Premium

अजित पवारांनी बोलून दाखवली खंत, “शरद पवार माझं दैवत, मी त्यांचा मुलगा असतो तर…”

८० वर्षांच्या पुढे वय गेल्यावर नव्या लोकांनाही संधी द्यायला हवी. मी आता साठीचा झालो आहे असंही अजित पवार म्हणाले आहेत.

What Ajit Pawar Said About Sharad Pawar ?
शरद पवारांबाबत काय म्हणाले अजित पवार?

शरद पवार आणि अजित पवार या दोघांमध्ये पडलेली फूट ही सर्वश्रुत आहे. अजित पवार यांनी जुलै २०२३ मध्ये महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. काका विरुद्ध पुतण्या असा संघर्ष महाराष्ट्रात पाहण्यास मिळतो आहे. तसंच पक्षाचं नाव आणि चिन्ह हे देखील अजित पवारांना देण्यात आलं आहे. नुकतीच बारामतीची निवडणूकही पार पडली. अशात शरद पवारांचा मुलगा असतो तर असं म्हणत अजित पवारांनी त्यांच्या मनातली खंत शिरुरच्या सभेत बोलून दाखवली आहे.

शिरुरने मला खासदार केलं आहे

“मी १९९१ मध्ये जेव्हा खासदारकीला उभा होतो तेव्हा मला शिरुर विधानसभा मतदारसंघाने प्रचंड मतदान केलं होतं. देशात नंबर एकच्या मताने मी निवडून आलो होतो. तेव्हा मतदारसंघ छोटे होते. मी तेव्हाच ठरवलं होतं की राजकीय जीवनात आहे तोपर्यंत बारामती, इंदापूर, पुरंदर, शिरुर, पिंपरी चिंचवड, दौंड या सहा मतदारसंघांना आपण विसरायचं नाही. नंतर मतदार संघ बदलले. खेड जाऊन शिरुर मतदारसंघ झाला. निवडणुका म्हटलं की ग्रामपंचायत, जिल्हा परिषद वेगळ्या. आमदारकीची निवडणूक राज्याचा प्रमुख निवडायची असते. तर आत्ताची निवडणूक ही देशाचा नेता निवडायची आहे हे विसरु नका.” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

people are lucky who got love from grandma emotional video
“आजी म्हणजे काय?” VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ” ज्या लोकांना आज्जीचे प्रेम मिळाले…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Tragic Video! Devotee Collapses And Dies Of Heart Attack While Circumambulating Pillar At Hyderabad Temple
बिनभरवशाचं आयुष्य! देवाच्या दारात तरुणाला मृत्यूनं कवटाळलं; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले “देवालाही दया आली नाही”
ajit-pawar on sharad pawar
Ajit Pawar on Sharad Pawar : “ते ८५ वर्षांचे अन् मला रिटायर करायला निघालेत”, अजित पवारांची शरद पवारांवर टीका
Ajit Pawar Questionnise the voters of Baramati about the retirement of Sharad Pawar Pune print news
शरद पवारांंच्या निवृत्तीनंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार यांची बारामतीतील मतदारांना विचारणा
Video viral grandmothers dance performed on Pahun Jevla Kay song which famous for gautami patil lavani
“पाव्हणं जेवला का?” डोक्यावरचा पदर खाली पडू न देता आजीबाईंचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून म्हणाल “अशी पिढी पुन्हा होणे नाही”
raj Rajshekhar emotional letter written to grandfather Rajshekhar
“प्रिय आजोबा…”, मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध खलनायक राजशेखर यांच्या नातवाने लिहिलं भावुक पत्र, म्हणाला…

आता वय ८४ झालं आहे, आता तरी..

आम्ही मधल्या काळात वेगळा निर्णय घेतला. शरद पवारांना आम्ही सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही आता आराम करा. तुमचं वय ८४ झालं आहे आम्ही चांगलं काम करु असा विश्वास त्यांना दिला. सुनील तटकरे, छगन भुजबळ, मी, धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल आम्ही सगळेजण योग्य प्रकारे चांगला कारभार करणारी माणसं आहोत. संकटं आल्यावर कसा आधार द्यायचा ते आम्हाला माहीत आहे. मला साहेबांनी (शरद पवार) सांगितलं ठीक आहे अजित आता मी राजीनामा देतो कारण मलाही हे कुणावर तरी सोपवायचं आहे. मी म्हटलं बघा तुमचा निर्णय आहे. मला काहींनी सांगितलं, तुम्ही या वयात साहेबांना सोडायला नको होतं. मी सोडतच नव्हतो. मी सांगत होतो तुम्ही घरी बसा, तब्बेतीला सांभाळा, आम्हाला मार्गदर्शन करा. काही सुचवायचं असेल तर सुचवा. मी ३० ते ३२ वर्षे ऐकत आलो आहे. २००४ मध्ये मुख्यमंत्रीपद नाकारायचं आहे नाकारलं, भाजपाबरोबर जायचं ठीक आहे म्हटलं, शिवसेनेबरोबर जायचं सगळं स्वीकारलं. काँग्रेसला सोडायचं सोडायचं, विदेशी स्त्रीचा मुद्दा त्यांनी काढला होता. आम्ही हू की चू केलं नाही. प्रत्येकाला कुणी तरी संधी दिली. साहेबांनी अजित पवारांनी संधी दिली हो मान्य आहे ना. पण साहेबांनाही यशवंतरावांनी संधी दिली. असंही अजित पवार म्हणाले.

“..म्हणून अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली”, देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

शरद पवार माझे दैवत

“शरद पवार हे आमचे दैवत आहेत, पण प्रत्येकाचा काळ असतो. ८० वर्षांच्या पुढे गेल्यावर नव्या लोकांनाही संधी द्यायला हवी. मी आता साठीचा झालो आहे. मी जर साहेबांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती. पण मी त्यांचा मुलगा नाही म्हणून संधी नाही. दिवसरात्र सगळा जिल्हा सांभाळला. शरद पवारांकडे जिल्हा बँक नव्हती. जिल्हा बँक इतरांच्या हाती असायची. मी राजकारणात आल्यापासून १९९१ पासून आजपर्यंत ताब्यात ठेवली आहे. जिल्हा परिषद ताब्यात ठेवली. मी कधीही कुणाला वाऱ्यावर सोडत नाही. पिंपरी चिंचवड ताब्यात नव्हतं. १९९२ ते २०१७ या कालावधीत ताब्यात ठेवलं.” असंही अजित पवार म्हणाले आहेत.

बारामती कशा पद्धतीने बदली एका बघा

“बारामती कशा पद्धतीने बदलली एकदा येऊन बघा. अनेक लोक सांगतात आम्हाला निवडून द्या आम्ही मतदारसंघ बारामतीसारखा करु. याचा अर्थ आम्ही काम केलं आहे. काही लोक कालच्या सभेत बरळले की हा गोरगंड्या कारखाना मी बंद केला. ज्यांना काम करता आलं नाही त्यांची पावती माझ्या नावावर का फाडता? असंही अजित पवार म्हणाले. त्यांच्याकडे आता मुद्दा नाही म्हणून काहीही बोलायचं आणि सांगायचं कारखाना मी बंद पाडला आणि लोकांची दिशाभूल करायची. असंही अजित पवार म्हणाले. भावनिक होऊन मतदान करु नका. मी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासमोरचं बटण दाबा कारण आपल्याला केंद्राचा निधी आणायचा आहे हे विसरु नका असंही अजित पवार म्हणाले.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ajit pawar said sharad pawar is my god may i would have been his son ajit pawar speech scj

First published on: 09-05-2024 at 13:25 IST

संबंधित बातम्या