पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांपैकी आज (सोमवार) उत्तर प्रदेश, गोवा आणि उत्तराखंड या तीन राज्यांमध्ये मतदान पार पडले. विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज उत्तर प्रदेशातील ५५ जागांसाठी आणि गोवा, उत्तराखंडमधील सर्व जागांसाठी मतदान झाले. या तिन्ही राज्यांत सत्ता राखण्याचे भाजपा समोर आव्हान आह़े.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोव्यातील ४० आणि उत्तराखंडमधील ७० जागांसाठी आज एकाच टप्प्यात मतदान पार पडले. गोव्यात ११ लाख, तर उत्तराखंडमध्ये ८१ लाख मतदार आहेत़ या दोन्ही राज्यांत याआधी दुरंगी लढत होत होती़ मात्र, यंदा गोव्यात सत्ताधारी भाजप आणि मुख्य प्रतिस्पर्धी काँग्रेसबरोबरच आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेस पक्ष रिंगणात उतरलेला आह़े गोव्यात तृणमूल काँग्रेस आणि मगोप या पक्षांची युती आह़े शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनीही निवडणूकपूर्व आघाडी जाहीर केली आहे, तर आम आदमी पक्ष स्वबळावर लढत आह़े.

उत्तर प्रदेशमध्ये सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६०.४४ टक्के मतदान झाले होते. तर गोव्यात ७५.२९ टक्के आणि उत्तराखंड येथे ५९.३७ टक्के मतदान झालेले होते. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा संपल्यानंतर मतदान अधिकाऱ्यांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स (ईव्हीएम) आणि व्हीव्हीपीएटी सील करण्यास सुरुवात केली.

तर, उत्तराखंडची स्थापना २००० मध्ये झाल्यानंतरची ही पाचवी निवडणूक आह़े राज्यात मतदानासाठी ११,६९७ मतदान केंद्रे आहेत़ मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी, सत्पाल महाराज, सुबोध उनियाल, अरिवद पांडे, धनसिंह रावत आदी मंत्री रिंगणात आहेत़ काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री हरिश रावत, माजी मंत्री यशपाल आर्या आदी निवडणूक लढवत आहेत़ गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ७० पैकी ५७ जागांचे प्रचंड बहुमत मिळाले होत़े काँग्रेसला केवळ ११ जागा जिंकता आल्या होत्या़

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assembly election 2022 polling held in uttar pradesh goa and uttarakhand msr