Karnataka Vidhan Sabha Election Results 2023 : कर्नाटकातील विधानसभा निवडणुकांच्या निकालाचे कल हाती आले असून काँग्रेस आघाडीवर आहे. येत्या काही तासांतच निकाल स्पष्ट होणार आहे. कर्नाटकच्या सत्तेवर कोण विराजमान होणार याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. दरम्यान, या निकालानंतर भाजपाचं अधःपतन होईल, असा मोठा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ते टीव्ही नाईन मराठीशी बोलत होते.

हेही वाचा >> Karnataka Election : “मोदी-शाहांनी हा पराभव स्विकारावा, कारण या दोन नेत्यांनी…”, संजय राऊतांचा हल्लाबोल

अरविंद केजरीवाल आणि 'आप'ला रोखण्यासाठी भाजपाची मतदारांना कोणती आश्वासनं? (फोटो सौजन्य पीटीआय)
अरविंद केजरीवाल आणि ‘आप’ला रोखण्यासाठी भाजपाची मतदारांना कोणती आश्वासनं?
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
स्मृती इराणी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवणार? केजरीवालांना शह देण्यासाठी भाजपाचा प्लान काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
Delhi Elections 2025 : स्मृती इराणी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवणार? केजरीवालांना शह देण्यासाठी भाजपाचा प्लान काय?
Ravindra Chavan talk on local body elections in exclusive interview with Loksatta
‘शक्तिशाली’ भारतासाठी ‘बलशाली’ भाजप आवश्यक
akola ZP
वंचितची प्रतिष्ठा पणाला लागणार; अकोला जिल्हा परिषद निवडणुकीचे वेध, राजकीय पतंगबाजी रंगणार
BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
ajit pawar ncp latest news in marathi
अजित पवार स्वबळावर लढणार का ?

“देशातील जनतेला तोडाफोडीचं राजकारण पटलेलं नव्हतं. कर्नाटक हे उच्च विद्याविभूषित राज्य आहे. कर्नाटकात विकासाच्या मुद्द्यावर राजकारण होणं अपेक्षित होतं. पण भाजपाने तिथे विकास केला नाही. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. विकासाच्या कामात कमिशनची टक्केवारी ४० वर गेली. अशा परिस्थिती भाजापा वाटलं की आपण निवडणूक जिंकू शकत नाही त्यामुळे त्यांनी बजरंग बलीचा मुद्दा आणला. बजरंग बली, तोडो भाजपा की नली. बजरंग बलीची कृपा काँग्रेसला मिळाली. बजरंग बलीचा आशीर्वाद मिळाला असं वाटतं. धर्माचं आणि जातीचं राजकारण दिर्घकाळ करता येणार नाही. यातून देश उद्ध्वस्त होईल. राजकारणात निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवली गेली पाहिजे. परंतु, मुळ मुद्द्यापासून भरकटत जाऊन कोणत्याही पद्धतीने या राज्यात सत्ता स्थापन करण्याची हा निर्धार जनतेने धुळीस मिळवले”, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

हेही वाचा >> Karnataka Election Results 2023 Live : “‘या’ एका घोषणेने कर्नाटकात भाजपाचा पराभव”, सचिन पायलट यांनी सांगितलं काँग्रेसच्या विजयाचं कारण

“ही सुरुवात आहे. याचं लोण सर्वत्र देशात पसरत आहे. सरकारसंदर्भात जे काही मुद्दे पुढे आहे, त्याला नाकारण्याचं काम सुरू झालं आहे. महाराष्ट्रातही होईल. आता होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये हा बदल होईल. कर्नाटक मैलाचा दगड ठरले आणि भाजपाच्या अधःपतनाला सुरुवात होईल. भाजपाचे देशभर अधःपतन होईल. देशात पुन्हा भाजपा केंद्रात दिसणार नाही. त्याची कर्नाटकातून सुरुवात झाली आहे”, असंही विजय वडेट्टीवार म्हणाले.

Story img Loader