Premium

“अजित पवार अप्रत्यक्षपणे हेच सांगत आहेत की ते स्वार्थी…”, जितेंद्र आव्हाडांची पोस्ट चर्चेत

जितेंद्र आव्हाड यांनी एक पोस्ट करुन अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे.

What jitendra awhad Said?
अजित पवार व जितेंद्र आव्हाड (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले आहेत. महाराष्ट्रात तीन टप्पे तर देशभरात पाच टप्पे बाकी आहेत. अशात प्रचारसभांचा धडाका सुरु आहे. प्रचारसभा असोत किंवा सोशल मीडिया पोस्ट आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार कसे स्वार्थी असल्याचं स्वतःच दाखवून देत आहेत हे पोस्ट करत सांगितलं आहे. ही पोस्ट चर्चेत आली आहे.

काय आहे जितेंद्र आव्हाडांची पोस्ट?

२००४ मध्ये मला साहेबांनी (शरद पवार) मुख्यमंत्री केले नाही, असे अजित पवार खासगीमध्ये बोलत आहेत. २००४ मध्ये नक्कीच राष्ट्रवादीच्या जास्त जागा निवडून आल्या होत्या. पण, त्या जास्तीच्या जागा तुमच्यामुळे नाही तर कैलासवासी आर. आर. पाटील यांच्यामुळे आल्या होत्या. आर.आर. पाटील यांनीच जेम्स लेन प्रकरणात कारवाई केली होती. समाज पेटून उठलेला असतानाही आम्ही जेव्हा जेम्स लेन आणि पुरंदरे यांच्यावर बोलत होतो. तेव्हा तुम्ही, बोलू नका, असे सांगत होतात.

Ajit Pawar Bhor Assembly Constituency
Ajit Pawar: ‘नायतर आम्हाला कुत्रं विचारणार नाही’, भरसभेतच अजित पवार भडकले, पोलिसांवर व्यक्त केला संताप
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
accountability of devendra fadnavis declined due to his divisive politics says supriya sule
फोडाफोडीच्या राजकारणामुळे फडणवीसांची विश्वसनीयता कमी; सुप्रिया सुळे
What Sharad Pawar Said?
Sharad Pawar : “मोदी ४०० हून अधिक जागांची मागणी करत होते कारण..”, शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
devendra fadnavis criticize sanjay raut in nagpur
“संजय राऊतांसारख्या लोकांना मी…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले, “ते माझ्या उंचीचे…”
ajit pawar on cm post
अजित पवार म्हणाले, “धरसोड केली तर तुमची विश्वासार्हता राहात नाही”; मुख्यमंत्रीपदाबाबतही तडजोडीची तयारी!
maharashtra assembly election 2024 rohit pawar s reply to mahesh landge in bhosari assembly constituency
पिंपरी : धमक्या देऊ नका, आम्ही राजकारणात गोट्या खेळण्यास आलो नाहीत; रोहित पवार यांचे महेश लांडगे यांना प्रत्युत्तर

२००४ मध्ये अजित पवारांना मुख्यमंत्री केलं नाही

२००४ मध्ये मुख्यमंत्रीपदासाठी पद्मसिंह पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील, कै. आर. आर. पाटील, जयंत पाटील , मधुकरराव पिचड हेच लायक उमेदवार होते. पण, या सर्व ज्येष्ठ नेत्यांना सोडून अजित पवार यांना मुख्यमंत्री केले असते तर जनमानसांत वाईट संदेश गेला असता म्हणून आदरणीय पवारसाहेबांनी राजकीय मुत्सद्दीपणा दाखवून पाच अतिरिक्त महत्वाची मंत्रिपदे राष्ट्रवादीच्या वाट्याला मिळवून घेतली. @AjitPawarspeks तुम्हाला उपमुख्यमंत्रीपद दिले. आता तुमच्या या खासगीतील चर्चेमुळे तुमचे स्वार्थाचे गणित उघड झाले आहे. साहेबांनी आपणाला मुख्यमंत्री केले नाही, हे सांगून अजित पवार हेच आता अप्रत्यक्ष सांगत आहेत की ,”मी स्वार्थी नंबर १ आहे ! अशी पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. तसंच जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना स्वार्थी असं संबोधलं आहे.

हे पण वाचा- जितेंद्र आव्हाडांची अजित पवारांवर जहरी टीका, “राष्ट्रवादीतून फुटून गेलेले पाकिटमार आणि दरोडेखोर, कारण..”

आता यावर अजित पवार काही उत्तर देणार का ? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून जितेंद्र आव्हाड हे अजित पवारांवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. “राष्ट्रवादीतून फुटून गेलेले अजित पवारांसह सगळेजण पाकिटमार आणि दरोडेखोर आहेत. दरोडेखोर मंगळसूत्र घेऊन लुटून घेऊन जातात आणि बायकोच्या गळ्यात घालतात. तसाच प्रकार घडला आहे. त्यांच्याकडे आत्ता असूदेत मंगळसूत्र पण येणारा काळ सांगेल कुठलं मंगळसूत्र खरं आहे? पाकिटमार कधी ना कधी पकडला जातो. असंही वक्तव्य त्यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ajit pawar is telling everyone that he is selfish jitendra awhad post scj

First published on: 29-04-2024 at 18:15 IST

संबंधित बातम्या