Amit Thackeray : पराभवानंतर अमित ठाकरेंची पहिली पोस्ट, “लढाई राजपुत्राची नसून..”

Amit Thackeray : अमित ठाकरे यांनी एक्स या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट लिहिली आहे.

Amit Thackeray First Post After Defeat in Mahim
अमित ठाकरेंची पराभवानंतर पहिली पोस्ट काय म्हणाले. (फोटो-लोकसत्ता)

Amit Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार अमित ठाकरे यांचा माहीममध्ये पराभव झाला आहे. सदा सरवणकर यांनी माहीममधून माघार न घेतल्याने ही निवडणूक चर्चेत आली होती. यानंतर जो निकाल समोर आला त्यात अमित ठाकरेंचा पराभव झाला आहे. अमित ठाकरे यांनी यानंतर पोस्ट लिहिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अमित ठाकरेंची कारकीर्द काय?

अमित ठाकरे ( Amit Thackeray ) यांचा विवाह २०१९ मध्ये झाला. त्यावेळी त्यांच्या लग्नाची बरीच चर्चा झाली होती कारण अनेक दिग्गज या लग्नाला आले होते. अमित ठाकरे ( Amit Thackeray ) यांच्याकडे मनसेच्या विद्यार्थी सेनेचं अध्यक्षपद आहे. अमित ठाकरे यांनी आत्तापर्यंत मनसेच्या विविध आंदोलनांमध्ये सहभाग घेतला आहे. तसंच राज ठाकरेंच्या सभेतही ते कायमच उपस्थित असतात.

पराभवानंतर अमित ठाकरेंची पहिली पोस्ट

माहिम, दादर आणि प्रभादेवीतील जनतेचा कौल मला मान्य आहे.आज विधानसभा निवडणुकीत माझ्या जनतेने जो कौल दिला, तो मी विनम्रपणे आणि अत्यंत आदराने स्वीकारतो. गेली अनेक वर्षे या प्रभागातील अगदीच बेसिक गरजांसाठी लोकांचा संघर्ष बघितला. याच संघर्षातून उभ्या राहिलेल्या विचारांनी, प्रभागाच्या विकासासाठी आणि बदलासाठी आपण एक नवा अध्याय लिहावा, केवळ या हेतूने मी या निवडणुकीत उतरलो होतो. मात्र, कदाचित येथील जनतेच्या मनात काही वेगळे असावे. हा कौल मला हेच शिकवतोय की, अजून खूप काम करायचं आहे. अजून मेहनत घ्यायची आहे. अजून संघर्ष करून माझं कर्तृत्व सिद्ध करायचं आहे. आपला विश्वास मिळवण्यासाठी अजून झटायचं आहे.

हे पण वाचा- Raj Thackeray : मनसेचं ‘इंजिन’ रुळावरून घसरलं? विधानसभेच्या निवडणुकीत सुपडा साफ; राज ठाकरेंना जनतेनं का नाकारलं?

माझी ही लढाई कधीच राजकीय सत्ता मिळवण्यासाठी नव्हती… कारण ही लढाई कोणा राजपुत्राची नसून, ती होती एका सामान्य कार्यकर्त्याची – जो सर्वांसाठी, आपल्या जनतेसाठी, आपल्या महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी झटतो. मला फक्त आपल्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य आणायचं होतं. आजचा कौल माझ्या प्रवासाचा शेवट नाही; एक नवी सुरुवात आहे. तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी, माहिम, दादर, प्रभादेवी आणि सबंध महाराष्ट्राच्या विकासासाठी, मी २४ तास झटत राहीन, हा माझा शब्द आहे. ज्या मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला मतदान केलं, त्यांचे मनापासून आभार. तुमचा विश्वास वाया जाणार नाही.

मी वचन देतो – तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी, तुमच्या विश्वासावर खरे उतरण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन… कारण माझी लढाई खूप मोठी आहे आणि ती आपण सर्वजण एकत्रितपणे नक्की जिंकू!

आपलाच,
अमित ठाकरे

अमित ठाकरेंचं आमदार व्हायचं स्वप्न भंगलं

अशी पोस्ट अमित ठाकरेंनी लिहिली आहे. अमित ठाकरे ( Amit Thackeray ) हे ठाकरे घराण्यातील पुढच्या पिढीचे सक्रिय राजकारणात उतरलेले दुसरे तरुण नेते आहेत. आदित्य ठाकरे २०१९ ला आमदार झाले होते. २००९ मध्ये मनसेचे १३ आमदार निवडून आले होते. तर २०१९ मध्ये अवघ्या एका जागेवर मनसेला समाधान मानावं लागलं. आता अमित ठाकरे यांचं आमदार व्हायचं स्वप्न भंगलं आहे. मात्र त्यांची पोस्ट चर्चेत आली आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Amit thackeray post after his defeat in vidhan sabha election maharashtra from mahim seat scj

First published on: 23-11-2024 at 17:16 IST