कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी १० मे रोजी मतदान पार पडणार आहे. तर, १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत काँग्रेस, भाजपा आणि जनता दल ( धर्मनिरपेक्ष ) यांच्यात लढत होत असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यात बजरंग दलावरून काँग्रेस आणि भाजपा आमने-सामने आले आहेत. यावर आता एमआयएमचे खासदार असदुद्दीन औवेसी यांनी टीका केली आहे.
काँग्रसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात बजरंग दलावर बंदी घालण्याचे आश्वासन दिलं होतं. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीकास्र सोडलं. “काँग्रेसमध्ये ‘शिवराळ संस्कृती’ आहे. त्यामुळे कर्नाटकच्या जनतेने त्यांना धडा शिकविण्यासाठी मतदानयंत्रावर बटण दाबताना ‘जय बजरंगबली’ असा उच्चार करा,” असं आवाहन पंतप्रधानांनी केलं होतं.
हेही वाचा : जातनिहाय सर्वेक्षणाला स्थगिती ; उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा बिहार सरकारला धक्का
तर, कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के शिवकुमार यांनी सत्तेत आल्यास राज्यात हनुमानाचे मंदिर बांधण्याचं आश्वासन दिलं आहे. “कर्नाटकात काँग्रेस सत्तेत आली, तर राज्यभरात हनुमानाचे मंदिर बांधू. यासाठी एक समिती नेमण्यात येईल. जे हनुमान मंदिराच्या देखरेखीचं काम करेल,” असं डी.के शिवकुमार यांनी सांगितलं.
हेही वाचा : “राज्यात लव्ह-जिहादच्या घटना…”; केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांचं ‘द केरला स्टोरी’बद्दल वक्तव्य
यावरून आता असदुद्दीन औवेसी यांनी भाजपा आणि काँग्रेसचा समाचार घेतला आहे. “पंतप्रधान मोदींनी कर्नाटकच्या जनतेला मतदान करताना ‘जय बजरंगबली’ म्हणण्याचं आवाहन केलं. तर, डी.के शिवकुमार यांनी काँग्रेस सत्तेत आल्यास हनुमान मंदिर बांधण्याचं म्हटलं आहे. ही कोणती धर्मनिरपेक्षता आहे? १० मे रोजी मतदान करताना ‘अल्लाहू अकबर’ म्हणण्यास सांगितलं, तर माध्यमे माझ्यावर टीका करतील,” असं असदुद्दीन औवेसी म्हणाले. ते कर्नाटकातील कोल्लम येथे बोलत होते.