिंतींच्या आत ठेवायला हवी. ती चव्हाट्यावर आणायचं कारण नाही. कुटुंबात एकदा का दरी पडली की ती सांधायला दुसरं कोणी येऊ शकत नाही”.