Haryana Assembly Election 2024 Result : हरियाणात भारतीय जनता पक्षाने काँग्रेसचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह भाजपा हरियाणात तिसऱ्यांचा सरकार स्थापन करणार आहे. भाजपाच्या या विजयानंतर आता राजकीय टीका टीप्पणीही सुरू झाली आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही या निकालानंतर राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीकास्र सोडलं आहे. अमित शाह यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नेमकं काय म्हणाले अमित शाह?

“केंद्रात तिसऱ्यांदा स्थापन झालेलं भाजपाचे सरकार असो किंवा हरियाणा, गुजरात, मध्य प्रदेशसह इतर राज्यांमध्येही पुन्हा निवडून आलेलं सरकार असो. यावरून पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने अवलंबलेली धोरणे जनतेने स्वीकारल्याचे दिसून येते. या विजयासह भारतीय राजकारणात आता एक नवीन युग सुरू झाले आहे. जनतेचा आमच्यावर अतूट विश्वास आहे. भाजपाला सलग तिसऱ्यांदा राज्याची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी हरियाणाच्या जनतेचे मनापासून आभार मानतो”, अशी प्रतिक्रिया अमित शाह यांनी दिली.

हेही वाचा – Haryana Assembly Election Result 2024 Live : “हरियाणातील विजय हा लोकशाहीचा विजय”; पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया

राहुल गांधी यांनाही केलं लक्ष्य

पुढे बोलताना त्यांनी काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांनाही लक्ष्य केलं. “आधी लोकसभा निवडणुकीत आणि आता हरियाणात मत मिळवण्यासाठी काँग्रेसने खोटी आश्वासने दिली. मात्र, जनतेने त्यांना पूर्णपणे नाकारले आहे. जनता भाजपाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. शेतकऱ्यांची आणि सैनिकांची भूमी असलेल्या हरियाणाने आपल्या व्होट बँकेसाठी परदेशात जाऊन देशाचा अपमान करणाऱ्यांना धडा शिकवला आहे”, अशी टीकाही त्यांनी राहुल गांधी यांच्यावर केली.

हेही वाचा – Haryana Vidhan Sabha Election 2024 : हरियाणातील पराभवानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हा निकाल…”

भाजपाला ४८ तर काँग्रेसला ३७ जागांवर विजय

दरम्यान, हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाने दणदणीत विजय मिळवला असून काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निवडणुकीत भाजपाने ४८ तर काँग्रेसने ३७ जागांवर विजय मिळवला आहे. याशिवाय भारतीय लोकदल पक्षाने २ तर अपक्षांना ३ जागांवर विजय मिळाला आहे.