छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये भाजपाची सत्ता स्थापनेकडे वाटचाल सुरू आहे. तर, तेलंगणात भारत राष्ट्र समितीला पराभवाचा सामना करावा लागला असून काँग्रेसने जोरदार मुसंडी मारला आहे. पण, राजस्थान आणि छत्तीसगडसारखी राज्ये काँग्रेसच्या हातून निसटली आहेत. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“हा निकाल अनपेक्षित लागला नाही. मी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. तेव्हा अमित शाहांनी ‘निकाल चांगला लागेल,’ असं सांगितलं होतं. पण, काहीवेळा नको तेवढा आत्मविश्वास दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय,” असा टोला अजित पवारांनी काँग्रेसला लगावला आहे.

“के. चंद्रशेखर राव यांनी खूप जाहिरातबाजी केली”

“नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती होत आहे. जागतिक पातळीवर भारताचा नावलौकिक वाढला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये नागरिकांनी कौल दिला आहे. तेलंगणात रेवंथ रेड्डी हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते होते. पण, काही कारणास्तव ते काँग्रेसमध्ये गेले. त्यामुळे तेलंगणातील चित्र बदलेले दिसत आहे. के. चंद्रशेखर राव यांनी खूप जाहिरातबाजी केली. पण, लोकांनी त्यांना नाकारलं,” असंही अजित पवारांनी म्हटलं.

“तेलंगणात वेगळा निकाल कसा काय लागला?”

“आता इंडिया आघाडीतील नेते ईव्हीएमध्ये घोटाळा झाल्याचं बोलायला लागले, तर आश्चर्य वाटायला नको. मग, तेलंगणात वेगळा निकाल कसा काय लागला? जनतेनं मोदी सरकारला पाठिंबा आहे. पंजाबात आपचं सरकार आलं. दिल्लीतही दुसऱ्यांदा आप निवडून आली. त्यांनीही ईव्हीएमध्ये घोटाळा केला का?” असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला.

“…तर चव्हाण प्रतिष्ठानला येऊन द्यायचं नव्हते”

“मी कर्जतमधील शिबिरात बोललो त्या गोष्टीत त्रिवार सत्य आहे. मी २ जुलैला शपथ घेतली. विधिमंडळ अधिवेशनाच्या काळातच आम्ही यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला गेलो होतो. आमच्याबद्दल राग होता, तर चव्हाण प्रतिष्ठानला येऊन द्यायचं नव्हते. पुण्यात उद्योगपतीच्या घरीही मी गेलो होतो. आज एक आणि उद्या एक बोलायचं तो माझा स्वभाव नाही,” असं स्पष्टीकरण शरद पवारांनी केलेल्या टीकेवर अजित पवारांनी दिलं आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar reaction chhatisgarh rajasthan madhya pradesh bjp winning telangana congress ssa