महाराष्ट्राच्या राजकारणात सुसंस्कृतपणा असला पाहिजे ही शिकवण यशवंतराव चव्हाण यांनी दिली होती. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त मी या ठिकाणी आलो आहे. यशवंतराव चव्हाण यांची भाषणं, त्यांची दूरदृष्टी या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. यशवंतराव चव्हाण यांचा आदर्श समोर ठेवूनच आम्ही काम करतो आहोत असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं. आज अजित पवार यांनी कऱ्हाड येथील प्रीती संगमावर होते तेव्हा त्यांना रोहित पवार भेटले. रोहित पवार त्यांच्या पाया पडले त्यावेळी अजित पवार “शहाण्या थोडक्यात वाचलास” असं रोहित पवारांना म्हणाले. या वक्तव्याची चर्चा होते आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला वगैरे काहीही ठरलेला नाही

मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला वगैरे काहीही ठरलेलं नाही. मला नेता निवडलं गेलं आहे. एकनाथ शिंदेंना नेता म्हणून निवडलं गेलं आहे. लोकांच्या अपेक्षा आमच्याकडून वाढल्या आहेत. आम्ही एक चांगलं सरकार देऊ यात काहीही शंका नाही. आम्ही तिन्ही नेते मिळून निर्णय घेऊ असंही अजित पवार म्हणाले.

आम्हाला प्रचंड बहुमत मिळालं आहे-अजित पवार

आजवर जेवढ्या निवडणुका झाल्या तेवढ्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त जागा हा काँग्रेस पक्ष मजबूत असताना २२२ पर्यंत गेल्या आहेत. आज ही संख्या २३३ पर्यंत गेला आहे. एखादी युती, आघाडी एवढं मोठं यश मिळवते असं चित्र पहिल्यांदाच पाहतो आहे. इंदिरा गांधींची लाट, मोदी लाट आपण पाहिली, राजीव गांधींची लाट पाहिली मात्र महाराष्ट्राने वेगळं काहीतरी ठरवलं होतं असंही अजित पवार म्हणाले. आज सरकार स्थापन झालं नाही, उद्या झालं नाही तर राष्ट्रपती राजवट लागेल अशी काही स्थिती नाही असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. निवडणूक आयोगाने सगळी माहिती राज्यपालांना कळवली आहे. आम्हाला प्रचंड बहुमत मिळालं आहे. विरोधकांना विरोधी पक्षनेता मिळू शकेल अशी स्थिती नाही. मात्र विरोधकांचाही मान आम्ही ठेवू. आमच्या समोरच्या बाकांवर जे असतील त्यांचा योग्य सन्मान करु. आमच्यावर खूप जबाबदारी आहे असंही अजित पवार म्हणाले.

हे पण वाचा- Muslim Candidates : महायुतीचा प्रचंड विजय, महाराष्ट्रात निवडून आलेले मुस्लीम उमेदवार किती? वाचा यादी!

प्रीती संगमावर रोहित पवार अजित पवार भेट

रोहित पवार आणि अजित पवार यांची भेट प्रीतीसंगमावर झाली. त्यावेळी रोहित पवार हे अजित पवारांच्या पाया पडले. त्यावेळी शहाण्यात थोडक्यात निवडून आलास दर्शन घे काकाचं असं अजित पवार मिश्कीलपणे म्हणाले. त्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. पुढे अजित पवार म्हणाले, रोहित माझ्या पाया पडला. वडीलधाऱ्यांचा मान ठेवणं ही आपली संस्कृती आहे. आम्ही लवकर आलो असतो तर शरद पवार भेटले असते. आम्ही त्यांचे आशीर्वाद घेतले असते. टायमिंग जुळलं नाही. आजचा दिवस यशवंत राव चव्हाण यांचं स्मरण करण्याचा आहे त्या निमित्ताने रोहित पवार या ठिकाणी आले होते असंही अजित पवार म्हणाले. रोहितला मी चांगलं काम कर असं म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar news rohit pawar take blessings from him what ajit pawar said scj