राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. हा प्रचार अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. त्यापार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांच्या आणि उमेदवारांच्या सभा तसेच मुलाखतींचा धडाका सुरू आहे. दरम्यान, अमित ठाकरे यांनीही एका मुलाखतीत राज ठाकरे यांच्या संदर्भातील एक भावनिक प्रसंग सांगितला आहे.

अमित ठाकरेंनी नुकताच लोकशाही या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांना राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेत, तर राज्याच्या राजकारणात फरक पडू शकतो का? असा प्रश्न विचारण्यात आला. मात्र, या प्रश्नाचं थेट उत्तर न देता त्यांनी राज ठाकरेंच्या डोळात पहिल्यांदा अश्रू बघितल्याचा प्रसंग सांगितला.

Uddhav Thackeray and rahul gandhi
इंडिया आघाडीत बिघाडी? विसंवादावरून ठाकरे गटाची काँग्रेसवर तोफ; म्हणाले, “हेवेदावे, जळमटे अन् कुरघोड्यांना…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
Uddhav thackeray and Prakash Ambedkar
ठाकरेंच्या शिवसेनेने स्वबळाचा नारा दिल्यानंतर प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप; म्हणाले, “आदित्य ठाकरेंच्या…”
Uddhav Thackeray statement on Balasaheb work Mumbai news
श्रेयवादापेक्षा बाळासाहेबांचे कार्य पोहोचवणे महत्त्वाचे; स्मारकाच्या पाहणीनंतर उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन
What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, “ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले नाहीत ते सगळेजण…”
Aditya Thackeray meets Devendra Fadnavis for the third time in a month Mumbai news
आदित्य ठाकरे महिनाभरात तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला
What Aditya Thackeray Said?
Aditya Thackeray : “…तर आम्हीही देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करु”, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर असं का म्हणाले आदित्य ठाकरे?

हेही वाचा – आमच्या भविष्यासाठी अमितकाका तुम्हाला आमदार व्हावेच लागेल, मनसे पदाधिकाऱ्याच्या कन्येचे प्रचारादरम्यान अमित ठाकरेंना पत्र

काय म्हणाले अमित ठाकरे?

“२००६ मध्ये मी शाळेत होतो. यावेळी शिवसेना पक्ष वैगरे मला काहीही माहिती नव्हतं. मी माझं आयुष्य जगत होतो. त्यावेळी फक्त बाळासाहेब हे आजोबा आणि उद्धव ठाकरे हे काका आहेत, एवढंच नातं मला माहिती होतं. एकदिवशी मी घरातून खाली उतरलो, तेवढ्यात माझे वडील म्हणजे राज ठाकरे त्यांच्या गाडीतून बाहेर उतरले. त्यावेळी मी पहिल्यांदा त्यांच्या डोळ्यात अश्रू बघितले”, असं अमित ठाकरे यांनी सांगितलं.

“हे सगळं घडत असताना राज ठाकरे शिवसेना सोडणार समजलं होतं. त्यानंतर अनेक गोष्टी माझ्या कानावर येत होत्या. काहीतरी चुकीचं घडतंय हे जाणवत होतं. पुढे त्यांनी शिवसेना सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष काढला. २००९ मध्ये आमच्या पक्षाला मोठं यश मिळालं”. असंही अमित ठाकरे म्हणाले.

हेही वाचा – Mitali Thackeray : प्रचारादरम्यान मिताली ठाकरेंना काय जाणवलं? म्हणाल्या, “महिलांशी कनेक्ट झाल्यावर…”

“२०१७ मध्ये मी आजारी असताना शिवसेनेने मनसेचे सहा नगरसेवक पैसे देऊन फोडले. आज हे खोके घेतले दुसऱ्यांना म्हणतात, पण यांनीही तेव्हा खोके देऊन नगरसेवक फोडले. मी आजारी असताना हे घडलं होतं. हे मला पटलं नाही. तेव्हा हे लोक कशी आहेत, हे कळलं. खरं तर त्यांनी पाठिंबा मागितला असता, तर राज ठाकरेंनी तसाच दिला असता, पण त्यांनी नगरसेवक फोडले, त्यावेळी राज ठाकरेंना काय वाटलं असेल, याचा विचार कुणीही करत नाही”, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

माहीममध्ये तिरंगी लढत

दरम्यान, अमित ठाकरे मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघातून मनसेचे उमेदवार असून तिथे तिरंगी लढत बघायला मिळत आहे. अमित ठाकरेंविरोधात शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर, तर उद्धव ठाकरे गटाकडून महेश सावंत रिंगणात आहे. त्यामुळे माहीमची जनता नेमका कुणाला कौल देते, हे २३ तारखेला कळणार आहे.

Story img Loader