चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण सहा मतदारसंघ आहेत. त्यापैकीच एक मतदारसंघ म्हणजे बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ. हा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे, कारण या मतदारसंघाचे विद्यमान आमदार हे राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार आहेत. महत्त्वाचे म्हणजे भाजपाने पुन्हा एकदा त्यांना या मतदारसंघातून रिंगणात उतरवलं आहे. दरम्यान, या मतदारसंघाचा राजकीय इतिहास नेमका कसा राहिला आहे? गेल्या विधानसभा निवडणुकीची आकडेवारी काय सांगते? आणि या मतदारसंघाची सद्यस्थिती काय? याविषयी जाणून घेऊया.

बल्लारपूर मतदारसंघाचा राजकीय इतिहास काय?

बल्लारपूर मतदारसंघ हा नेहमीच भाजपाचा बालेकिल्ला राहिला आहे. या मतदारसंघाची निर्मिती २००८ साली झालेल्या मतदारसंघ परिसीमन आदेशांतर्गत करण्यात आली. या मतदारसंघात मूल, पोंभूर्णा, बल्लारपूर या तालुक्यांचा समावेश होता. २००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने या मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार यांना रिंगणात उतरवले होते. तेव्हापासून आजपर्यंत ते या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. ते सलग तीन वेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. तसेच महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्रीही राहिले आहेत.

Bapu Bhegde, Sunil Shelke, Maval Pattern,
‘मावळ पॅटर्न’चे काय होणार?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Traditional political opponents Shankar Jagtap and Rahul Kalate are fighting for fourth time in Chinchwad Assembly Constituency
‘या’ मतदारसंघात पारंपरिक विरोधकांतील चौथी लढत अस्तित्वाची
maharashtra assembly election 2024 three way fight between bjp rebels jat assembly constituency
लक्षवेधी लढत : जातीयवादाकडे झुकणारी लढत
Pankaja Munde
Pankaja Munde : महायुतीत ‘बटेंगे तो कटेंगे’ घोषणेवरुन दोन मतप्रवाह; अजित पवारानंतर आता पंकजा मुंडेंनीही मांडली भूमिका
maharashtra assembly Election 2024 shekap fights for survival alibag assembly constituency
अलिबागमध्ये शेकापची प्रतिष्ठा पणाला
maharashtra assembly election 2024 maha vikas aghadi vs mahayuti battle in konkan region
विश्लेषण : कोकणात लोकसभेतील यशाची पुनरावृत्ती महायुती दाखवणार का? महाविकास आघाडीला संधी किती?
politics of religion and caste still resonate in Maharashtra
लेख : जात खरंच जात नाही का?

हेही वाचा – Eknath Shinde : माहीममध्ये महायुतीचा पाठिंबा कोणाला? सदा सरवणकरांना समर्थन की मनसेला साथ? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले…

२००९, २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीची आकडेवारी काय सांगते?

२००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली होती, तर काँग्रेसने राहुल नरेश पुगलिया यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत मुनगंटीवार यांचा विजय झाला. त्यांना एकूण ८६ हजार १९६ मते, तर पुगलिया यांना ६१ हजार ४६० मते मिळाली होती. याशिवाय अपक्ष उमेदवार विनोद गजानन अहिरकर हे तिसऱ्या स्थानावर राहिले होते. त्यांना १० हजार ९२१ मते मिळाली होती. २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुधीर मुनगंटीवार यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला होता. त्यांनी काँग्रेसच्या घनश्याम मुलचंदानी यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत मुनगंटीवार यांना १ लाख ३ हजार ७१८ मते, तर मुलचंदानी यांना ६० हजार ११८ मते मिळाली होती.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने पुन्हा एकदा सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत त्यांचा विजय झाला असला तरी त्यांच्या मताधिक्यात मोठी घट झाल्याचं बघायला मिळालं होतं. या निवडणुकीत मुनगंटीवार यांना ६० हजार मते मिळाली, तर काँग्रेसच्या डॉ. झाले यांना ५० हजार मते मिळाली होती. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे राजू झोडे हे तिसऱ्या स्थानावर राहिले होते.

या मतदारसंघातील सद्यस्थिती काय?

सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा विजय मिळवला असला, तरी त्यांच्या मताधिक्यात मोठी घट झाली आहे. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतीही भाजपाने त्यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला, त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. असं असताना भाजपाने सुधीर मुनगंटीवार यांना पुन्हा एकदा रिंगणात उतरवले आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आता काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे. काँग्रेसने यंदा बल्लारपूरमधून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावतांना मुनगंटीवार यांच्याविरोधात उमेदवारी दिली आहे. रावत हे विजय वडेट्टीवार यांचे समर्थक मानले जातात.

हेही वाचा – महायुतीत भाजपा मोठा भाऊ होतेय? अजित पवार प्रश्नावर म्हणाले, “आमचं सहमतीनं…”

महत्त्वाचे म्हणजे बल्लारपूरमध्ये काँग्रेससाठी पोषक वातावरण आहे. मात्र, पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे पक्षश्रेष्ठींची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात विजय वडेट्टीवार आणि प्रतिक्षा धानोरकर असे दोन गट पडले आहेत. आता काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार यांच्या समर्थकालाला उमेदवारी मिळाल्याने प्रतिक्षा धानोरकर यांचा गट नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्याचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे. एकंदरितच या मतदारसंघाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.