बारामती लोकसभा मतदारसंघातील लढत दिवसेंदिवस रंगत होत चालली आहे. नणंद-भावजयीमधील (विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार) या लढतीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांनी प्रचाराचा नारळ फोडला असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. तर, सुनेत्रा पवार यांचे पती आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पक्षाचे दोन गट पडल्यापासूनच शरद पवार आणि त्यांच्या गटातील नेत्यांवर टीका करत आहेत. अजित पवार हे शरद पवारांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. आज (२० एप्रिल) पुन्हा एकदा अजित पवारांनी शरद पवारांवर निशाणा साधला. अजित पवार म्हणाले, १९८९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी बारामतीमधील अनेक नेत्यांची इच्छा होती की मला काँग्रेसकडून बारामती लोकसभेचं तिकीट मिळावं. मात्र शरद पवार यांनी त्यावेळी त्यास विरोध केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा