Amruta Fadnavis on Winning Victory of BJP : निकालानंतर अमृता फडणवीसांनी मागितला एक शब्द; इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हणाल्या, “या मोठ्या विजयासाठी…”

Amruta Fadnavis on Winning Victory of BJP in Assembly Election : निकालानंतर इन्स्टाग्राम पोस्टमध्ये अमृता फडणवीस म्हणाल्या, “या अभूतपूर्व विजयासाठी मला…”

Amruta Fadnavis
भाजपच्या विजयानंतर अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया (फोटो सौजन्य : अमृता फडणवीस इन्स्टाग्राम अकाउंट)

Amruta Fadnavis on BJP Victory 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. काही तासांमध्ये संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. महायुतीने या निवडणुकीत तब्बल २३० जागांवर आघाडी घेतली आहे; तर मविआ ५६ जागांवर पोहोचली आहे. महायुतीने मिळवलेल्या या यशामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. महायुतीच्या या विजयावर आता अनेक भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी या निकालासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे.

अमृता फडणवीस सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. राज्यातील राजकीय आणि सामाजिक विषयांवर त्या आपली मते परखडपणे मांडतात. आता त्यांनी इन्स्टाग्राम अकाउंटवर देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे. तसेच समोर आलेली आकडेवारी पाहून “या दणदणीत विजयासाठी मला एक शब्द सांगा ..!” अशी कॅप्शन अमृता फडणवीस यांनी दिली आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्समध्ये अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : “बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है या घोषणांमध्ये चुकीचं काहीच नाही, या घोषणा..”; देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
Devendra Fadnavis rally in rains
Devendra Fadnavis: शिराळा येथे देवेंद्र फडणवीस यांचे भरपावसात भाषण; म्हणाले, “पावसात सभा झाली की…”
Navjot Singh Sidhu
“अर्चना पूरन सिंगच्या जागी मी पुन्हा यावं…” नवज्योत सिंग सिद्धूंचे वक्तव्य; कपिल शर्मा शोमध्ये परतणार का?
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “त्यांनी मला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला, पण…”, चांदीवालांच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
accountability of devendra fadnavis declined due to his divisive politics says supriya sule
फोडाफोडीच्या राजकारणामुळे फडणवीसांची विश्वसनीयता कमी; सुप्रिया सुळे

हेही वाचा : Maharashtra Vidhan Sabha Result : रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून सर्वाधिक १ लाख ११ हजार ३३५ मते मिळवून उदय सामंत विजयी

काही वेळापूर्वीच अमृता फडणवीस यांनी माध्यमांशीदेखील संवाद साधला. त्यावेळी मिळालेल्या आघाडीवरून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, “आज मला फार आनंद होत आहे. ज्या पद्धतीने महायुतीने आघाडी मिळवली आहे, त्यामुळे मी फार आनंदी आहे.” देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदी विराजमान व्हावं, असं तुम्हाला वाटतं का? यावरही अमृता फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. त्या म्हणाल्या, “आतापर्यंत महायुतीत प्रत्येकानं स्वत:चे १०० टक्के देत काम केलं आहे. त्यामुळे यापुढचा निर्णय आमचे वरिष्ठ एकत्र येऊन घेतील.”

हेही वाचा : Maharashtra Election 2024: कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? श्रीकांत शिंदे म्हणाले “तुम्हाला सर्वांना लवकरच…”

आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार, महायुतीला बहुमतापेक्षा जास्त जागा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. सध्या महायुतीच्या २०० हून जास्त जागा आघाडीवर आहेत; तर महाविकास आघाडी ५४ जागांवर असून, त्यांचा दारुण पराभव झाल्याचं दिसतंय. आलेल्या आकडेवारीवरून ही निवडणूक बेकायदा असल्याचा आरोप संजय राऊतांनी केल्याचं सांगत एका माध्यम प्रतिनिधीनं त्याबाबत अमृता फडणवीस यांना विचारणा केली. त्यावर उत्तर देताना अमृता फडणवीस यांनी म्हटलं, “आजचा दिवस फार छान आणि आनंदाचा आहे. त्यामुळे आपण वाईट गोष्टी अजिबात मध्ये आणायच्या नाहीत. आज आम्ही सर्व एकत्र येऊन निकाल पाहत होतो. आम्हाला विजयाची अपेक्षा होतीच. मात्र, ज्याप्रकारे हा दणदणीत विजय झाला, त्यामुळे फारच जास्त आनंद झाला.”

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Amruta fadnavis on winning victory of bjp in maharashtra assembly election result 2024 rsj

First published on: 23-11-2024 at 17:17 IST

संबंधित बातम्या