Amit Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत दुसरं नाव आहे ते म्हणजे अमित राज ठाकरे. ‘राज’पुत्र अशी ओळख असलेले अमित ठाकरे ( Amit Thackeray ) हे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीसाठी उभे राहिले आहेत. माहीम या मतदारसंघातून ते नशीब आजमावत आहेत. या ठिकाणी त्यांच्या विरोधात कोण असणार? हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. मात्र अमित ठाकरेंची ( Amit Thackeray ) राजकीय कारकीर्द कशी आहे जाणून घेऊ.
कशी आहे अमित ठाकरेंची कारकीर्द?
अमित ठाकरे ( Amit Thackeray ) यांचा विवाह २०१९ मध्ये झाला. त्यावेळी त्यांच्या लग्नाची बरीच चर्चा झाली होती कारण अनेक दिग्गज या लग्नाला आले होते. अमित ठाकरे ( Amit Thackeray ) यांच्याकडे मनसेच्या विद्यार्थी सेनेचं अध्यक्षपद आहे. अमित ठाकरे यांनी आत्तापर्यंत मनसेच्या विविध आंदोलनांमध्ये सहभाग घेतला आहे. तसंच राज ठाकरेंच्या सभेतही ते कायमच उपस्थित असतात.
अमित शाह यांच्या भेटीलाही राज ठाकरेंसह गेले होते अमित ठाकरे
राज ठाकरेंनी काही महिन्यांपूर्वी जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती तेव्हा त्यांच्यासह अमित ठाकरे ( Amit Thackeray ) दिल्ली दौऱ्यावरही गेले होते. एवढंच नाही तर अमित ठाकरे हे राज ठाकरेंसह ममता बॅनर्जींनाही भेटले होते. गेल्या काही वर्षांपासून अमित ठाकरेंना राजकारणात आणण्यासाठी राज ठाकरे तयार करत होते. राज ठाकरे यांना जेव्हा ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलवण्यात आलं तेव्हाही अमित ठाकरे त्यांच्यासह होते.
हे पण वाचा- मनसेने जाहीर केली उमेदवारांची यादी, अमित ठाकरे माहीममधून निवडणुकीच्या रिंगणात
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आदित्य ठाकरे युवा चेहरा तर मनसेत अमित ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आदित्य ठाकरे हा तरुण चेहरा आहेत. २०१९ ला त्यांनी वरळी विधासभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी राज ठाकरेंनी मनसेचा उमेदवार दिला नव्हता. मात्र यावेळी मनसेने आदित्य ठाकरेंच्या विरोधात संदीप देशपांडेंना तिकिट दिलं आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात जसा आदित्य ठाकरे हे तरुण चेहरा आहेत तसंच मनसेत अमित ठाकरे ( Amit Thackeray ) हे तरुण चेहरा आहेत. तसंच ज्या ठिकाणी राज ठाकरे पोहचू शकत नाहीत अशा ठिकाणी भेट घेण्यासाठी किंवा तशा कारण प्रसंगी अमित ठाकरे उपस्थित दिसत होते. या सगळ्याचा उलगडा राज ठाकरेंनी जेव्हा मुलाची उमेदवारी जाहीर केली तेव्हा झाला आहे.
अमित ठाकरेंसमोरची आव्हानं काय?
अमित ठाकरे ( Amit Thackeray ) हे ठाकरे घराण्यातील पुढच्या पिढीचे सक्रिय राजकारणात उतरलेले दुसरे तरुण नेते आहेत. आदित्य ठाकरे २०१९ ला आमदार झाले होते. आता माहीम मतदारसंघात अमित ठाकरे नशीब आजमावत आहेत. २००९ मध्ये मनसेचे १३ आमदार निवडून आले होते. तर २०१९ मध्ये अवघ्या एका जागेवर मनसेला समाधान मानावं लागलं. आता पक्षाचे अधिकाधिक आमदार कसे निवडून येतील? हे अमित ठाकरेंपुढचं पहिलं आव्हान असेल. तसंच पक्षाची पुनर्बांधणी करण्याचं आणि विस्तार करण्याचं दुसरं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.