महाराष्ट्रातील अमरावतीमधून भाजपाच्या उमेदवार नवनीत कौर राणा यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. अमरातवीत भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या समोर काँग्रेसचे बळवंत वानखेडे उभे होते. या लढतीत वानखेडे यांनी राणांचा पराभव केला. या दोघांमधली ही स्पर्धा खूपच चुरशीची होती. मतमोजणी सुरु झाल्यापासून कधी नवनीत राणा तर कधी बळवंत वानखेडे आघाडीवर पण जनतेने वानखेडेंचीच निवड केल्याचं चित्र स्पष्ट झालं. अमरावती मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात मतदान पार पडलं होतं. या सगळ्या प्रकरणावर आता बच्चू कडूंनी प्रतिक्रिया दिली आहे. नवनीत राणांचा पराभव का झाला? ते त्यांनी सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे पण वाचा- बच्चू कडूंचं वक्तव्य, “गुवाहाटीला जाण्यापूर्वी मी उद्धव ठाकरेंना फोन केला होता पण…”

अमरावतीत २६ एप्रिल रोजी पार पडलं मतदान

२६ एप्रिल रोजी झालेल्या मतदानात एकूण ६३.६७ टक्के लोकांनी मतदान केले. अमरावती मतदारसंघातून एकूण ३७ उमेदवार रिंगणात असले, तरी खरी लढत भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये होती. यामध्ये काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला. बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा यांच्याशी वाद असल्याने त्यांनीही नवनीत राणांचा प्रचार केला नाही. त्याचाही फटका राणा यांना बसला. आता या प्रकरणात बच्चू कडूंनी प्रतिक्रिया दिली आहे.

नवतीन राणांचा पराभव झाला कारण..

“नवनीत राणा यांचा पराभव हा त्यांच्यामुळेच झाला आहे. मतदारांनी त्यांना नाकारलं आहे. नवनीत राणांनी त्यांच्या वर्तणुकीत बदल करायला हवा होता. त्यांच्या वर्तनामुळेच त्यांना लोकांनी नाकारालं. भाजपाच्या लोकांनीही त्यांना इथे स्वीकारलं नव्हतं.” असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

आम्ही विधानभाही लढवणार

आगामी काळात विधानसभा निवडणुकीत प्रहार पक्ष बडनेरा आणि तिवसा मतदारसंघही लढवणार आहे असंही बच्चू कडू यांनी जाहीर केलं. तसंच राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार असेल तरीही आमचा दूरदूर पर्यंत संबंध नाही. मंत्रिपद दिलं तरीही घेणार नाही असंही बच्चू कडूंनी म्हटलं आहे.

२०१९ च्या निवडणुकीत नवनीत राणांचा विजय

२०१९च्या निवडणुकीत नवनीत राणा यांनी शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांचा पराभव करून विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांनी नरेंद्र मोदी सरकारला पाठिंबा दिला. २०१४मध्ये नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती, ज्यात त्यांचा पराभव झाला होता. अमरावती लोकसभेची जागा अनेकवेळा शिवसेनेकडे गेली आहे. मात्र, येथून भाजपला कधीही विजय मिळाला नाही. नवनीत यांनीही अपक्ष म्हणून विजय मिळवला होता. मात्र, यावेळी त्या भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. मात्र, यावेळीही अमरावतीतून भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bachchu kadu explains why navneet rana defeat in lok sabha polls what did he say rno news scj