Ajit Pawar Bag and Helicopter Checking : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्यातील सर्वच नेते, विविध पक्षांचे प्रमुख, स्टार प्रचारक राज्यभर फिरत आहेत. एका मतदारसंघातून दुसऱ्या मतदारसंघात त्वरित पोहोचण्यासाठी हे नेते हेलिकॉप्टरचा व वाहनांचा वापर करत आहेत. दरम्यान, या निवडणुकीच्या काळात पैशांसह कुठल्याही वस्तूंची ने-आण केली जाऊ शकते. मतदारांमध्ये पैसे वाटले जाऊ शकतात. निवडणुकीत अशा प्रकारे पैशांचा गैरवापर होऊ नये यासाठी निवडणूक अधिकारी काळजी घेत आहेत. नेत्यांची वाहनं, हेलिकॉप्टरची तपासणी करत आहेत. नेत्यांकडील व त्यांच्या कार्यकर्त्यांकडील बॅगांची तपासणी केली जात आहे. दरम्यान, शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरची आतापर्यंत दोन वेळा वेगवेगळ्या ठिकाणी तपासणी करण्यात आली. सोमवारी (११ नोव्हेंबर) त्यांची वणी (यवतमाळ) येथील हेलिपॅडवर बॅग तपासल्यानंतर, मंगळवारी औसा येथे त्यांच्या हेलिकॉप्टरची व बॅगांची तापसणी करण्यात आली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांचीच उलटतपासणी केली.

दोन वेळा हेलिकॉप्टर व बॅगांची तपासणी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी जाहीर संभांमधून यावर नाराजी व्यक्त केली. तसेच त्यांनी निवडणूक आयोगासह प्रशासनाला प्रश्न विचारला की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री अमित शाह यांच्या बॅगा का तपासत नाही. त्यानंतर आज (१३ नोव्हेंबर) निवडणूक अधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली. त्यांच्याकडील सर्व बॅग व लाडवांचा डबा देखील तपासला. अजित पवारांनी स्वतः या तपासणीचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर केला आहे.

Sharad Pawar Eknath shinde Ajit pawar
Sharad Pawar : अजित पवारांचा शिंदेंना दम? शरद पवारांकडून भर सभेत मिमिक्री; म्हणाले, “शिंदेंनी मला विनंती केली, समजून घ्या…”
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Nitin Gadkari
Nitin Gadkari : योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’पेक्षा गडकरींची भूमिका वेगळी? म्हणाले, “निवडणुकीत एकाच मुद्यावर यश मिळेल”
Ajit Pawar
Ajit Pawar : RSS कडून लोकसभेतील पराभवाचं खापर, विचारधाराही वेगळी, तरी महायुतीत का? अजित पवार म्हणाले…
Ajit Pawar on Gautam Adani
Ajit Pawar : अजित पवारांचं २४ तासांत घुमजाव, गौतम अदाणींबरोबर झालेल्या बैठकीबाबत म्हणाले…
Ajit Pawar
Ajit Pawar : योगी आदित्यनाथांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’शी अजित पवार सहमत? म्हणाले, “तडजोडी…”
Uddhav Thackeray Bag Checking
Uddhav Thackeray : “तुमचं नियुक्ती पत्रक दाखवा, पाकिटातील पैसे दाखवा”, सामानाची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनाच उद्धव ठाकरेंनी घेतलं फैलावर!
Babanrao Lonikar News
Babanrao Lonikar : “मराठा मतं बोटांवर मोजण्याइतकी…”, व्हिडीओ व्हायरल होताच बबनराव लोणीकरांचं स्पष्टीकरण

हे ही वाचा >> Maharashtra Assembly Election 2024 Live : “मी ऑन कॅमेरा सांगतेय की…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

अजित पवार काय म्हणाले?

अजित पवारांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर या तपासणीचा व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे की आज मी निवडणुकीच्या प्रचारासाठी जात असताना निवडणूक अधिकाऱ्यांनी माझ्या बॅग व हेलिकॉप्टरची नियमित तपासणी केली. मी देखील त्यांना पूर्ण सहकार्य केलं. मला पूर्ण विश्वास आहे की अशा प्रकारच्या उपाययोजना स्वतंत्र व निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी आवश्यक आहेत. आपण सर्वांनी कायद्याचा आदर करायला हवा. आपली लोकशाही टिकवण्यासाठी निडणूक आयोगाच्या या प्रयत्नांना सहकार्य करुया.

हे ही वाचा >> Ajit Pawar : RSS कडून लोकसभेतील पराभवाचं खापर, विचारधाराही वेगळी, तरी महायुतीत का? अजित पवार म्हणाले…

बॅग तपासल्यानंतर उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

बार्शी येथील सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपासह महायुतीवर सडकून टीका केली होती. तसेच, “एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी यंत्रणेला माझी बॅग तपासण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी मला ऑटोचेकींगवर टाकलं आहे. मी तर म्हणतो की मिंधेंनी रोज माझी बॅग घेऊन माझ्याबरोबर फिरावं. फक्त त्यांनी एक काम करावं. जसा माझा पक्ष चोरला तसं त्यांनी बॅगमधून माझे कपडे चोरू नये. शेवटी चोर तो चोर असतो, एकदा चोरीची सवय लागली, की आयुष्य चोरीतच जातं”.