Bachhu Kadu On Ravi And Navneet Rana : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने दमदार विजय मिळत सत्ता राखली. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत अविश्वसनीय कामगिरी करणाऱ्या महाविकास आघाडीचा विधानसभेत धुव्वा उडाला. याचबरोबर निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे आणि महायुतीशी जवळीक साधणारे प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष बच्चू कडू यांनाही तब्बल चार निवडणुकीनंतर पराभवाचा फटका सहन करावा लागला आहे. दरम्यान आमदार रवी राणा यांनी दावा केला होता की, बच्चू कडू यापुढे विधानसभेत दिसणार नाहीत. आता माजी आमदार बच्चू कडू यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले बच्चू कडू?

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर माध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले, त्यांनी विनाकारण माझ्या पराभवाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. कारण संपूर्ण महाराष्ट्राचे चित्र बदलले आहे. राज्यातील निकाल वेगळे लागले असते आणि मी पराभूत झालो असतो तर राणांना श्रेय दिले असते. पण हपापलेले लोक उगाचच बच्चू कडूंना आम्ही पाडले म्हणत श्रेय घेत आहेत. त्यांची औकात नाही आम्हाला पाडण्याची. जर असेल तर त्यांनी कोणताही मतदारसंघ सांगावा, मी तिथून उभा राहतो.”

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
aishwarya rai and abhishek bachchan
“सेटवर आम्ही कधीच त्यांना…”, ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनबाबत अभिनेता म्हणाला, “त्यांच्या नात्यामुळे…”
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
parveen babi kabir bedi break up story
“परवीन बाबीने मला सोडलं, कारण मी तिला…”, कबीर बेदी यांचा मोठा दावा; म्हणाले…
salman khan reacted on aishwarya rai abhishek bachchan marriage
ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनशी लग्न केल्यानंतर सलमान खान म्हणालेला, “माझ्या आयुष्याचा एक…”
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…

काय म्हणाले होते रवी राणा?

यंदाच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर रवी राणा म्हणाले होते की, “लोकसभा निवडणुकीत खोटी भाषणे देऊन यशोमती ठाकूर आणि बच्चू कडूंनी नवनीत राणा यांचा पराभव केला. यासाठी त्यांनी पूर्ण जोर लावला होता. पण आता तुम्ही पाहत आहात, बच्चू कडूंचा पराभव झाला आहे. नवनीत राणा विधानसभा निवडणूकीच्या काळात संपूर्ण जिल्ह्यात फिरल्या, सर्वत्र सभा घेतल्या. मी यापूर्वी म्हणालो होतो की, इथून पुढे बच्चू कडू पुन्हा विधानसभेत दिसणार नाहीत.”

हे ही वाचा : एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडल्याच्या भूमिकेनंतर अर्जुन खोतकरांचं मोठं विधान; म्हणाले, “आम्हाला अपेक्षा…”

अचलपूर मतदारसंघाचा निकाल

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर विधानसभा मतदारसंघ माजी आमदार आणि प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष बच्चू कडू यांचा बालेकिल्ला होता. या मतदारसंघातून त्यांनी गेल्या चार निवडणुकांमध्ये विजय मिळवला होता. पण, यंदा भाजपाच्या प्रवीण तायडे यांनी त्यांचा परभव केला. यामध्ये भाजपाच्या प्रवीण तायडे यांनी ७८२०१ मते मिळाली. तर बच्चू कडू यांना ६६०७० मते मिळाली. यामध्ये तिसऱ्या स्थानी राहिलेल्या काँग्रेसच्या बबलू देशमुख यांना ६२७९१ इतकी मते मिळाली. बच्चू कडू यांच्या या पराभवामुळे आता तब्बल २० वर्षांनंतर ते विधानसभेत दिसणार नाहीत.