बारामती लोकसभा मतदारसंघातील लढत दिवसेंदिवस रंगत होत चालली आहे. नणंद-भावजयीमधील (विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार) या लढतीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांनी प्रचाराचा नारळ फोडला असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. तर, सुनेत्रा पवार यांचे पती आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पक्षाचे दोन गट पडल्यापासूनच शरद पवार आणि त्यांच्या गटातील नेत्यांवर टीका करत आहेत. अजित पवार हे शरद पवारांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. आज (२० एप्रिल) पुन्हा एकदा अजित पवारांनी शरद पवारांवर निशाणा साधला. अजित पवार म्हणाले, १९८९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी बारामतीमधील अनेक नेत्यांची इच्छा होती की मला काँग्रेसकडून बारामती लोकसभेचं तिकीट मिळावं. मात्र शरद पवार यांनी त्यावेळी त्यास विरोध केला.

अजित पवार म्हणाले, १९८९ साली विजय कोलते, हिरेमण काका आणि बारामतीतले काही प्रतिष्ठित नेतेमंडळी शरद पवार यांना वर्षा बंगल्यावर (मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान, शरद पवार हे तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते) भेटले. तिथे ही सगळी मंडळी शरद पवारांना म्हणाली, अजितला यंदा बारामतीतून लोकसभेची उमेदवारी द्या. त्यावर शरद पवार म्हणाले, अजित पवारला तुम्ही इथे पाठवा, त्याला राजकारण करू द्या आणि मी तिकडे काटेवाडीला जाऊन शेती करतो. शरद पवारांचं हे वाक्य ऐकून तोंडात मारल्यासारखे सर्वजण बारामतीला परत आले.

Manikrao Kokate On DCM Ajit Pawar
Manikrao Kokate : “अजित पवारांना जे कळतं ते कोणालाही…”, माणिकराव कोकाटेंचं कृषी मंत्रि‍पदाबाबत मोठं भाष्य; म्हणाले, “मला अपेक्षा…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Pankaja Munde
Pankaja Munde : बीड जिल्ह्यातील तणावाच्या परिस्थितीवर पंकजा मुंडेंचं मोठं विधान; म्हणाल्या, “मी गृहमंत्र्यांशी…”
Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
Guardian Minister Controversy
Manikrao Kokate : पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आता निर्णय…”
Hasan Mushrif
Hasan Mushrif : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत हसन मुश्रीफ यांचं विधान चर्चेत; म्हणाले, “आता पुढील निवडणुकीच्या…”
Vijay Wadettiwar
“जागावाटपाच्या घोळामुळे महाविकास आघाडी पराभूत”, ‘त्या’ दोन नेत्यांकडे बोट दाखवत विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य
Ajit Pawar discussion with Amit Shah in Delhi
अजित पवारांची दिल्लीत अमित शहांशी चर्चा

हे ही वाचा >>“…तर मोदींना सत्तेत बसण्याचा अधिकार नाही”, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचा अहवाल मांडत शरद पवारांची टीका

दरम्यान, बारामतीमध्ये शुक्रवारी (१९ एप्रिल) एका प्रचारसभेत बोलताना अजित पवार यांनी शरद पवारांचा उल्लेख न करता त्यांच्यावर टीका केली होती. अजित पवार म्हणाले होते, माझ्यावर वेगवेगळे आरोप केले जातात. पण त्यांच्या आरोपामुळे मला काय भोकं पडत नाही. बारामतीची जनता मला अनेक वर्षे ओळखते. माझं लहाणपण येथेच गेलंय. बारामतीतील सर्व स्थित्यंतराचे बारामतीतील वडिलधारी लोक साक्षीदार आहेत. या मतदारसंघात लोकांना भावनिक केलं जात आहे. कालच्या शरद पवारांच्या सभेत अमेरिका टाईम्सच्या पत्रकारासह अनेक पत्रकार मंडळी आली होती. यावेळी अजित पवार खुर्चीवर बसले होते. तर सुप्रिया, रोहित आणि युगेंद्र पायापाशी बसले होते. अख्ख कुटुंब जवळ घेऊन बसलं होतं. हे म्हणजे आमचं कुटुंब एकत्र असल्याचा संदेश अमेरिकेतही पोहोचला. पण मी त्यांच्याबरोबर (शरद पवार) होतो तेव्हा साहेब एके ठिकाणी बसले असतील तर मी दुसरीकडे जाऊन बसायचो.

Story img Loader