Ajit Pawar Baramati Assembly constituency Election 2024 : राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार यांनी आज (२८ ऑक्टोबर) बारामती विधानसभा मतदारसंघात जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर कन्हेरी येथील प्रचारसभेला संबोधित केलं. या सभेत भाषण करताना अजित पवार म्हणाले, “इथे आलेल्या कार्यकर्त्यांनी, लोकांनी लोकसभा निवडणुकीत सुप्रियाला (खासदार सुप्रिया सुळे) मत दिलं आहे, हे मला मान्य आहे. त्यांनी आधीच ठरवलं होतं, लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादाला मत द्यायचं. दादा म्हणजे हा (मी) दादा, नाहीतर दुसऱ्या दादाला (कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार) वाटेल माझं नाव घेतलं. लोकसभेनंतर मी थोडा नाराज झालो होतो. मी म्हटलं, मी आता इथून उभा राहत नाही. त्यानंतर रवीबापू आणि आमचे इतर कार्यकर्ते, शिरूरच्या अध्यक्षांनी मला सांगितलं, अजि दादा तुम्ही शिरूरला येऊन विधानसभेचा अर्ज भरा, आम्ही तुम्हाला ढीगभर मतांनी निवडून देऊ”.

उपमुख्यमंत्री म्हणाले, आमचे कार्यकर्ते, पदाधिकारी मला म्हणाले, अजितदादा तुम्ही बारामतीत जेवढं काम केलं तेवढं काम पाच वर्षांत आमच्या शिरूरमध्ये केलं तरी आमच्या पुढच्या १० पिढ्यांचं कल्याण होईल. त्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी अशीच एक सभा सिन्नरमध्ये आयोजित केली होती. ते मला म्हणाले, तुम्ही तिकडे येऊन निवडणूक लढा. मी त्यांना म्हटलं नाही, त्यानंतर परवा कार्यकर्त्यांनी काही वेगळ्या गोष्टी केल्या, मी काही नौटंकी केली नाही, मी तुमच्यावर प्रेम करतो, तुम्ही अधिकार दाखवला त्यामुळे मी ठरवलं, आपण लोकशाही मानतो, बहुमताचा आदर केला पाहिजे. जिवाभावाचे कार्यकर्ते जे काही सांगत आहेत ते आपण ऐकलं पाहिजे आणि मी माझा निर्णय बदलला. मी विचार बदलून बारामतीमधून विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.

MLA Anna Bansode candidature has been announced from Pimpri Assembly Constituency Pimpri
पिंपरी विधानसभा: उमेदवारी जाहीर झाल्यावर आमदार अण्णा बनसोडे नाराज गटावर म्हणाले “आमच्यात वाद… “
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
Jayashree Thorat On Sujay Vikhe Patil:
Jayashree Thorat : “खबरदार! माझ्या बापाविषयी बोलाल तर..”, बाळासाहेब थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंना इशारा
Ajit Pawar
Ajit Pawar : “तुमच्या पक्षातील लोक सोडून चाललेत”, पत्रकारांच्या प्रश्नांवर अजित पवार म्हणाले, “मी ज्यांना…”
Sharad Pawar Taunts to Ajit Pawar
Sharad Pawar : “बारामतीतही एक बहीण निवडणुकीला उभी होती, तेव्हा…” ; ‘लाडकी बहीण’वरुन शरद पवारांचा अजित पवारांना टोला
ramraje naik nimbalkar ajit pawar (1)
अजित पवारांना मोठा धक्का, रामराजे नाईक निंबाळकरांनी मार्ग बदलला; म्हणाले, “इथून पुढे मी…”
Manikrao Kokate On Ajit Pawar
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंची अजित पवारांना मोठी ऑफर; म्हणाले, “सिन्नरमधून…”
Ajit Pawar On Sharad Pawar
Ajit Pawar : वेगळी भूमिका घेण्याबाबत अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “मी शरद पवारांना…”

हे ही वाचा >> Sharad Pawar NCP 4th Candidate List : मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची चौथी यादी जाहीर; सात उमेदवारांची घोषणा, कोणाला कुठून मिळाली संधी?

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

अजित पवार म्हणाले, “मी तुम्हाला एवढंच सांगितलं की तुमच्या मनात आहे तोच उमेदवार देण्याचं काम मी करेन. त्यानंतर पक्षाने त्या संदर्भातील निर्णय घेतले. महायुतीने ही जागा आपल्या पक्षाला सोडली, म्हणून मी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे”.

हे ही वाचा >> Hasan Mushrif : “सत्ता आल्यास मी उपमुख्यमंत्री होणार”, मुश्रीफांचा दावा; अजित पवारांचा पत्ता कट? मुख्यमंत्रिपदाबद्दल मोठं वक्तव्य

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार म्हणाले, “मी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर तुम्हा सर्व कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची जबाबदारी वाढली आहे. कारण मला महाराष्ट्रात फिरायचं आहे. मी तिकडे फिरत असताना तुम्हाला बारामतीमध्ये काम करावं लागेल. मी तुम्हाला सांगतो मला शक्य होईल तितका वेळ मी बारामतीला देईन, परंतु, प्रत्येक कार्यकर्त्याने इथे काम करायला हवं”.