कर्नाटक निवडणुकीच्या तोंडावर आता असदुद्दीन ओवैसी यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. बाबरी मशिद पाडल्यानंतर काँग्रेसने एक ठराव पास केला होता आणि मुस्लीम समुदायाला आश्वासन दिलं होतं की त्या ठिकाणी बाबरी पुन्हा बांधण्यात येईल असं म्हटलं होतं. आज त्या जागेवर काय बांधलं जातं आहे? असा प्रश्न असदुद्दीन ओवैसी यांनी विचारला आहे. काँग्रेस पक्ष आश्वासनं देतो पुढे ती हवेत विरतात असंही औवैसींनी म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे ओवैसींनी?

“देशात जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा काँग्रेस पक्षाने ठराव पास केला होता आणि बाबरी मशिद त्याच जागी बांधू. आता तिथे काय बांधलं जातं आहे? निवडणुकीच्या आधी तर अनेक आश्वासनं दिली जातात पुढे काय होतं त्याचं? ते सगळ्यांना माहित आहे. दुसरी गोष्ट अशी की भाजपाच्या जगदीश शेट्टर यांना काँग्रेसने आपल्या पक्षात घेतलं. जगदीश शेट्टर यांची हयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघात गेली. त्यानंतर ते भाजपात होते. आता काँग्रेसने त्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला. हे नेमकं काय धोरण आहे? मला तरी ते कळत नाही. आता निवडणुकीच्या नंतर कर्नाटकात काय होतं पाहू.” असं असदुद्दीन ओवैसींनी म्हटलं आहे.

Rahul Gandhi
Rahul Gandhi : “तुम्ही डुबकी कधी घेणार?”, यमुना प्रदूषणाच्या मुद्द्यावर राहुल गांधींचे केजरीवालांना खुले आव्हान
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
A youth from Bihar files a case against Rahul Gandhi seeking Rs 250 as compensation, highlighting the ongoing legal dispute.
Rahul Gandhi : “ते विधान ऐकून धक्का बसला अन् हातातून दुधाची बादली पडली”, २५० रूपयांसाठी राहुल गांधींविरोधात तरुणाची याचिका
Indian state Rahul Gandhi
राहुल गांधी यांच्याविरोधात आसाममध्ये एफआयआर, राजकीय स्टंट असल्याची काँग्रेसची टीका
Sanjay Raut on saif ali khan (1)
Sanjay Raut : “सैफ आणि करीना लव्ह जिहादचे प्रतिक होते अन् आता…”, संजय राऊतांनी भाजपाला सुनावलं!
challenge for new guardian minister pankaj bhoyar is to manage equal colleagues
नव्या पालकमंत्र्यास समतुल्य सहकारी सांभाळण्याचेच आव्हान
Bharat Gogawale
Bharat Gogawale : पालकमंत्रीपदावरून डावलल्यानंतर भरत गोगावलेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जिल्ह्यातलं वातावरण…”

भाजपाने मुस्लीम मतं विभाजन करण्यासाठी ओवैसींनी बोलावलं आहे का? असा प्रश्न विचारला असता ओवैसी म्हणाले की, “माझ्यावर आरोप करणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की राहुल गांधींना हरवणारा मी आहे. राहुल गांधींना मी आस्मान दाखवलं. २०१९ ला किती खासदार आले? एकच ना? त्यांचे एकूण जे खासदार निवडून आले ते माझ्यामुळे आले. त्यांचे जे खासदार, नेते, कार्यकर्ते भाजपात गेले ते माझ्या घरी जेवायला आले होते मीच त्यांना सांगितलं भाजपात जा.” असं म्हणत ओवैसी यांनी खोचक टोलेबाजी केली आहे.

काँग्रेसवाले बकवास आहेत. कर्नाटकात आम्ही दोन जागा लढत आहोत. तुम्ही लढा ना तुम्हाला कुणी अडवलं आहे? उर्दूमध्ये एक म्हण आहे नाच ना जाने आँगन टेढा. काँग्रेसची अवस्थाही तशीच आहे असंही ओवैसी यांनी म्हटलं आहे. तसंच या निवडणुकीत काँग्रेसच्या आश्वासनांना भुलू नका असंही त्यांनी म्हटलं आहे. ANI ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

Story img Loader