Axis My India Exit Poll 2024 : महाराष्ट्रात निवडणूक २० नोव्हेंबरला पार पडली आहे. यानंतर एक्झिट पोल्सही आले. १० एक्झिट पोल्सपैकी सहा पोल्सनी राज्यात महायुतीची सत्ता येईल पण काँटे की टक्कर असेल या प्रकारचे अंदाज दिले आहेत. मात्र अॅक्सिस माय इंडियाने नवा पोल समोर आणला आहे.
अॅक्सिस माय इंडियाचा पोल काय?
अॅक्सिस माय इंडियाच्या ( Axis My India Exit Poll 2024 ) पोल नुसार भाजपा-महायुतीला १७८ ते २०० जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर महाविकास आघाडीला ८२ ते १०२ जागा मिळतील असा अंदाज आहे. भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरेल असंही या पोलने ( Axis My India Exit Poll 2024 ) म्हटलं आहे.
पक्षनिहाय कुणाला किती जागा? Axis चा पोल काय सांगतो?
भाजपा – ९७ ते १०७ जागा
शिवसेना (एकनाथ शिंदे)- ५३ ते ५८ जागा
राष्ट्रवादी (अजित पवार) २५ ते ३० जागा
काँग्रेस – २८ ते ३६ जागा
शिवसेना (उद्धव ठाकरे)- २६ ते ३२ जागा
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)- २६ ते ३० जागा
हे पण वाचा- “आमच्याशिवाय सत्तास्थापन होऊ शकत नाही”, एक्झिट पोल पाहून शिंदे-फडणवीसांच्या मित्राने शड्डू ठोकला
काय सांगतो आहे हा अंदाज?
असा हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अॅक्सिस माय इंडियाचा Axis My India Exit Poll 2024 पोल शक्यतो चुकत नाही असं सांगितलं जातं. आता यावेळी काय होणार ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे यात शंकाच नाही. या पोलनुसार महायुतीला घवघवीत यश मिळेल असं हा पोल सांगतो आहे.
विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबरला पडली पार
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक बुधवारी म्हणजेच २० नोव्हेंबरला पार पडली आहे. या निवडणुकीत कुणाला किती मतं मिळाली आहेत हे २३ नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे. मात्र आता जे एक्झिट पोल समोर येत आहेत त्यानुसार राज्यात महायुतीचं सरकार येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बुधवारी जे ९ विविध पोल्स आले आहेत त्यापैकी ६ पोल्सनीही हाच अंदाज वर्तवला होता. आता अॅक्सिस माय इंडियाने भाजपा महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल आणि १७८ ते २०० जागा मिळतील हा अंदाज वर्तवला आहे. आता नेमकं काय होणार हे चित्र २३ नोव्हेंबरला म्हणजेच येत्या शनिवारी स्पष्ट होणार आहे.