मनसेने मंगळवारी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार अमित ठाकरे यांना दादर-माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे अमित ठाकरे यंदा पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. दरम्यान, उमेदवार जाहीर झाल्यानंतर आज अमित ठाकरे यांनी पहिल्यांदाच यावर भाष्य केलं आहे.

काय म्हणाले अमित ठाकरे ?

MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले, “मला एक उदाहरण दाखवा की…”
Arjun Kapoor Confirms Breakup With Malaika Arora
Video: ६ वर्षांचं नातं संपलं, मलायकाचं नाव ऐकू येताच राज ठाकरेंच्या शेजारी उभा असलेला अर्जुन कपूर म्हणाला…
Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
uddhav thackeray sada sarvankar
Sada Sarvankar : “आपलं अंगण सोडून दुसऱ्याच्या…”, सदा सरवणकरांच्या ‘त्या’ पोस्टवरून ठाकरेंच्या शिवसेनेचा चिमटा
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?

अमित ठाकरे यांनी आज त्यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी त्यांच्या उमेदवारीबाबत प्रतिक्रिया दिली. उमेदवारी मिळाल्यानंतर आत्मविश्वास नक्कीच आहे, पण ज्यावेळी यादीत माझं नाव आलं, त्यावेळी पोटात थोडा गोळा आला. कारण आता आयुष्य बदलणार आहे. आता शासकीय पदाचे ओझं राहणार आहे. पण ते ओझं पेलायला मी तयार आहे, असं अमित ठाकरे म्हणाले.

हेही वाचा – Amit Thackeray on Aaditya Thackeray : अर्धा समुद्र भावाच्या मतदारसंघात, स्वच्छ करणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर अमित ठाकरेंचं लागलीच उत्तर, म्हणाले…

पुढे बोलताना, मी लहानपणीपासून या मतदारसंघात वाढतो आहे. माझ्या वडिलांचा आणि आईचा जन्मही याच मतदारसंघातला आहे. त्यामुळे इथल्या तीन पिढ्यांना आम्ही जवळवून बघितलं आहे. त्यांचा परिचय आहे. मी पक्षकार्यालयात जाताना अनेकदा पायी चालत जातो, तेव्हा लोक मला भेटतात, त्यांच्याशी चर्चा होते, त्यांच्या अनेक समस्या आम्ही सोडवतो. त्यामुळे मतदारसंघातील मतदार माझ्या पाठिशी उभी राहील, अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – MNS List : मनसेने जाहीर केली उमेदवारांची यादी, अमित ठाकरे माहीममधून, तर वरळीतून आदित्य ठाकरेंना ‘हा’ उमेदवार देणार आव्हान

दरम्यान, २०१९ मध्ये आदित्य ठाकरेंनी वरळीतून पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. त्यावेळी मनसेने त्यांच्या विरोधात उमदेवार दिला नव्हता. मात्र, आता अमित ठाकरे पहिल्यांदा निवडणूक लढवत असताना, दादर माहीममधून उमेदवार देणार असल्याचे ठाकरे गटाने स्पष्ट केलं आहे. याबाबत विचारलं असता, मी नेहमी सांगतो की राज ठाकरे एक वेगळी भूमिका घेतात, जी भूमिका घेतात ती ठामपणे घेतात. ती उपकाराची भूमिका नसते ती त्यांची भूमिका असते. समोरच्यांनी त्याची परतफेड करावी, अशी त्यांची इच्छा नसते. राज ठाकरे नेहमी म्हणतात की हे राजकारण आहे, समोरचे लोक कशी आहेत, हे आपण ओळखलं पाहिजे. लोकसभेला त्यांनी मोदींना पाठिंबा दिला होता. त्यांनी नारायण राणे किंवा इतरांसाठी प्रचारही केला होता. पण त्यांनी परतफेड करावी, ही राज ठाकरेंची इच्छा नाही. विरोधक त्यांचं राजकारण करतात, आम्ही आमचं राजकारण करतो, असं अमित ठाकरे म्हणाले.

Story img Loader