Ajit Pawar : आपल्या आपल्या परिने प्रत्येकजण अंदाज व्यक्त होत होते. मात्र महाराष्ट्रातल्या जनतेने विकासाकडे पाहून जे यश प्राप्त करुन दिलं आहे. त्यामुळे मी मनापासून सगळ्या महाराष्ट्राचे आभार मानतो. कार्यकर्ते राबले, उमेदवार राबले आणि सगळ्यांनी ही निवडणूक आपली निवडणूक आहे असं समजून कामाला लागले. आमच्या योजनांबाबत चेष्टा मस्करी करण्यात आली. राज्य कंगाल केलं वगैरे सांगण्यात आलं. मात्र विरोधकांचे जाहीरनामे आल्यानंतर काय चाललं आहे ते आम्हाला समजलं. आम्हाला लोकसभेच्या निवडणुकीत अपयश आलं. त्यातून आम्ही सावरण्याचा प्रयत्न केला. अर्थसंकल्प सादर करताना योजना आणल्या. लाडकी बहीण योजना गेमचेंजरच ठरली. त्यामुळे सगळे विरोधक उताणे पडले. आता आमच्यावरची जबाबदारी वाढली आहे, असं अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलं आहे.

मी राजकारणात आलो तेव्हापासून प्रचंड बहुमत पाहिलेलं नाही-अजित पवार

मी जेव्हापासून राजकारणात आलो आहे, तेव्हापासून इतकं प्रचंड बहुमत मी पाहिलेलं नाही. २२२ आणि २२५ असं महाराष्ट्रात मिळालेलं यश मी पाहिलेलं नाही असं अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलं आहे. अलिकडच्या काळात जसं आम्हाला समजतंय ते यश पहिल्यांदाच मिळालं आहे. खूप काही काम करावं लागेल असं मी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना फोन करुन सांगितलं. आम्हाला त्यात कुठलीही अडचण नाही. आमच्या पाठिशी केंद्र सरकार आहे. त्यांचा आम्हाला खूप मोठा आधार आहे असंही अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी म्हटलं आहे.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “इंदिरा गांधी मोठ्या नेत्या, पण तेव्हा आमच्यासाठी व्हिलन होत्या”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Image Of Supriya Sule And Ajit Pawar
Supriya Sule : “मी बोलते, पण अजित पवार माझ्याशी…”, पवार कुटुंबीयांतील दुराव्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
Manikrao Kokate On DCM Ajit Pawar
Manikrao Kokate : “अजित पवारांना जे कळतं ते कोणालाही…”, माणिकराव कोकाटेंचं कृषी मंत्रि‍पदाबाबत मोठं भाष्य; म्हणाले, “मला अपेक्षा…”
sharad pawar slams amit shah news in marathi
देशाचे पहिले तडीपार गृहमंत्री! शरद पवारांचा अमित शहांवर प्रतिहल्ला
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal : “केजरीवाल आणि पंतप्रधान मोदी यांच्यात फरक नाही, दोघेही…”; राहुल गांधींच्या टीकेला आप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
Amit Shah in BJP Shirdi Convention news in marathi
अग्रलेख : दबंग… दयावान?

हे पण वाचा- Devendra Fadnavis : विधानसभेत महायुतीला मोठं यश, मुख्यमंत्री कोण होणार? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अमित शाहांनी स्पष्ट सांगितलं…”

आता पुढची पाच वर्षे आम्ही एकोप्याने काम करु-अजित पवार

विरोधक टीका करतात की बॅलेट पेपरने निवडणूक घ्यायला हवी होती. मग ती लोकसभेलाही घ्यायला हवी होती. तेव्हा ईव्हीएम बरोबर होतं का? झारखंड आमच्या हातून गेलं आहे आम्ही काही म्हटलं आहे का? महायुती महाराष्ट्रात जोर सगळ्याच ठिकाणी पाहण्यास मिळाल्या. असंही अजित पवार म्हणाले. सगळीकडे महाराष्ट्रात महायुतीला चांगलं यश मिळालं. जनतेच्या ऋणातच आम्ही राहू शकतो. पाच वर्षे अत्यंत एकोप्याने शेवटपर्यंत काम करेल आणि राज्याच्या सर्वांगिण विकासासाठीच काम करु. विकास हा केंद्रबिंदू मानून आम्ही करत आहोत, करत राहू मतदार बंधू भगिनींचे मी आभार मानतो असं अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी म्हटलं आहे. तसंच आमच्यावरची जबाबदारी आता वाढली आहे असंही अजित पवार म्हणाले.

Story img Loader