पनवेल:  पनवेल बस आगारामध्ये मंगळवारी रात्रीपासून ते बुधवारी सकाळपर्यंत प्रवाशांची अभुतपूर्व गर्दी झाली होती. मतदानासाठी गावाकडे जाणा-या प्रवाशांना बसगाडी मिळत नसल्याने शेकडो प्रवासी बस गाड्यांअभावी खोळंबले होते. प्रवासी आणि राज्य परिवहन महामंडळाच्या आगार परिवहन निरिक्षकांमध्ये शाब्दिक वाद यावेळी झाला. सर्वाधिक प्रवासी महाड व अलिबाग या ठिकाणी जाणारे होते.

विधानसभा निवडणूकीसाठी निवडणूक विभागाला सरकारी बसगाड्यांची आवश्यकता असल्याने पनवेल बस आगारातील स्थानिक फे-या निम्या रद्द करुन निवडणूक विभागासाठी ५९ बस गाड्या पनवेल बस आगाराने दिल्या होत्या. मंगळवारी रात्री ते बुधवारी पहाटेपर्यंत वडखळ येथील वाहतूक कोंडीत त्यामुळे निवडणूकीचे साहीत्य सोडून येणा-या काही बसगाड्या अडकल्याने बुधवारचे पनवेल बस आगाराचे नियोजन बिघडले. याचा फटका रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये जाणा-या प्रवाशांना सहन करावा लागला. पहाटेपासून पनवेल बस आगारात मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होती. बालक, महिला आणि वयोवृद्ध व्यक्तींचे यामध्ये हाल झाले.  

हेही वाचा >>>बेलापुरात बंडखोरांना साथ देणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची तंबी, मंदा म्हात्रे यांनाच विजयी करण्याचे आवाहन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहाटे काही प्रमाणात बस आगारात गर्दी होती. मात्र आम्ही बसगाड्यांचे नियोजन करुन बसच्या फे-या महाड व अलिबाग येथे जाण्यासाठी सूरु केल्या आहेत. प्रवाशांची सोय केली जात आहे. – डॉ. सुहास चौरे, वरिष्ठ आगार व्यवस्थापक, पनवेल बस आगार

आम्ही सकाळी सहा वाजल्यापासून महाडमध्ये जाण्यासाठी पनवेल बस आगारात आलो आहे. कोणतेही ठोस उत्तर येथील आगारातील कर्मचारी देत नाही. उलट उद्धट उत्तर दिली जातात. आम्ही मतदानाला कसे पोहचणार असा प्रश्न पडलाय. मतदान हा राष्ट्रीय सण असे फक्त बोलले जाते. सामान्य प्रवाशांसाठी नियोजनशुन्य कारभार असतो. – वसंत मोरे, प्रवासीमहाड,