लोकसभा निवडणूक निकालाच्या आधीच भारतीय जनता पक्षामध्ये जल्लोष सुरू झाला आहे. १९ एप्रिल रोजी झालेल्या अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाने ४६ जागांवर विजय मिळवला असून मागच्या टर्मचा स्वतःचाच रेकॉर्ड त्यांनी मोडला आहे. त्यामुळे भाजपा पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेशमध्ये सत्ता स्थापन करण्यास सज्ज झाली आहे. त्यामुळे, अरुणाचल प्रदेशमध्ये तिसऱ्यांदा पेमा खांडू मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार आहेत.

अरुणाचल प्रदेशमध्ये ६० विधानसभा जागांसाठी १९ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. येथे ८२.९५ टक्के मतदान झाले. तर, आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाला सुरुवातीलाच १० जागांवर बिनविरोध विजय मिळाला. तर, निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळानुसार भाजपाच्या पारड्यात ४६ जागा गेल्या आहेत. तिथं बहुमतासाठी ३१ जागा गरजेच्या आहेत. त्यामुळे अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपा एकहाती सत्ता स्थापन करणार आहे.

How Rashtriya Lok Dal RLD has steered itself to four Houses
ना कुणाशी मैत्री, ना शत्रुत्व; राजकीय विजनवासात गेलेल्या रालोद पक्षाने कशी घेतली उभारी?
narendra modi
जम्मूकाश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही
BJP reflection on the defeat in Uttar Pradesh
उत्तर प्रदेशातील पराभवावर भाजपचे चिंतन
pasmanda muslim bjp uttar pradesh
भाजपाला पसमांदा मुस्लिमांची मतं का मिळाली नाहीत?
Prema Khandu scored a hat trick
प्रेमा खांडूंनी मारली हॅटट्रिक! अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाला मोठा विजय मिळवून देणारे तरुण मुख्यमंत्री
Why is Uttar Pradesh important for establishment of power
केंद्रात सत्तास्थापनेसाठी उत्तर प्रदेश का महत्त्वाचे? कसं बिघडवलं भाजपाचं राजकीय समीकरण?
hanuma vihari
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर हनुमा विहारीला आंध्र प्रदेश संघाकडून NOC; राज्यातील सत्तांतराचा उल्लेख करत म्हणाला…
Ayodhya Uttar Pradesh Lok sabha Election Result 2024 News in Marathi
UP Lok sabha Election Result 2024: अयोध्येत राममंदिर उभारूनही भाजपाचा पराभव; उत्तर प्रदेशवासीयांनी का सोडली भाजपाची साथ?

अरुणाचल प्रेदशमध्ये भाजपाची हॅट्ट्रीक

अरुणाचल प्रदेशमध्ये नॅशनल पीपल्स पार्टीने (एनपीईपी) पाच जागा जिंकल्या आहेत. पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल (पीपीए) ने दोन जागा जिंकल्या आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (एनसीपी) तीन जागा मिळवल्या आहेत. काँग्रेसने १ आणि अपक्षांनी तीन जागा जिंकल्या आहेत. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपा नेते पेमा खांडू तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदावर बसणार आहेत. अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपा तिसऱ्यांदा विजयी झाल्याने जल्लोष सुरू झाला आहे.

हेही वाचा >> AP and Sikkim Assembly Election Result 2024 Live : अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची हॅट्ट्रीक, तर सिक्कीममध्येही एसकेएमने राखला गड

१० जागांवर बिनविरोध निवड

अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपा आणि काँग्रेस यांच्यात मुख्य लढत होती. भाजपाने सर्व ६० जागांवर उमेदवार उभे केले, तर काँग्रेसने केवळ १९ जागांवर निवडणूक लढवली. नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीईपी) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (एनसीपी) यांनीही अरुणाचल प्रदेशमध्ये उमेदवार उभे केले. बोमडिला, चौखम, हायुलियांग, इटानगर, मुक्तो, रोईंग, सागले, ताली, तलीहा आणि झिरो-हापोली या मतदारसंघात इतर कोणत्याही उमेदवारांनी अर्ज दाखल न केल्यामुळे भाजपने १० जागा बिनविरोध जिंकल्या आहेत.

अरुणाचल प्रदेशातील प्रमुख चेहऱ्यांमध्ये मुख्यमंत्री पेमा खांडू आणि उपमुख्यमंत्री चौना में यांचा समावेश आहे, हे दोघेही भाजपाचे आहेत. त्यांनी आधीच निवडणूक जिंकली आहे. बियुराम वाहगे (भाजपा), निनॉन्ग एरिंग (भाजपा), कारिखो क्री (एनपीपी), पानी तारम (भाजपा), कुमार वाली (काँग्रेस), कमलुंग मोसांग (भाजपा), वांगकी लोवांग (भाजपा) आणि जम्पा थर्नली कुनखाप (काँग्रेस) हे इतर प्रमुख उमेदवार आहेत.

२०१९ ला कोणाच्या पारड्यात किती जागा होत्या?

२०१९ मधील मागील विधानसभा निवडणुकीत, भाजपाने ४१ जागा जिंकल्या होत्या. जनता दल (युनायटेड)ने सात, एनपीपीने पाच, काँग्रेसने चार, पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल (पीपीए) ने एक जागा जिंकली आणि दोन अपक्ष देखील विजयी झाले.

सिक्कीममध्ये सत्ताधारी पक्षाने राखला गड

सिक्कीममध्ये सत्ताधारी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (SKM) ने ३२ पैकी २० जागा मिळवून विजय मिळवला आहे. तर, सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटला धोबीपछाड केला आहे. ECI च्या आकडेवारीनुसार एसकेएम ११ जागांवर आघाडीवर आहे.

एसकेएमने बहुमताचा आकडा गाठला असून ११ जागांवर आघाडीवर आहे. पवन कुमार चामलिंग यांच्या एसडीएफने आतापर्यंत एक जागा जिंकली आहे. त्याचप्रमाणे त्यांचे सिक्कीमचे मुख्यमंत्री आणि एसकेएमचे सुप्रीमो प्रेमसिंग तमांगही आहेत. रेनॉक आणि सोरेंग-चाकुंग या दोन जागांवर लढणाऱ्या तमांग यांनी पहिल्या जागेवरून ७ हजार ४४ मतांनी विजय मिळवला आहे आणि दुसऱ्या जागेवर ते आघाडीवर आहेत. सिक्कीममध्ये एकूण ७९.८८ टक्के मतदान झाले होते.