Premium

अजित पवारांचं आवाहन, “साहेबांना आणि मुलीला मतदान केलं आता सुनेला निवडून द्यायची वेळ, पवार दिसेल तिथे..”

अजित पवार म्हणाले फक्त संसदेत भाषणं केली म्हणजे लोकांचे प्रश्न सोडवता येत नाहीत.

What Ajit pawar Said?
अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन

आजपर्यंत तुम्ही पवारांच्या मागे उभे राहिलात, आताही मतदान करताना ज्या ठिकाणी पवार दिसेल तिथे मतदान करा म्हणजे पवारांना मतदान केल्याचं समाधान तुम्हाला मिळेल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांनी काही वेळापूर्वी भाषण केलं आणि तुम्हाला भावनिक केलं जातं आहे असं म्हटलं. तसंच बारामतीत मतं मागण्यासाठी एक लेव्हल होती ती सोडून आता मतं मागितली जात आहेत असाही टोला अजित पवारांनी लगावला.

काय म्हणाले अजित पवार?

नुसतं संसदेत भाषणं करुन बारामतीकरांचे प्रश्न सुटत नाहीत. अजित पवार भाषणाच्या बाबतीत एक नंबरचा आहे. मी देखील भाषणं करतो पण मी कामही करतो. विकासाला निधीही आणतो. एखादं काम वाजवून त्या ठिकाणी करुन घेतो. लोकांना रिझल्ट देतो. माझ्या सहकाऱ्यांवर, पुढाऱ्यांवर काहीजण नाराज आहेत हे मला माहीत आहे. मात्र माझ्यावर विश्वास ठेवा मी यातून मार्ग काढेन. मात्र माझ्या बरोबर काम करणारा चुकला म्हणून त्याचा दंड मला किंवा उमेदवाराला देऊ नका.

Devendra Fadnavis, Mahesh Landge,
“महेश लांडगे यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही”, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
mayura kale
“आजवर काय केले तेही सांगत नाही अन् पुढे काय करणार ते पण बोलत नाही,” चर्चेतील टीका
What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : “बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है या घोषणांमध्ये चुकीचं काहीच नाही, या घोषणा..”; देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
ravi rana replied to ajit pawar
“…तेव्हा ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ आठवली नाही का? आता परिणाम भोगा”; रवी राणांचं अजित पवारांना प्रत्युत्तर!
Ajit Pawar on Udyanraje Bhosale
Ajit Pawar: ‘साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर…’, अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीनं भाजपाचीच कोंडी
Prashant Bamb BJP MLA
“मरेपर्यंत पस्तावशील, हे लोक तुला…”, भाजपा आमदाराची भर सभेत अरेरावी; प्रश्न विचारणाऱ्यांना कार्यकर्त्यांनी हुसकावलं

काहीवेळा उजवं-डावं असतं. काही लोकांना जवळ केलं गेलं, लांब केलं गेलं असेल असं झालं असेल. आज टँकरचीही मागणी आहे. दूधसंघाचे चेअरमनही आज भेटले होते. आपल्याला लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत. काही जण अजून, कसं रे काय रे? काय होईल हे विचारतील असं काहीही होत नाही. कुणीही भावनिक केलं तरी तुम्ही होऊ नये. सात-सातवेळेला मला निवडून देण्यात आलं आहे. त्यामुळे मला सगळे बारकावे समजले आहेत.

“संसदेत भाषणं करून मतदारसंघाचे प्रश्न सुटत नाहीत”, अजित पवारांचे सुप्रिया सुळेंवर टीकास्र; म्हणाले, “माझी पट्टी लागली तर…”

आपल्या मुळे नीरा नदीतही पाणी कसं आणलं ते मला माहीत आहे. प्रतापचा फोन आला होता पाणी काळं झालं आहे. पांढरं करायला खूप काहीतरी टाकावं लागेल हे मी त्यांना सांगितलं. पाच रुपये लिटरला दुधाचे दर वाढवून दिले आहेत. आचारसंहिता संपल्यावर त्यातूनही मार्ग काढू. कांदा निर्यातीला संमती दिली आहे. धान उत्पादक शेतकऱ्याला बोनस दिला. सोयाबीन उत्पादकाला बोनस मिळणार आहे असंही अजित पवार म्हणाले आहेत. बारामतीकरांनी हे विसरायला नको.

बारामतीकरांना आवाहन करत अजित पवार म्हणाले

मी तुम्हाला आवाहन करतो आहे, तुम्ही आधी साहेबांना मतदान केलं, त्यानंतर मुलाला म्हणजेच मला मतदान केलं. नंतर मुलीला मतदान केलं. आता सुनेला मतदान करा म्हणजे तुम्हाला पवारांना मतदान केल्याचं समाधान मिळेल. मी राजकारणाची सुरुवात केली तेव्हा तिशीत होतो. आता साठी पार केली आहे. त्यामुळे ही निवडणूक महत्त्वाची आहे. महायुतीचा उमेदवार कोण द्यायाचा याचा विचार केला. सुनेत्रा पवारांचं नाव पुढे आलं. आता कुणाला मतदान करायचं हा प्रश्न लोकांना पडला. त्यामुळे मी सांगतो पवार दिसेल त्या ठिकाणीच मतदान करा.

मला ठाऊक आहे की मी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर याआधी टीका केली. पण आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. मोदींनी कधीही सुट्टी घेतलेली नाही. मोदी यांनी फक्त देशाचा विकास कसा होईल ते पाहिलं. बारामतीत केंद्राचा पैसा आला आहे. बारामती रेल्वे स्टेशन फलटणला जोडण्यासाठी मी १५ वर्षे प्रयत्न करतो आहे, त्यासाठी मोदींची भेट घेतली असंही आपल्या भाषणात अजित पवार म्हणाले. तसंच १४० कोटींचा कारभार कुणाच्या हातात द्यायचा? याचा निर्णय मतदार घेणार आहेत. असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ajit pawar imp appeal to baramati people said where you see pawar vote scj

First published on: 09-04-2024 at 16:51 IST

संबंधित बातम्या