Sikkim and Arunachal Pradesh Assembly Election Results 2024 Updates : लोकसभा निवडणुकींच्या निकालाआधी देशात दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. आज रविवारी सकाळी सहा वाजल्यापासून अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम येथे मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या ईशान्येकडील राज्यांमधील विधानसबा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होतील.

१९ एप्रिल रोजी सिक्कीममध्ये ३२ विधानसभा जागांसाठी एकाचवेळी मतदान झाले. सिक्कीममध्ये सत्ताधारी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा आणि सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट यांच्यात लढत होत आहे. २०१९ च्या निवडणुकीत एसकेएमने १७ जागा जिंकल्या होत्या, तर एसडीएफला १५ जागा मिळाल्या होत्या एक्झिट पोलनुसार राज्यात एसकेएम पुन्हा सत्तेत येणार असल्याची शक्यता आहे.

अरुणाचल प्रदेशमध्येही १९ एप्रिल रोजी विधानसभेच्या ६० जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. अरुणाचल प्रदेशमध्ये सत्ताधारी भाजपाला आघाडी मिळाली आहे. कारण, येथे १० जागांवर भाजपाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. मु्ख्यमंत्री पेमा खांडू आणि उपमुख्यमंत्री चौना में यांनी आधीच आपपल्या जागा जिंकल्या आहेत. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने अरुणाचल प्रदेशात ४१ जागा जिंकल्या. जनता दल (युनायटेडने) सात, नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) पाच, काँग्रेस चार आणि पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल एक जागा जिंकली.

Live Updates

Assembly Election Result 2024 : अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये होत असलेल्या मतमोजणीबाबत अपडेट्स जाणून घ्या

19:51 (IST) 2 Jun 2024
निवडणुकीतील विजयानंतर मुख्यमंत्री पेमा खांडूंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, हा मोठा जनादेश आहे. राज्यात पंतप्रधान मोदींनी केलेल्या कामामुळेच आम्हाला इतकं मोठं जनसमर्थन मिळालं आहे.

16:19 (IST) 2 Jun 2024
सिक्कीममध्ये भाजपाला धोबीपछाड! ३२ पैकी ३१ जागांवर सत्ताधारी पक्षाचा ऐतिहासिक विजय, एका जागेवर कोण जिंकलं?

विधानसभेच्या निवडणुकीत ३२ पैकी ३१ जागा जिंकून सत्ताधारी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (SKM) पक्ष पुन्हा सत्तेत विराजमान होणार आहे. सिक्कीमचे मुख्यमंत्री आणि SKM पक्षाचे नेते प्रेमसिंग तमांग यांनी रेनॉक मतदारसंघात त्यांचे सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट (SDF) प्रतिस्पर्धी सोम नाथ पौड्याल यांच्यावर सात हजार ४४ मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे.

सविस्तर वृत्त वाचा

15:07 (IST) 2 Jun 2024
अरुणाचल प्रदेशचा विजय निश्चित होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

धन्यवाद अरुणाचल प्रदेश! या राज्यातील जनतेने विकासाच्या राजकारणाला निर्विवाद जनादेश दिला आहे. त्यांनी विश्वास दाखविल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आमचा पक्ष राज्याच्या विकासासाठी आणखी जोमाने काम करत राहील. मी कार्यकर्त्यांच्या परिश्रमांचे कौतुक करू इच्छितो. निवडणूक प्रचाराच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी राज्यभर जाऊन ते लोकांशी कसे जोडले गेले हे कौतुकास्पद आहे.

https://twitter.com/narendramodi/status/1797197760829018323

14:07 (IST) 2 Jun 2024
अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची हॅट्ट्रीक, बहुमताचा टप्पा ओलांडून स्वतःचाच रेकॉर्ड मोडणार?

लोकसभा निवडणूक निकालाच्या आधीच भारतीय जनता पक्षामध्ये जल्लोष सुरू झाला आहे. १९ एप्रिल रोजी झालेल्या अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाने आतापर्यंत बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे भाजपा पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेशमध्ये सत्ता स्थापन करण्यास सज्ज झाली आहे. पूर्ण निकालाची अद्याप प्रतिक्षा असून सध्या हाती आलेल्या कलांनुसार अरुणाचल प्रदेशमध्ये तिसऱ्यांदा पेमा खांडू मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार आहेत.

सविस्तर वृत्त वाचा

13:31 (IST) 2 Jun 2024
"एसडीएफने २५ वर्षांत केलं नाही ते आम्ही ५ वर्षांत केलं", सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांच्याकडून विजयाचा जल्लोष

आम्ही जिंकणार असल्याचं निश्चित झालं आहे. मी संपूर्ण सिक्कीमच्या जनतेचे आभार मानतो. २०१९ ला सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक अडचणी आल्या. करोनोचा काळ, चक्रीवादळ, पूरस्थिती अशा परिस्थितीही सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाने सिक्कीमच्या लोकांसाठी काम केलं होतं. त्यामुले या विजयाचं श्रेय मी सिक्कीमच्या जनतेला देतो. पूर्व मुख्यमंत्री पवन चामलिंग यांना आम्ही हरवलं आहे. सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाने मनापासून प्रत्येक मतदारसंघात काम केलं होतं. त्या कामाची पावती म्हणून आम्ही जिंकलो आहे. चामलिंग २०१९ लाच हरले होते. परंतु, ही लोकशाही आहे. त्यामुळे त्यांनी २०२४ लाही निवडून लढवली. गेल्या २५ वर्षांत त्यांनी जे केलं नाही ते आम्ही ५ वर्षांत केलं. म्हणूनच त्यांचा पराजय झाला - प्रेमसिंग तमांग

https://twitter.com/PTI_News/status/1797171156065058955

13:15 (IST) 2 Jun 2024
अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाला ३८ जागांवर यश, तर सिक्कीममध्ये एसकेएम पक्षाचा २० जागांवर विजय

अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपने 38 जागा मिळवत सलग तिसरा प्रभावशाली विजय नोंदवला आणि इतर 7 जागांवर आघाडी घेतली. सिक्कीममध्ये सत्ताधारी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (SKM) ने 32 पैकी 20 जागा मिळवून विजय मिळवला आणि त्याचा प्रतिस्पर्धी, सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट (SDF) वर मोठा विजय मिळवला. ECI च्या आकडेवारीनुसार SKM ११ जागांवर आघाडीवर आहे.

11:49 (IST) 2 Jun 2024
Arunachal Pradesh Live : इटानगर येथील भाजपाच्या कार्यालयात पारंपरिक नृत्य आणि वादनाने कार्यकर्त्यांकडून जल्लोष

अरुणाचल प्रदेशमधील इटानगर येथील भाजपाच्या कार्यालयात पारंपरिक नृत्य आणि वादनाने कार्यकर्त्यांकडून जल्लोष

https://twitter.com/ANI/status/1797142600128008256

11:30 (IST) 2 Jun 2024
Result Live Updates : अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची २७ जागांवर सरशी, तर सिक्कीमध्ये एसकेएमचा सात जागांवर विजय; दोन्ही राज्यांत सत्तांतराची शक्यता धुसर!

भाजप अरुणाचल प्रदेशात सत्ता राखण्यासाठी सज्ज आहे तर सत्ताधारी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (SKM) सिक्कीममध्ये सत्तारूढ होण्याच्या मार्गावर आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) मते, भाजपने 60 पैकी 17 जागा जिंकल्या आहेत, तर, १० जागांवर बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. म्हणजे अरुणाचलप्रदेशमध्ये भाजपा २७ जागांवर विजयी ठरला आहे. तसंच, इतर ३१ जागांवर भाजपा आघाडीवर आहे. त्यामुळे अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे. तर, सिक्कीममध्ये, एसकेएमने सात जागा जिंकल्या आहेत आणि इतर २४ जागांवर आघाडीवर आहे.

11:17 (IST) 2 Jun 2024
अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाचा विजय निश्चित, कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून जल्लोष

https://twitter.com/ANI/status/1797141797220786360

10:59 (IST) 2 Jun 2024
Arunachal Pradesh Live Update : खोन्सा पूर्व विधानसभा मतदारसंघात अपक्षा उमेदवाराचा विजय

खोन्सा पूर्व विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराचा विजय

https://twitter.com/PTI_News/status/1797128600065356251

10:35 (IST) 2 Jun 2024
Sikkim Result Live : सिक्कीमचे मुख्यमंत्री दोन्ही जागांवरून आघाडीवर

सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंग तमंग यांनी दोन जागांवरून निवडणूक लढवली आहे. रेनॉक आणि सोरेंग चाकूंग या दोन्ही जागांवरून ते आघाडीवर आहेत.

https://twitter.com/ANI/status/1797128611864232135

08:56 (IST) 2 Jun 2024
Result Live Update : अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाचा विजय निश्चित? सिक्कीमध्येही एसकेएमचं पारडं जड, कोण किती जागांवर आघाडीवर?

अरुणाचल प्रदेश - भाजपा ४२, एनपीपी ९, अपक्ष ७, काँग्रेस

सिक्कीम - एसकेएम ३१, एसडीएफ १, भाजपा ०, अपक्ष ०

08:14 (IST) 2 Jun 2024
Live Update : अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपा सिक्कीममध्ये एसकेएम पक्ष २६ जागांवर आघाडीवर

अरुणाचल प्रदेश - भाजपा २६,नॅशनल पीपल्स पार्टी ४, राष्ट्रवादी काँग्रेस २, पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल प्रदेश २, काँग्रेस १, अपक्ष २ आदी जागांवर आघाडीवर

सिक्कीम - सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा २६, सिक्रीम डेमोक्रॅटिक फ्रंट १ आदी जागांवर आघाडीवर

07:25 (IST) 2 Jun 2024
Sikkim Assembly Election Results 2024 Updates : सिक्कीममध्ये सत्ताधारी एसकेएम पक्षाची चार जागांवर आघाडी

https://twitter.com/PTI_News/status/1797083248272589253

Arunachal Pradesh Sikkim Assembly Election Result 2024 Updates in Marathi

अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा निवडणूक निकाल २०२४ लाइव्ह अपडेट्स

Assembly Election Result 2024 : अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये होत असलेल्या मतमोजणीबाबत अपडेट्स जाणून घ्या