Premium

“अमित शाहांनी १५० जिल्ह्याधिकाऱ्यांना फोन केले”; काँग्रेसच्या दाव्यावर ECI आयुक्त म्हणाले, “मतमोजणीच्या आधीच…”

मतदानाच्या काळात १५० जिल्हा अधिकारी आणि रिटर्निंग अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी फोन केले होते, असा दावा जयराम रमेश यांनी केला होता. या दाव्याची दखल केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी घेतली.

jairam ramesh rajiv kumar amit shah
काँग्रेसच्या दाव्याची निवडणूक आयोगाकडून दखल (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी केंद्रीय गृहमंत्र अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केला होता. मतदानाच्या काळात १५० जिल्हा अधिकारी आणि रिटर्निंग अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी फोन केले होते, असा दावा जयराम रमेश यांनी केला होता. या दाव्याची दखल केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी घेतली असून जयराम रमेश यांच्यावर दाव्यावर त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

जयराम रमेश यांचा दावा काय ?

गृहमंत्री अमित शाह जिल्ह्याधिकाऱ्यांना फोन करत आहेत. आतापर्यंत त्यांनी १५० अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा केली. अधिकाऱ्यांना खुलेआमपणे धमकावण्याचा प्रयत्न लाजिरवाणं आहे. जनादेशातून लोकशाही चालते, धमकावण्याने नाही. ४ जूनला मिळणाऱ्या जनादेशातून अमित शाह, नरेंद्र मोदी आणि भाजपा सत्तेतून बाहेर असतील आणि इंडिया जनबंधन विजयी ठरेल. अधिकाऱ्यांनी कोणाच्याही दबावाखाली येऊ नये, असं जयराम रमेश म्हणाले होते.

Sharad Pawar criticism that such rulers have not been seen in the history of the maharshtra state pune print news
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर शरद पवारांनी केली देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी; म्हणाले, “गृहमंत्री एवढ्या सौम्यतेने…”
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Amit Deshmukh statement caused unease among Congress workers in Latur print politics news
अमित देशमुख यांच्या विधानाने लातूरात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता
Badlapur accused police custody, Badlapur accused,
गुन्ह्याच्या अधिकच्या तपासासाठी बदलापूर आरोपींचा पोलिसांकडे ताबा
Shivsena-BJP Pimpri, flood line Pimpri,
पिंपरी : शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी विरोध करताच प्रशासनाचे एक पाऊल मागे; पूररेषेतील बांधकामांना अभय
Party President Mallikarjun Kharge met by Nana Patole Print politics news
राज्यातील काँग्रेस नेत्यांना सबुरीचा सल्ला; नाना पटोलेंकडून पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट
Siddaramaiah
कर्नाटकात राजकीय संघर्ष वाढीला; राजीनाम्याची मागणी सिद्धरामय्यांनी फेटाळली
Jagan Mohan Reddy
नायडूंना खोटे बोलण्याची सवयच, जगन मोहन रेड्डी यांचे मोदींना पत्र; मुख्यमंत्र्यांवर थेट आरोप

निवडणूक आयोगाचे आयुक्त काय म्हणाले?

“वातावरण तयार केलं गेलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न कसा केला जाऊ शकतो? संपूर्ण देशातील ५००-८०० अधिकाऱ्यावंर दबाव टाकला जाऊ शकेल काय? कोणी दबाव टाकला असेल तर त्यांचं नाव सांगा. आम्ही त्यांना शिक्षा करू. मतमोजणीच्या आधीच त्यांचं नाव सांगा. सर्वपक्षीय शिष्टमंडळाने काही मागण्या केल्या होत्या. त्या सर्व मागण्या आम्ही मान्य केल्या आहेत. आम्ही प्रत्येक रिटर्निंग अधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे आदेश दिले आहेत”, असं राजीव कुमार म्हणाले. निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन आज मतदान प्रक्रियेविषयी माहिती दिली.

देशात यंदा सर्वाधिक मतदान

निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा देशात ६४ कोटी २ लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. G7 मधील एकूण देशातील दीडपट अधिक तर, युरोपिअन युनिअनमधील २७ देशाच्या तुलनेत अडीचपट अधिक हे मतदान आहे. यंदा महिला मतदारांच्या संख्येतही वाढ झाली आहे. यामध्ये तब्बल ३१ कोटी १४ लाख महिला मतदार आहेत.

हेही वाचा>> लोकसभेच्या निमित्ताने देशात घडला विश्वविक्रम, ‘इतक्या’ कोटी मतदारांनी केलं मतदान

‘लापता जेंटलमन’ला प्रत्युत्तर

मतदानाच्या काळात निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना लापता जेंटलमन म्हणत डिवचलं गेलं होतं. या टीकेवरही त्यांनी आज प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही कधीच बाहेर गेलो नव्हतो.प्रसिद्धी पत्रकांच्या माध्यमातून आम्ही जनतेशी संवाद साधत होतो. मतदानाच्या काळात आम्ही जवळपास १०० प्रसिद्धी पत्रके काढली, असं राजीव कुमार म्हणाले.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Amit shah calls 150 district officials eci commissioner said on congresss claim before the counting of votes sgk

First published on: 03-06-2024 at 14:27 IST

संबंधित बातम्या