Karnataka Election Results 2023 : कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्याने कर्नाटकच्या सत्तेच्या चाव्या आता काँग्रेसच्या हाती जाण्याची शक्यता आहे. काल रात्रीपर्यंत निवडणूक आयोगाकडून निकाल स्पष्ट झाला होता. परंतु, बंगळुरुतील जयनगर मतदारसंघातील जागेचा निकाल लागणे बाकी होता. रात्री उशिरा या जागेवर काँग्रेसनेच दावा केला. परंतु, रात्रभर झालेल्या हायवोल्टेज ड्रामामुळे ही जागा आता भाजपाला मिळाली आहे. महत्त्वाचं म्हणजे अवघ्या १६ मतांच्या फरकाने काँग्रेसला ही जागा गमवावी लागली.
बंगळुरूतील जयनगर मतदारसंघासाठी मतमोजणी सुरू असताना सुरुवातीच्या कलांनुसार काँग्रेसच्या उमेदवार सौम्या रेड्डी आघाडीवर होत्या. मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी जयनगर मतदारसंघासाठी काँग्रेसच्या उमदेवार सौम्या रेड्डी यांना घोषितही केलं. परंतु, या मतमोजणीवर भाजपाने आक्षेप घेतला. त्यांनी पुन्हा फेरमतमोजणीची मागणी केली.
हेही वाचा >> कर्नाटकात भाजपाचा दारूण पराभव, पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “काँग्रेसचं…”
अर्थात, काँग्रेसचा उमेदवार जिंकला असल्याने काँग्रसने फेरमोजणीला प्रखर विरोध दर्शवला. त्यामुळे मध्यरात्रीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डि. के. शिवकुमार, सौम्या रेड्डी यांचे वडील आणि कार्यकारी अध्यक्ष रामलिंगा रेड्डीसह त्यांची कायदेशीर टीम मतमोजणी केंद्रावर आली. परंतु, तरीही फेरमोजणी करण्यात आली. या फेरमोजणीत भाजपा उमेदवाराचे सकाळी अवैध ठरवलेली मते वैध ठरवण्यात आली. त्यामुळे भाजपा उमेदवाराच्या मतमोजणीची आकडेवारी वाढली. परिणामी, भाजपा उमेदवार राममूर्ति यांना पहाटे विजयी घोषित करण्यात आले. अवघ्या १६ मतांच्या फरकाने काँग्रेस उमेदवार सौम्या रेड्डी यांना पराभव स्वीकारावा लागला. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळानुसार, काँग्रेस उमेदवार सौम्या रेड्डी यांना ५७ हजार ७८१ मते मिळाली असून राममूर्ति यांना ५७ हजार ७९७ मते मिळाली आहेत. काँग्रेसने ही जागा गमावली असल्याने कर्नाटकात काँग्रेसची संख्या १३५ झाली असून भाजपाची ६६ झाली आहे.
परंतु, या मतमोजणीत फेरफार झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. “निवडणूक अधिकाऱ्यांनी रेड्डी यांना विजयी घोषित केलं होतं. परंतु, फेरमतमोजणी झाल्याने राममूर्ति यांची अवैध ठरवलेली १६० मते वैध ठरवण्यात आली”, असा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला. “निवडणूक आयोगाने आधीच सौम्या रेड्डी यांना विजयी घोषित केलेले असताना अधिकारी दुसरा उमेदवार कसा घोषित करू शकतात?”, असा सवालही काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने उपस्थित केला आहे. “शिवाय, ही पोस्टल बॅलेट मते आहेत ज्यावर अराजपत्रित अधिकाऱ्याची स्वाक्षरी आहे. ते वैध मानले जाऊ शकत नाही”, असंही नेत्याने म्हटलं आहे.
भाजपाचा उमेदवार विजयी ठरताच भाजपाने मध्यरात्रीच फटाके वाजवून जल्लोष साजरा केला. तसंच, मध्यरात्री भाजप लोकसभा खासदार तेजस्वी सूर्या यांनी ट्विट केले की, “आम्ही जयनगरवर पुन्हा दावा करतो! श्री बीएन विजयकुमार सर यांना विनम्र श्रद्धांजली.”
हेही वाचा >> “शिवसेनेच्या जडणघडणीत शाहिरांचे योगदान, पण केरला स्टोरीचे तुणतुणे वाजवत…”, संजय राऊतांचे शिंदे-फडणवीस सरकारवर शरसंधान
काँग्रेस उच्च न्यायालयात जाणार
भाजप खासदार सूर्या, भाजप नेते आर अशोक आणि केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी मतदारांमध्ये फेरफार केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. तसंच, याविरोधात ते उच्च न्यायालयातही जाणार असल्याचे सांगण्यात आले.
भाजपा खासदाराकडून नियमांचं उल्लंघन
काँग्रेस समर्थकांनी बळजबरीने मतमोजणी केंद्रात घुसण्याचा प्रयत्न केल्याने काँग्रेस नेते डी. के. सुरेश आणि पोलिस अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. भाजपा खासदार सूर्या आणि भाजपा नेते आर. अशोक यांचा मतदान केंद्रातील एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये खासदार सूर्या मोबाईल वापरताना दिसत आहेत. यामुळे नियमांचे उल्लंघन झाले असल्याचेही काँग्रेस नेत्याचे म्हणणे आहे.
बंगळुरूत भाजपाच
बेंगळुरूच्या जागांवर भाजपने पकड कायम ठेवली आहे. भाजप आणि काँग्रेस या दोघांनीही बंगळुरूतील आपापल्या जागांवर टिकून राहण्यास यश मिळवले. 2018 च्या निकालांच्या तुलनेत भाजपने १ जागा अधिक मिळवली असल्याने बंगळुरूतील भाजपा जागांची संख्या १६ झाली आहे, तर काँग्रेसने १२ जागा बळकावल्या आहेत.