Ajit Pawar on aharashtra Assembly Election Result 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून राज्यात माहयुतीने बहुमत मिळवलं आहे. निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुतीमध्ये अटीतटीचा संघर्ष पाहायला मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. अनेक मतदानोत्तर चाचण्यांमध्ये देखील तसाच कल पाहायला मिळाला होता. मात्र, निवडणुकीनंतर सर्वांना धक्का देणारा निकाल समोर आला आहे. महायुतीला २८८ पैकी २३६ जागांवर विजय मिळाला आहे. तर, महाविकास आघाडीला केवळ ४९ जागा जिंकता आल्या. महायुतीमध्ये भाजपाला १३२, शिवसेनेला (शिंदे) ५७, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला (अजित पवार) ४१ जागा मिळाल्या आहेत. तर, महाविकास आघाडीत शिवसेनेला (ठाकरे) २०, काँग्रेसला १६ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने अवघ्या १० जागा जिंकल्या आहेत. त्यापाठोपाठ, राज्यातील जनतेने स्पष्ट बहुमत दिल्यानंतर आता महायुतीकडून सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा