Baramati Constituency Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या नेत्यांनी मतदारसंघात पुन्हा एकदा आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी कंबर कसली होती. एवढंच काय तर राज्यातील काही बड्या नेत्यांसाठी २०२४ च्या विधानसभेची निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती. यामध्ये आतापर्यंत सातवेळा आमदार राहिलेले आणि तब्बल पाचवेळा राज्याचे उपमुख्यमंत्रिपद भुषवलेले अजित पवार यांच्यासाठी देखील ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. खरं तर गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवारांचं वर्चस्व राहिलंय. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात २०२३ मध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांनी काही आमदारांना घेऊन आपली वेगळी चूल मांडली. त्यामुळे पक्षात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असे दोन पक्ष तयार झाले. त्यामुळे अर्थात राजकीय समीकरणे बदलली आणि याचाच प्रत्यय आपल्याला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात पाहायला मिळाला.

लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशाचं लक्ष बारामती मतदारसंघाकडे (Baramati Vidhan Sabha Constituency) लागलं होतं. आता विधानसभेला देखील बारामती मतदारसंघ चर्चेत असणार यात काही शंकाच नव्हती. यातच बारामतीची लढाई म्हणजे काका आणि पुतण्यासाठी प्रतिष्ठेची. त्यामुळे बारामतीत निवडणूक जाहीर झाल्यापासून राजकीय घडामोडी वाढल्या होत्या. बारामती म्हटलं की, देशाचं राजकारण असो किंवा राज्याचं नेहमीच चर्चेत असते. लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि शरद पवार (Sharad Pawar) यांची कन्या सुप्रिया सुळे आमने-सामने होत्या. त्यामुळे अजित पवार आणि शरद पवारांची अर्थात काका पुतण्याची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यानंतर आता विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा बारामतीत काका-पुतण्या लढाई पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून युगेंद्र पवार (Yugendra Pawar) हे अजित पवारांच्या विरोधात मैदानात निवडणूक लढले. तर बारामतीत अजित पवार हे स्वत: निवडणुकीच्या मैदानात होते. त्यामुळे बारामतीत युगेंद्र पवार आणि अजित पवार यांच्यात लढत झाली. मात्र, या निवडणुकीत अजित पवारांचा विजय झाल आहे, तर युगेंद्र पवार यांचा पराभव झाला.

Maharashtra deputy CM Ajit Pawar (L) is contesting from the Baramati constituency against his nephew, Yugendra
Baramati : बारामती विधानसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार राजकीय नाट्याचा दुसरा अंक! अजित पवारांविरोधात युगेंद्र पवार
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Illegal Entry In US
Illegal Entry In US : वर्षभरात अमेरिकेत बेकायदेशीर मार्गाने घुसखोरी करणाऱ्या ९० हजार भारतीयांना अटक; ‘या’ राज्यातील लोकांची सर्वाधिक संख्या
ajit pawar sharad pawar (4)
१५ मतदारसंघात पवार विरुद्ध पवार! काका-पुतण्यामध्ये कोण बाजी मारणार?
Maharashtra assembly election 2024 BJP releases third list of 25 candidates
BJP 3rd Candidate List: भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; ३ विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं!
Dispute in Mahavikas Aghadi for candidacy for Solapur city central assembly seat
सोलापूर शहर मध्य, ‘सोलापूर दक्षिण’मध्ये दावेदारीचा गोंधळ सुरूच
मतदान हा महत्त्वाचा अधिकार
Maharashtra Ajit Pawar NCP 1st candidate list 2024 for Legislative Assembly Election 2024 in Marathi
Ajit Pawar NCP Candidate List 2024 : मोठी बातमी! बारामतीतून उमेदवारी नको म्हणणाऱ्या अजित पवारांची उमेदवारी जाहीर; पक्षाच्या पहिल्या यादीत नावाचा समावेश

हेही वाचा : Malad West Assembly constituency : काँग्रेस मालाड पश्चिमचा गड राखणार की महायुती मुसंडी मारणार?

अजित पवार यांनी १९८२ साली राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर एकदा खासदार, आतापर्यंत सातवेळा आमदार आणि तब्बल पाचवेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत. आता महायुतीच्या सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणामधील महत्त्वाच्या नेत्यांमध्ये अजित पवारांचं नाव प्रामुख्याने येतं. खरं तर खासदार, आमदार, मंत्री, अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते अशी अनेक महत्वाची पदे अजित पवारांनी भूषवले आहेत. मात्र, तरीही २०२४ ची विधानसभा निवडणूक अजित पवारांसाठी महत्वाची मानली जाते. राष्ट्रवादीतील फुटीनंतर त्यांची ही पहिलीच निवडणूक असल्याने ही निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली गेली.

बारामती विधानसभा मतदारसंघात (Baramati Assembly Election 2024) अजित पवार सध्या विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे महायुतीच्या फॉर्मुल्यानुसार ती जागा अजित पवारांकडेच राहिली . त्यामुळे महायुतीकडून अजित पवार यांनी निवडणूक लढवली. दुसरीकडे महाविकास आघाडीतही बारामतीची जागा ही शरद पवार गटाकडे राहिली. त्यामुळे अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी सख्या काका-पुतण्याची लढाई अतिशय अटीतटीची पाहायला मिळाली.

२०१९ मध्ये मतदारांची संख्या

बारामती विधानसभा मतदारसंघात (Baramati Assembly Election) २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार हे जिंकले होते. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे गोपीचंद पडळकर यांचा १ लाखांपेक्षा जास्त मतांच्या फरकाने पराभव केला होता. २०१९ च्या आकडेवारीनुसार बारामती विधानसभा मतदारसंघात पुरुष मतदारांची संख्या १,६२,८३७ तर महिला १,४७,१५५ एवढी होती.

बारामतीत २०२४ च्या निवडणुकीत किती टक्के मतदान झालं?

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात ६१.०५ टक्के मतदान झालं. तर बारामती मतदारसंघात (Baramati Constituenc) २०१९ मध्ये झालेल्या ६८.८२ टक्क्यांच्या तुलनेत यावेळी ७१.०३ टक्के मतदान नोंदवले गेले.

Story img Loader