पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी आज उत्तर प्रदेशमध्ये अंतिम सातव्या टप्प्यातील मतदानानंतर संपली आहे, आता सर्वांना निकालाची उत्सुकता आहे. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या एकूण ४०३ जागा आहेत आणि बहुमताचा आकडा २०२ आहे, उत्तराखंडमध्ये ७० जागा आहेत आणि बहुमताचा आकडा ३६ आहे. त्याचप्रमाणे पंजाबमध्ये एकूण जागा ११७ आहेत आणि बहुमताचा आकडा ५९ आहे. तर, गोव्यात विधानसभेच्या एकूण जागा ४० आहेत आणि बहुमताचा आकडा २१ आहे. दुसरीकडे, मणिपूरमध्ये विधानसभेच्या जागांची संख्या ६० आहे आणि बहुमताचा आकडा ३१ आहे. १० मार्च रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. मात्र तत्पूर्वी एक्झिट पोलनुसार निकाल जाहीर झाले आहेत. पाहूयात विविध एक्झिट पोलनुसार उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यांमध्ये काय असणार आहे परिस्थिती –

टाईम्स नाऊ -व्हेटो एक्झिट पोल – (उत्तराखंड)

टाईम्स नाऊ-व्हेटो एक्झिट पोलमध्ये भाजपा उत्तराखंडमध्ये परतणार असल्याचे दिसत आहे. टाइम्स नाऊ व्हेटोच्या एक्झिट पोलनुसार उत्तराखंडमध्ये भाजपला ३७, काँग्रेसला ३१, आम आदमी पार्टीला १ आणि इतरांना १ जागा मिळण्याची शक्यता आहे.

Congress List for delhi assembly Election
Delhi Election : आता दिल्ली विधानसभेची धूम! काँग्रेसने जाहीर केली २१ उमेदवारांची यादी, अरविंद केजरीवालांसमोर तगडा उमेदवार!
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Rahul Gandhi And Arvind Kejriwal.
Delhi Election 2025 : काँग्रेसला हवी ‘आप’ची साथ, ‘हात’ मिळवण्यास केजरीवालांचा नकार
ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं? बावनकुळे म्हणाले... (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं?
one nation one election
मोठी बातमी! केंद्रीय मंत्रिमंडळाची ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी
महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का?
Sudhir Mungantiwar On Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? महत्त्वाची माहिती समोर

आज तक अॅक्सिस माय इंडिया एक्झिट पोल – (उत्तराखंड)

आज तक अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार भाजपाला उत्तराखंडमध्ये ४४ टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला ४० टक्के मतं मिळताना दिसत आहेत. एक्झिट पोलचे निकाल जर प्रत्यक्ष निकालात बदलले तर भाजपला या ठिकाणी ३६ ते ४६ जागा आणि काँग्रेसला २० ते ३० जागा मिळतील. बसपला दोन ते चार तर इतरांना दोन ते पाच जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

C VOTER एक्झिट पोल – (उत्तराखंड)

C VOTER एक्झिट पोलनुसार उत्तराखंडमध्ये भाजपाला २६-३२ जागा, काँग्रेसला ३२ -३८ जागा, आम आदमी पार्टीला दोन जागा तर इतरांना तीन ते सात जागा मिळणार असल्याचे दिसत आहे.

जन की बातच्या एक्झिट पोल – (उत्तराखंड)

जन की बातच्या एक्झिट पोलनुसार, उत्तराखंडमध्ये भाजपला ३२-४१ जागा, काँग्रेसला २७-३५ जागा, आम आदमी पार्टीला ० ते १ जागा, इतरांना ० ते ४ जागा मिळण्याची शक्यता आहे.

झी न्यूज एक्झिट पोल – (मणिपूर)

झी न्यूजच्या एक्झिट पोलुनसार मणिपूरमध्ये मणिपूरमध्ये भाजपचे सरकार स्थापन होऊ शकते. मणिपूरमध्ये भाजपाला ३२-३८ जागांची मिळू शकतात. दुसरीकडे काँग्रेस आघाडीला १२ ते १७ जागा मिळू मिळण्याचा अंदाज आहे.

P-MARQ एक्झिट पोल – (मणिपूर)

P-MARQ च्या एक्झिट पोलनुसार मणिपूरमध्ये भाजपा मोठा पक्ष ठरत आहे. भाजपाला या ठिकाणी २७-३१ जागा, काँग्रेसला ११-१७ जागा, एनपीपी ६-१० जागा आणि इतरांना ५-१४ जागा मिळताना दिसत आहे.

उत्तराखंड मध्ये काय होती परिस्थिती? –

१४ फेब्रुवारी रोजी उत्तराखंडमध्ये एकाच टप्प्यात विधानसभेच्या सर्व ७० जागांसाठी मतदान पार पडलं. एकीकडे सत्ताधारी भाजपा सत्ता राखण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत असताना दुसरीकडे काँग्रेसनं मात्र राज्यात सत्तापालट होण्याचा दावा केला आहे.

उत्तराखंडची स्थापना २००० मध्ये झाल्यानंतरची ही पाचवी निवडणूक होती. राज्यात मतदानासाठी ११,६९७ मतदान केंद्रे होती. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी, सत्पाल महाराज, सुबोध उनियाल, अरिवद पांडे, धनसिंह रावत आदी मंत्री रिंगणात होते. काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री हरिश रावत, माजी मंत्री यशपाल आर्या आदी निवडणूक लढवली. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला ७० पैकी ५७ जागांचे असे बहुमत मिळाले होत़े, काँग्रेसला केवळ ११ जागा जिंकता आल्या होत्या़. यावेळी, उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपा, काँग्रेस आणि अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीमध्ये तिरंगी लढत होण्याचा अंदाज वर्तवला गेला होता.

मणिपूरमध्ये काय होती परिस्थिती? –

मणिपूरमध्ये ६० जागांसाठी २८ फेब्रुवारी तसेच ५ मार्च रोजी मतदान झाले. राज्यात सत्तारूढ भाजप विरुद्ध काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांमध्येच प्रमुख सामना आहे. संगमा यांच्या नॅशनल पीपल्स पक्षाने (एनपीपी) ४० उमेदवार देत सामना तिरंगी करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र हा पक्ष भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष आहे.

गेल्या निवडणुकीत भाजपला २१ तर काँग्रेसला २८ जागा मिळाल्या होत्या. मात्र काँग्रेसला सरकार स्थापन करण्यात अपयश आले. तसेच पक्षात मोठ्या प्रमाणात फूट पडली. त्यांच्या १५ आमदारांनी पक्षांतर केले. २००२ ते १७ या १५ वर्षांच्या कालखंडात राज्यात काँग्रेसची सत्ता होती. फाटाफुटीची पार्श्वभूमी असल्यामुळे गोव्याप्रमाणे मणिपूरमध्येही काँग्रेसने उमेदवारांकडून एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाने राज्यात ३९ उमेदवार उभे केले आहेत. त्यातील बहुसंख्य पक्षांतर केलेले आहेत त्यात काही विद्यमान आमदार आहेत. ज्यांना भाजप किंवा काँग्रेसकडून संधी मिळाली नाही अशांनी जनता दलाची वाट धरली. शिवसेना तसेच रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटानेही राज्यात उमेदवार उभे केले आहेत.

Story img Loader