लोकसभेला मोदींना पाठिंबा देणाऱ्या मनसेला भाजपा विधानसभा निवडणुकीत साथ देणार? अमित ठाकरे म्हणाले…

Amit Thackeray on BJP : मनविसे प्रमुख अमित ठाकरे यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली.

AMit Thackeray
राज्यात विधानसभेचे पडघम वाजू लागले आहेत. (फोटो : लोकसत्ता)

Amit Thackeray on BJP Mahayuti in Maharashtra Assembly Election 2024 : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणि पर्यायाने भाजपासह महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाकडून एकही उमेदवार उतरवला नव्हता. उलट राज यांनी राज्यभर महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला. राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुंबई, ठाणे, पुणे व कोकणात प्रचारसभा देखील घेतल्या होत्या. त्यानंतर मनसे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीत सहभागी होईल अशी चर्चा रंगू लागली होती. तसेच राज ठाकरे यांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व भाजपाचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी गाठीभेटी होऊ लागल्या होत्या. त्यामुळे मनसे महायुतीचाच भाग होईल असं म्हटलं जात होतं. मात्र या पक्षांची युती होऊ शकली नाही. मनसेने विधानसभा निवडणुकीत ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे.

दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. महायुतीमधील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पाठोपाठ एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील ४५ उमेदवार जाहीर केले आहेत. अनेक मतदारसंघांमध्ये मनसेचा भाजपा आणि शिवसेनेशी (शिंदे) थेट सामना होणार आहे. तसेच मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांना देखील मनसेने विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. अमित ठाकरे माहीम मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. अशातच असा प्रश्न उपस्थित केला जात आहे की, विधानसभा निवडणुकीत भाजपा व महायुतीतील पक्ष मनसेच्या काही उमेदवारांना पाठिंबा देणार का? किंवा मनसे व महायुतीमधील पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढती होणार का? यावर स्वतः अमित ठाकरे व मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

MP Amar Kale is trying for his wife Mayura Kales candidacy
पत्नीच्या तिकिटासाठी खासदार प्रयत्नशील, मात्र काँग्रेस नेत्यांचा विरोध
22nd October Rashi Bhavishya In Marathi
२२ ऑक्टोबर पंचांग: जन्मराशीनुसार आज कर्तुत्वाला मिळेल चांगला…
Rashmi Barve nominate from Umred reserved constituency
दलित महिलेवर अन्यायाचे प्रतीक, काँग्रेसची जबरदस्त खेळी, रश्मी बर्वे यांना उमरेडमधून उमेदवारी
Bachchu Kadus reaction to BJP candidate from Achalpur
अचलपूरच्या भाजप उमेदवाराबद्दल बच्चू कडू म्हणाले, “निष्ठावंतांना डावलून…”
Sudhir Gadgil Sangli, BJP nominated Sudhir Gadgil,
निवडणूक लढणार नाही अशी घोषणा करणाऱ्या गाडगीळ यांनाच भाजपची पुन्हा संधी
After losing in the Lok Sabha the assembly election 2024 is expected
लोकसभेतील पराभूतांना विधानसभेचे वेध!
Assembly election 2024 Rahul Awade BJP candidate from Ichalkaranji Kolhapur news
हाळवणकरांना विधान परिषदेला संधी, इचलकरंजीत राहुल आवाडे; चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा
Congress leader pawan khera question
“हरियाणातील २० ठिकाणचे EVM सीलबंद करा”, निवडणूक आयोगाला भेटल्यानंतर काँग्रेसची मागणी!

हे ही वाचा >> उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! मित्रपक्षाने युती तोडली, विधानसभेला स्वबळाचा नारा

बाळा नांदगावकर काय म्हणाले?

प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी बाळा नांदगावकरांना विचारलं की तुमच्या पक्षाने लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी, भाजपासह महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. आता महाराष्ट्राच्या निवडणुकीत ते तुम्हाला पाठिंबा देतील का? किंवा तुमच्यात मैत्रीपूर्ण लढती होतील का? यावर नांदगावकर म्हणाले, “मनसे व महायुतीच्या मैत्रीपूर्ण लढतींबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही. भाजपाने आम्हाला पाठिंबा द्यावा किंवा देऊ नये याचा निर्णय ते घेतील. राज ठाकरे हे दिलदार व्यक्ती आहेत. त्यांनी पाठिंबा द्यावा म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा दिला नव्हता”.

हे ही वाचा >> Nana Patole : “मविआत ४-५ जागांवर मतभेद…”, नाना पटोले स्पष्टच बोलले; काँग्रेसच्या यादीबाबत म्हणाले…

अमित ठाकरे म्हणाले…

दरम्यान, यावर अमित ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “राज ठाकरे यांनी लोकसभेला भाजपाला पाठिंबा दिला होता, याचा अर्थ असा नव्हे की विधानसभेला आम्हाला त्यांच्या पाठिंब्याची अपेक्षा असेल. राज ठाकरे अशा प्रकारे लोकांची मदत करतात परंतु, त्या गोष्टींच्या परतफेडीची अपेक्षा बाळगत नाहीत. ते दिलदार व्यक्ती आहेत”.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Amit thackeray will bjp mahayuti backs mns in maharashtra assembly election 2024 asc

First published on: 23-10-2024 at 17:16 IST

संबंधित बातम्या