शरद पवार यांनी मागच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी भरपावसात भाषण केलं होतं. जनतेला संबोधित करताना अचानक पाऊस आला, तरीही त्यांनी भाषण अर्धवट न सोडता जनतेला पावसात विचारांच्या धारांनी भिजवलं. हे पावसातलं भाषण इतकं चर्चेचं ठरलं की त्याच विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात अभूतपूर्व सत्तांतर घडून आलं. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येत राज्याला नवं राजकीय समीकरण दिलं. आता असाच प्रकार उद्धव ठाकरेंच्या बाबतीत घडला आहे. त्यामुळे हे पावसातील भाषण उद्धव ठाकरेंच्या पथ्यावर पडतंय का हे पाहावं लागेल.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून विविध ठिकाणी मोठ्या प्रचारसभा घेतल्या जात आहेत. प्रचारसभेच्या निमित्ताने उद्धव ठाकरे काल (२३ एप्रिल) परभणी दौऱ्यावर होते. परभणी लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार संजय जाधव यांची प्रचार सभा सुरू होती. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे जमलेल्या जनतेला संबोधित करत होते. परंतु, त्याचवेळी अचानक पावसाच्या सरी कोसळू लागल्या. पाऊस सुरू झाल्यानंतर कोणीही जागचं हललं नाही. सर्वांनी उद्धव ठाकरेंचं भाषण पूर्ण ऐकलं. तसंच, उद्धव ठाकरेंनीही भरपावसात आपले विचार जमलेल्या समुदायापुढे मांडले.
हेही वाचा >> मतदारसंघ आढावा : परभणी… जातीय समीकरणांची आकडेमोड आणि फेरमांडणी
परभणी माझ्या शिवसेनेचा बालेकिल्ला
“माझ्या शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणजे ही परभणी आहे. माझ्यासमोर सगळे माझे मावळे बसले आहेत. मिंधे आणि भाजपा यांना वाटलं असेल की पैशांनी सगळं घेता येतं पण परभणीकर पैशांनी विकले जाऊ शकत नाहीत. आपली परीक्षा आहे. वादळला अंगावर घ्यायला मर्दाची छाती लागते ती आपल्याकडे आहे. पाठीवरुन आम्ही वार करत नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
परभणीत शिवसेना विरुद्ध रासप
परभणी मतदारसंघात शिवसेनेचे खासदार संजय जाधव आणि रासपचे महादेव जानकर यांच्यात लढत होत आहे. या लोकसभा मतदारसंघावर असलेले शिवसेनेचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी महायुतीचे सर्व स्थानिक नेते झाडून पुसून कामाला लागले आहेत. वरिष्ठ पातळीवरूनही महायुतीतल्या प्रमुख तीन राजकीय पक्षांची ताकद परभणीसाठी एकवटली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला परभणीत हातपाय पसरता आले नाहीत आणि फुटही पाडता आली नाही म्हणून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवरचा राग या सेनेला काढायचा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामती मतदारसंघ सुरक्षित करण्यासाठी जानकर यांचे सहकार्य हवे आहे परिणामी अजित पवारांची राष्ट्रवादी ही जानकर यांच्यासाठी झटताना दिसत आहे. विद्यमान खासदार संजय जाधव यांच्या विरोधात भाजपाने आक्रमक प्रचार चालवला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंचं हे पावसातलं भाषण त्यांच्या पथ्यावर पडतंय का हे पाहावं लागणार आहे.