Ajit Pawar on Mahayuti: येत्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांमध्ये सत्ताधारी महायुती व विरोधातील महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंनी सर्व ताकद पणाला लावली जात आहे. या काळात आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे केले जात आहेत. जागावाटप, इच्छुकांच्या मागण्या, उमेदवार निश्चिती अशी प्रक्रिया राज्यात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे सर्वच पक्ष आगामी निवडणुकीत आपलं सरकार येणार असल्याचा ठाम दावा करत असताना अजित पवारांनी मात्र याबाबत वेगळी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते आज पुण्यातील दगडूशेठ हलवाई मंडळात पूजा करण्यात आली. यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी अजित पवारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एका विधानाबाबत विचारणा केली असता त्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. बाप्पाचा आशीर्वाद सरकारवर असून राज्यात पुन्हा महायुतीचं सराकर येईल असं मुख्यमंत्री म्हणाल्याचं अजित पवारांना सांगताच ते म्हणाले, “माझी तुम्हाला विनंती आहे. मुख्यमंत्र्यांना जे वाटतं ते मुख्यमंत्री बोलतात.”

“जनतेच्या मनातलं सरकार येईल”

यावेळी अजित पवारांनी ‘महायुतीचं सरकार येईल’, असं न म्हणता ‘जनतेच्या मनातलं सरकार येईल’, असं विधान केल्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. “माझं स्पष्ट मत आहे. शेवटी आमच्या मतदार राजाच्या मनात जे येईल, त्या पद्धतीचं सरकार येत असतं. आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतोय, विरोधक त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत”, असं अजित पवार म्हणाले.

योजनांची सांगितली यादी

दरम्यान, यावेळी अजित पवारांनी महायुती सरकारनं केंद्राकडून राज्यासाठी आणलेल्या योजनांची माहिती दिली. “आम्ही चांगल्या योजना दिल्या आहेत, विकासाचा कार्यक्रम दिलाय. केंद्रात मोदींच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा सरकार आलंय. त्यांच्याकडून राज्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणण्याचं काम आपण करतोय”, असं अजित पवार म्हणाले.

“पहिल्याच मंत्रिमंडळात वाढवणचं पाऊण लाख कोटींचं बंदर आपल्याला मंजूर झालं. कालही आपल्याकडची वंदे भारत ट्रेन सुरू झाली. राष्ट्रीय महामार्ग, कोस्टल रोडची कामं चालू आहेत. केंद्रातलं सरकार आपल्याला सर्वतोपरी मदत करतंय. कांदा निर्यातबंदी उठवण्यात आली आहे. सोयाबीन, कापूस, ऊस, दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी मदत केली जात आहे. दूध पावडरसाठीच्या अनुदानाची मागणी आपण अमित शाहांकडे केली. आपल्या मागण्यांपैकी दोन मागण्या मान्य झाल्या आहेत. इतर मागण्याही मंत्रिमंडळात मंजूर करून घेतल्या जातील, असे सूतोवाच त्यांनी केले आहेतच”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

Ajit Pawar in Pune: अजित पवारांच्या संजय गायकवाडांना कानपिचक्या; राहुल गांधींबाबतच्या ‘त्या’ विधानावर म्हणाले, “जे चुकीचं वागतील…”

“राज्यातले राहिलेले प्रश्न लवकरात लवकर निकाली निघावेत, अशी शेतकरी वर्गाची, महायुती सरकारची मागणी आहे”, असंही त्यांनी नमूद केलं.