Ajit Pawar Vs Yugendra Pawar : बारामतीत पुन्हा काका पुतण्यांची लढाई, अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवारांचा रंगणार ‘सामना’

युगेंद्र पवार हे राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यापासून चांगलेच सक्रिय झाले आहेत.

Yugendra Pawar Vs Ajit Pawar
अजित पवारांविरोधात पुतण्या युगेंद्र पवार बारामतीतून लढणार (फोटो-लोकसत्ता)

Ajit Pawar Vs Yugendra Pawar : लोकसभा निवडणुकीच्या वेळी बारामती हा हाय व्होल्टेज मतदारसंघ ठरला होता. कारण या निवडणुकीत सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून तर सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून उभ्या होत्या. या निवडणुकीत शरद पवारांची जादू चालली. सुप्रिया सुळे मोठ्या मताधिक्क्याने निवडून आल्या. ही निवडणूक थेट नणंद भावयजय यांच्यातला सामना होती. तरीही ही निवडणूक शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीही होती. आता महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. बारामती पु्न्हा चर्चेत आहे.

बारामतीत काका पुतण्याची लढाई

बारामतीत काका-पुतण्याची लढाई पुन्हा रंगणार आहे. युगेंद्र पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने तिकिट दिलं आहे. तर अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढणार आहेत. त्यामुळे बारामतीत काका-पुतणे म्हणजेच अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार ( Ajit Pawar Vs Yugendra Pawar ) असा सामना रंगणार आहे. या निवडणुकीत नेमकं काय होणार ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तसंच अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी शरद पवारांनी कशी भूमिका बदलली होती आणि मग त्यांना नंतर कशी साथ लाभली? हे सांगितलं होतं. आता अजित पवारांच्या प्रचाराचा मुद्दा काय असेल? हे पाहणं महत्त्वाचं असेल.

अजित पवार यांच्याविरोधात लढणारे युगेंद्र पवार कोण आहेत?

Ajit Pawar Vs Yugendra Pawar युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत. विद्या प्रतिष्ठान शिक्षण संस्थेच्या खजिनदार पदाची जबाबदारी ते सांभाळत आहेत. शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून बारामती,इंदापूर आणि फलटण तालुक्यात अनेक सामाजिक कामे केली आहे. बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे देखील अध्यक्ष आहेत.

हे पण वाचा- Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा तिकिटवाटपात घराणेशाहीचा सर्वपक्षीय सुळसुळाट! दिग्गज नेत्यांच्या मुलांना तिकिट भावांनाही गोंजारलं!

राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर युगेंद्र पवार सक्रिय

Ajit Pawar Vs Yugendra Pawar राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर युगेंद्र पवार शरद पवारांसाठी सक्रीय झाले. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी युगेंद्र पवार यांनी अख्खी बारामती पिंजून काढली. त्याचवेळी युगेंद्र पवार शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणुकीत बारामतीतून उमेदवार असतील अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. तसंच श्रीनिवास पवार यांनीही अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडायला नको होती असं वक्तव्य केलं होतं. श्रीनिवास पवार आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने सुप्रिया सुळेंचा प्रचार केला होता. बारामती आपल्याच ताब्यात आहे हे लोकसभेला शरद पवारांनी दाखवून दिलं. आता अजित पवारांच्या विरोधात त्यांच्याच पुतण्याला उभं करण्याची खेळी शरद पवारांनी खेळली आहे. त्यामुळे बारामतीचं राजकारण कुठल्या वाटेवर जातं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ajit pawar vs yugendra pawar in baramati the new tussle of baramati scj

First published on: 24-10-2024 at 20:53 IST
Show comments