आगामी लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रासह देशभरातील ११ राज्यात आज मतदान पार पडत आहे. तसेच नेते आणि अभिनेत्यांकडून नागरिकांना मतदान करण्याचे आवाहनही करण्यात येत आहे. प्रसिद्ध लेखिका आणि राज्यसभेच्या सदस्या सुधा मूर्ती यांनीही युवकांना घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “केंद्र सरकार भांडलवदारांचं हित जोपासत कामगारांवर अन्याय करतंय, विचारपूर्वक मतदान करा…
काय म्हणाल्या सुधा मूर्ती?
आज ( २६ एप्रिल ) दक्षिण कर्नाटकातील १४ जागांसाठी मतदान पार पडत असून सुधा मूर्ती यांनी सकाळी बंगळुरू लोकसभा मतदारसंघात आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना, “तरुणांनी घराबाहेर पडून आपल्या मतदानाचा हक्क बजावावा आणि आपला नेता निवडावा”, असे आवाहन त्यांनी केले. तसेच ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात मतदान कमी होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. “ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात मतदान नेहमीच कमी होते, त्यामुळे तरुणांनो घराबाहेर पडा, मतदान करा आणि आपला नेता निवडा”, असे त्या म्हणाल्या.
कर्नाटकातील १४ जागांसाठी आज मतदान
कर्नाटकतील २८ जागांसाठी दोन टप्यात मतदान होणार आहे. त्यानुसार दक्षिण कर्नाटकातील १४ जागांसाठी आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. तर उत्तर कर्नाटकातील १४ जागांसाठी तिसऱ्या टप्प्यात म्हणजे ७ मे रोजी मतदान होणार आहे. २०१९ मध्ये कर्नाटकमधील २८ पैकी २५ जागांवर भाजपाने विजय मिळवला होता. तर काँग्रेस, जनता दल सेक्यूलर आणि अपक्ष यांना प्रत्येकी एक जागा मिळाली होती.